तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

सरपंचपदी गयाबाई काळे यांची निवड


ताडकळस,प्रतिनिधी शेख शेहजाद
        येथील नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतिचे सरपंच पद रिक्त रिक्त झालेमुळे 
दि.13 जानेवारी रोजी रिक्त सरपंच पदाची निवडणूक झाली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी पंचायत समिती पूर्णा एस. डोंगरदिवे यांनी काम पाहिले. यावेळी चुरशीच्या झालेल्या लढतीत सात सदस्या पैकी गयाबाई काळे यांना चार सदस्यांनी मतदान केले तर प्रतिस्पर्धी कैलास काळे यांना तीन सदस्यांनी मतदान केले.एक मतांनी गयाबाई काळे यांची सरपंचपदी निवड झाल्याचे  एस. डोंगरदिवे यांनी जाहीर केले.यावेळी  निवडीसाठी उधवराव काळे, गणेशराव काळे,सुरेश काळे,भगवानराव काळे,विश्वनाथ काळे,कपिल काळे,रामभाऊ काळे, गोविंद काळे,सोनाजी परडे,ज्ञानोबा गवळी,उर्मिला खंदारे,गजानन काळे, भुजंग काळे,किशोर सोनुले, जगन्नाथ कदम यांनी परिश्रम घेतले.
   गयाबाई काळे यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल जी.प.सदस्य वझुर श्रीनिवास जोगदंड,जी.प.सदस्य ताडकळस गजानन आंबोरे ,रत्नाकर गुटटे मित्र मंडळाचे पूर्णा पालम संपर्क प्रमुख माधवराव गायकवाड तालुका अध्यक्ष व्यंकटराव पौळ व गावकऱ्यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment