तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

सचिन जोशी मित्रमंडळातर्फे ना.धनंजय मुंडे यांचा विठ्ठलमुर्ती देवुन सत्कार


वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
राज्याचे सामाजीक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे हे परळी शहरात आले असता परळीकरांनी त्यांचा उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते सचिन जोशी मित्रमंडळाच्या वतिने विठ्ठल मुर्ती भेट देवुन आगळ्या वेगळ्या पध्दतीने धार्मिक भावनेने सत्कार केला.
 ना.धनंजय मुंडे हे मंत्रिपदाचा पदभार घेतल्यानंतर प्रथमच परळी शहरात दाखल झाल्यानंतर मुख्य नागरी सत्कार सोहळ्याबरोबरच व्यापारी व नागरीकांनी भव्य दिव्य सत्कार केले.दि.12 जानेवारी रोजी ना.धनंजय मुंडे यांनी बाजारपेठेतील व्यापार्यांच्या भेटी घेतल्या.या दरम्यान सचिन जोशी मित्रमंडळाच्या वतिने जोशी मेडिकल स्टोअर्स मोंढा येथे पंढरीच्या विठ्ठलाची मुर्ती भेट दिली.यावेळी ना.मुंडे यांनी विठ्ठल मुर्तीचे दर्शन घेतले व पंढरीच्या विठ्ठलाच्या आशीर्वादाने परळी मतदार संघातील जनतेच्या आयुष्यातील दुःख दुर करण्यासाठी माझ्या हातून कार्य घडावे असे सांगीतले.यावेळी माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष अजय जोशी,प्रा.सुनिल चव्हाण,नरसिंग देशमुख,कृष्णा डुबे,गणेश डिंगणे,वामन मुळी,विनायक टुनकीकर,अमित कदम,प्रदिप आरसुळे आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a comment