तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 January 2020

परळीत रस्ता सुरक्षा अभियान संपन्न
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान कार्यक्रमा अंतर्गत दि.१६ रोजी परळी उड्डान पुल येथे बीड जिल्हा पोलीस दल, पोलीस स्टेशन संभाजी नगर परळी वै. यांच्या वतीने वाहतुक नियमासंबंधी जनजागृती करण्यात आली. विना वाहन चालक परवाना व विना हेल्मेट गाडी चालवू नये, नियम पाळा अपघात टाळा, ट्रिपल सीट गाडी चालवू नये, दारू पिऊन वाहन चालवू नये, ट्रिपल सीट गाडी चालवू नये, पालकांनी १८ वर्षांखालील मुलांना गाडी देऊ नये, विना परवाना वाहन चालवणे कायद्याने गुन्हा आहे. रस्त्यावर कोठेही वाहने उभी करू नये, रस्ते वाहतुकीला अडथळा येईल असे वर्तन वाहन चालकांनी करू नये. तसेच वेळो-वेळी आपल्या वाहनांची पी.यु.सी. करून घ्यावी व पर्यावरण संवर्धनास सहकार्य करावे असे विविध वाहतुकीसंबंधी नियमांचे पालन करण्याचे आवाहन बीड जिल्हा पोलीस दल, पोलीस स्टेशन संभाजी नगर परळी वै. व पोलीस कर्मचारी मिसाळ, शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मोहसीन काकर, पठाण अयुब, मिसाळ आदींनी केले.

No comments:

Post a comment