तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 January 2020

सुतार समाजाला नागरी जमीन कायद्या अंतर्गत शेत जमीन वाटप व्हावी


बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना महाआघाडीने सुरू करून अठरा पगड जातीत बारा बलुतेदार उदरनिर्वाहात सक्षम व्हावा.बाराबलुतेदार सन्मान योजना सुरू करून गावगाड्याच्या कर्मात पिढ्यानपिढ्या शेकडो वर्षापासून कार्यरत असलेल्यांना शेतकऱ्याचे शेतीचे अवजारे, शेतकऱ्याचे लाकडी लोखंडी कामाच्या सेवेत असलेल्या सुतार लोहार समाजाला शेत जमिनी मिळाव्यात
निसर्गाच्या आसमानी संकटामुळे शेतकरी बेजार झाला आहे. त्याचा हाता तोंडाशी आलेल्या घास निसर्ग हिसकावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे. अश्यातच सुतार लोहार समाजाकडे काम शिल्लक राहिले नाही. शेतकर्यांच्या बलुत्यावर गावातील लाकडी वस्तू तसेच लोखंडी कामावर अवलंबून असलेला वर्ग शहराकडे धाव घेत आहे. तिथे मिळेल ती मजुरी काम करत आहे.कला,कुशल, कौशल्य प्रावीण्य असलेला वर्ग अस्ताव्यस्त होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर दिसून येत आहे. शासनाने नागरी जमीन (कमाल धारणा व विनियोग) अधिनियम १९७६ प्रमाणे १७ जानेवारी २०१८ चा मंत्रीमंडळाच्या नियमाप्रमाणे ग्रामीण भागातील सुतार लोहार जातींना शासनाची दोन हेक्टर जमीन उपलब्ध करून द्यावी तो ग्रामीण भागात शेतकरी व गाव गाड्यास लाकडी लोखंडी साहित्य पुरवू शकतो यातून हा वर्ग ग्रामीण भागात स्थिर राहू शकेल पूर्वीच्या शासनाने अश्या प्रकारच्या शेती वाटप केल्या आहेत कृपया नागरी जमीन कायद्या अंतर्गत सुतार लोहार यांना शेती मिळावी अशी मागणी बारा बलुतेदार संघटनेचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव चंद्रकांत गवळी व त्याच्या सहकाऱ्यांनी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांना लेखी निवेदनाद्वारे दिली आहे.

No comments:

Post a comment