तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी होणाऱ्या जेलभरो आंदोलनात सहभागी व्हा
माजी आमदार वामनराव चटप यांचे आव्हान 

मंगरुळपीर- दि 14 
          विदर्भ राज्य आंदोलन समिती गेली 7 वर्षा पासुन स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी लढा देत आहे  येत्या 10 फेब्रुवारी ला समिती विदर्भ भर रास्ता रोको आंदोलन करणार आहे या आंदोलनात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार वामनराव चटप यांनी मंगरुळपीर येथे दि 15 रोजी केले आहे.
            विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या या आंदोलनात विविध मागण्या नमूद केल्या असून यामध्ये विशेषता विज विदर्भात तयार होते जमीन पाणी,कोळसा,विदर्भाचा वरून जीवघेणे प्रदूषण विदर्भ च्या वाट्यावर आले त्यामुळे जनतेला कॅन्सर, हृदय रोग अस्थमा, श्वसन चे रोग व इतर  दुर्धर रोगाने विदर्भ पुरता पीडित झाला आहे याशिवाय वीज बिलात सरकार जनतेची लूट करीत आहे म्हणुन समितीचे मागणी आहे विजेच बिल निम्मे झाले पाहिजे विजबिलावरील अन्याय करक कर यामद्ये स्थिर आकार, वीज वहन, कर आदी आमी देणारं नाही परंतु जेव्हा पर्यंत विजेचे  दर निम्मे होत नाही स्वतंत्र विदर्भ निर्मिती होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारशी आर्थिक असहकार आंदोलन करणार कर कर्जा नहीं देंगे बिजली का बिल भी नहीं देंगे अशी भूमिका घेऊन आंदोलन सुरू करण्यात येणार आहे यावेळी रंजना मामर्डे ,फुलचंद भगत,बाबाराव अढाऊ,आत्माराम भेंडेकर, पंडित भेंडेकर, डॉ विट्ठल राव घाडगे, महादेव भेंडेकर, सुभाष हातोलकर, राजू लुंगे,यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835,8459273206

No comments:

Post a comment