तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 January 2020

वकिलांनी सामाजिक बांधिलकी बाळगून गरिबांना न्याय मिळवून द्यावा न्यायमूर्ती --आर.जी. अवचट


अरुणा शर्मा


पालम :- न्यायालयीन लढा लढण्यासाठी गरिबाकडे पैसा नसला तरीही गरिबांच्या न्याय हक्कासाठी वकिलांनी सामाजिक बांधिलकी जोपासून गरिबांना न्याय मिळवून द्यावा असे आव्हान उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद चे न्यायमूर्ती आर.जी. अवचट यांनी दि. 11 जानेवारी रोजी पालम येथे न्यायालयाच्या नूतन भूमिपूजन पायाभरणी सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश एच.एस. महाजन होते. व्यासपीठावर पालम चे दिवाणी न्‍यायाधिश कनिष्‍ठ स्‍तर तथा न्यायदंडाधिकारी एस.एन. पाटील व पालम वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट व्हि.डी. जाधव उपस्थित होते प्रथम मान्यवरांचे पालम, पूर्णा, गंगाखेड, परभणी, सोनपेठ, वकील संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.जी. अवचट व मान्यवरांच्या हस्ते नूतन इमारतीच्या पायाभरणी सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले, उद्घाटनपर भाषण करताना न्यायमूर्ती आर.जी. अवचट म्हणाले की घटनेच्या 21व्या कलमान्वये सर्वाना चांगले जीवन जगण्याचा अधिकार आहे सर्वांसाठी समान कायदा असून कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही वकिलांनी गरिबांना न्याय मिळून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करावे सामाजिक बांधिलकी जोपासत गरिबांना न्याय मिळवून द्यावा असे आवाहन केले कार्यक्रमाला जिल्हा व सत्र न्यायाधीश परभणीचे न्यायमूर्ती एच.एस. महाजन म्हणाले की या नूतन इमारतीच्या वृद्ध नागरिक वकील महिला यांना फायदा होणार आहे वकिलांनी पीडित अत्याचारित गोरगरीब यांना न्याय मिळवुन देण्या साठी नेहमीच प्रयत्न करावे असे आवाहन केले कार्यक्रमाला परभणी, हिगोंली विभागाचे न्यायालयाचे न्यायधिश उपस्थित होते व वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला कार्यक्रमाचे प्रस्ताविक पालम वकील संघाचे अध्यक्ष अँड व्हि.डी. जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन पालम न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.एन. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अँड अळनूरे, अँड मुठाळ,अँड रोकडे, अँड शेख,ॲड पोळ, ॲड पैके, ॲड उद्धवराव सिरस्कर, ॲड झुंजारे, अँड व्हि.ए. गिणगिणे, अँड खतीब, अँड कुलकर्णी, अँड पारवे, अँड  दुधाटे, अँड मुठाळ, एस.एस. डहाळे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला नगराध्यक्षा अनिताताई हात्तीआंबिरे, नगर सेवकासह मान्यवर मंडळी सह विविध खात्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ममता विद्यालय पालम च्या विद्यार्थी नी लेझिम पथक, व स्वागत गीत, व कार्यक्रमची सांगता राष्ट्रगीताने केली.  कार्यक्रमादरम्यान पूर्णा विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डिले, पोलीस निरीक्षक राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने, ईंगेवाड फौजदार साने आदींनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

No comments:

Post a comment