तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 January 2020

संगीत क्षेत्रातील कुडलेही शिक्षण न घेता मराठवाड्यातील सुप्रसिद्ध गायक सुभाष शेप यांना स्वरभूषण पुरस्काराने नाथरा येथे सन्मानित


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- येथील प्रसिद्ध गायक सुभाष शेप यांना श्रीनाथ मानव सेवा संस्था आयोजित 5 वे ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलनात नुकतेच मान्यवरांच्या हस्ते  कुठलेही संगित क्षेत्रात शिक्षण न घेतलेले आपल्या मराठवाड्यात ठसा उमटविल्यामुळे व गायन क्षेत्रातील योगदानाबद्दल साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, स्नमान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. 
        नाथरा येथे पाचवे ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलन व भव्य पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होते. दुसर्‍या दिवशी दि.18 जानेवारी रोजी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. सुभाष शेप यांनी कुठल्याही प्रकारचे शिक्षण न घेता संगीत व गायन क्षेत्रात, मराठवाड्यातील प्रसिद्ध आहेत. त्यांनी 17 वर्षे संगित व गायन क्षेत्रातील  कार्याबद्दल श्रीनाथ मानव सेवा मंडळाच्या वतीने स्वरभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सुभाष शेप यांनी अत्यंत गोरगरीब अशा कुटुंबातील शेतकरी आशा कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी संगीत अँकडमी मोफत सुरु केली आहे. त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या पुरस्कार वितरण प्रसंगी श्रीनाथ मानव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.एकनाथ घ. मुंडे , प्रसिध्द कथाकार प्रा.भास्कर बडे, डॉ.संतोष मुंडे, बीड येथील प्रसिध्द साहित्यीक अनंत कराड, कुस्ती परिषदेचे तालुकाध्यक्ष मुरलीधर मुंडे,  मुख्याधिपिका सुलेखा कराड, अ‍ॅड.शुभांगी गित्ते, व्याख्याते चंद्रकांत हजारे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनंत गित्ते, प्रशांत जोशी, रानबा गायकवाड, धिरज जंगले, धनंजय आढाव, मोहन व्हावळे, धनंजय आरबुने, जगदिश शिंदे, महादेव गित्ते आदी मान्यवरांची उपस्थिती होती.  स्वरभूषण पुरस्काराने सुभाष शेप यांना सन्मानित केल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. सुभाष शेप यांना स्वरभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे, आ संजय दौंड, नंदकिशोर मुंदडा, आ.नमिताताई मुंदडा, माजी आमदार सौ.संगिताताई ठोंबरे, ज्येष्ठ नेते दिलीपदादा सांगळे आदींनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a comment