तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

जिजाऊ-सावित्री आजच्या यशस्वी स्त्रियांची खरी प्रेरणा....सुचित्राताई सरनाईकरिसोड(महेंद्रकुमार महाजन जैन )


तालुक्यातील स्वामी विवेकानंद माध्य व उच्च माध्य विद्यालय व्याड येथे सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुचित्राताई दिलीपराव सरनाईक तर प्रमुख अतिथी रामकोरबाई त्र्यंबकराव बोंडे प्रमुख उपस्थिती        गंगाबाई राजाराम हेंबाडे सरपंच वलाना,गोदावरी भागवत हेंबाडे माजी सरपंच,निर्मलाबाई अशोकराव सपकाळ, शारदाताई भागवत झाडे,चारुलता विश्वनाथ गायकवाड,श्रीलेखाताई सरनाईक,इत्यादी मान्यवर महिला उपस्थित होत्या. विद्यालयाच्या वातिने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.विद्यालयाचे कर्मचारी रमेश पडघान यांनी मधुर स्वागत गीत गायन केले.आजच्या आधुनिक काळातील स्त्रियाची झालेली प्रगती ही केवळ सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरनेमुळेच झाली असल्याचे प्रतिपादन सुचित्राताई सरनाईक यांनी केले. प्रसंगी विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. परमेश्वर झाडे, साईनाथ झाडे, कल्याणी बोंडे,आदर्श खडसे, अनुराधा सपकाळ,रुपाली ढोरे, वैशाली गिरी,वैष्णवी बोंडे,शिवराज झाडे,रुपाली बोंडे,या विद्यार्थ्यांची भाषणे अधिक लक्षवेधक ठरली.
 विद्यालयाच्या सह शिक्षका दुर्गा घोगरे, व रवि अंभोरे यांनी  विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले, माँ जिजाऊ साहेब,स्वामी विवेकानंद  यांच्या जीवनावर प्रकाश टाकनारे मार्गदर्शन केले.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक जगन्नाथ भिसडे यांनी सूत्रसंचालन प्रा गजानन लांभाडे तर आभार प्रदर्शन प्रा ज्ञानेश्वर मांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता प्राचार्य एस डी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एन पी वाघ,गणेश हेंबाडे,गजानन घाटोळ,रामेश्वर पवार,प्रवीण सरनाईक,रमेश पडघान,नरेश बचाटे,गणेश बनसोड,भरत माकोडे इत्यादींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी  व विद्यार्थी उपस्थित होते.

महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड 
               प्रतिनिधी 
9960292121 / 9420352121

No comments:

Post a comment