तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 January 2020

स्वीकृत नगरसेवक पदी बाळासाहेब कडबाने यांची नेमणूक करावी अशी पत्रकार संघाची एकमुखाने मागणी ; ना. धनंजय मुंडे पत्रकारांना न्याय देतील याची खात्रीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  लवकरच परळी वैजनाथ नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यांची निवडणूक होत आहे. यात सभागृहात सर्व प्रसार माध्यम प्रतिनिधी मंडळींनी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे प्रसार माध्यम क्षेत्रात तीन दशकांहून अधीक काळापासून सक्रिय असणारे दै. जगमित्रचे संपादक बाळासाहेब कडबाने यांना संधी द्यावी अशी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

विविध वृत्तपत्रात काम करताना असलेल्या दीर्घ अनुभवामुळे त्यांनी आजवर शहरातील अनेक समस्यांवर वेळोवेळी भाष्य करून गरजू लोकांना न्याय मिळावा यासाठी निर्भीडपणे काम केले आहे. शहरातील विविध क्षेत्रात काम करणारे लोक शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, विविध सरकारी व खाजगी कार्यालय यांसह सामान्य नागरिकांशी त्यांचा दांडगा संपर्क ही त्यांची खूप मोठी जमेची बाजू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेला स्वीकृत नगरसेवकांकडून अपेक्षीत सूचना मांडून त्यांचा पाठपुरावा करून लोककल्याणार्थ काम बाळासाहेब कडबाने यांच्या मार्फत होऊ शकते याची सर्वांना खात्री आहे असे सर्व पत्रकार मंडळींचे म्हणणे आहे.

वरील सर्व बाबींचा विचार करता बाळासाहेब कडबाने यांना स्वीकृत नगरसेवक पदी प्रसार माध्यम प्रतिनिधी म्हणून नेमणूक होईल असा विश्वास सर्व पत्रकार मंडळींना आहे.ना.धनंजय मुंडे यांना सादर केलेल्या निवेदनावर पत्रकार संघाचे तालुकाध्यक्षअनंत गित्ते शहराध्यक्ष संभाजी मुंडे कार्याध्यक्ष धिरज जंगले,लक्ष्मण वाकडे(सकाळ),प्रा.प्रविण फुटके,सकाळ मोहन वाव्हळे,े (पी.सी.एन  न्युज)
धनंजय आरबुने (पुण्य नगरी) प्रशांत जोशी (दै.मराठवाडा साथी)संजय खाकरे (लोकमत) रविंद्र जोशी (पुढारी) प्रा.राजु कोकलगावे (लोकमत टाईम्स) धनंजय आढाव (दिव्य मराठी) दिलीप  बदर(लोकाशा) स्वानंद पाटील (सामना) रामप्रसाद शर्मा (पार्श्‍वभुमी) किरण धोंड(प्रजापत्र) आनंद कुलकर्णी (झुंजार नेता) मोहन साखरे (लोकसत्ता) जगदीश शिंदे(गावकरी) दत्ता काळे(मराठवाडा साथी) समीर इनामदार (लोकपत्र) संतोष जुजगर(रणझुंजार) महादेव गित्ते (अभिमान) शेख बाबा (जंग ) प्रेमनाथ कदम (सुर्योदय) माणिक कोकाटे (आनंद नगरी ) प्रल्हाद कंडुकटले ( हिंदजाग्रती) यांच्या सह आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

No comments:

Post a Comment