तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 12 January 2020

अपघातास कारणीभूत असलेल्या मॅटेडोअर चालका विरुद्ध गौणखनीज चोरीचा गुन्हामेहकर :-
अवैधरित्या रात्रीच्यावेळी रेतीची वाहतूक करणा-या टाटा ४०७ मॅटेडोअरने मेहकर तालुक्यातील उटी येथील धोटे बंधूना सात्वनपर भेट देऊन जानेफळ वरुन मेहकरला जात असतांना आ. डॉ संजय रायमुलकर यांच्या ईको स्पोर्ट गाडीला धडक दिल्याने आमदार डॉ संजय रायमुलकर चालक पंजाब गुडधे, अंगरक्षक पो कॉ ज्ञानेश्वर निकस हे जखमी झाल्याची घटना १० जानेवारीला जानेफळ- मेहकर मार्गावरील नायगाव दत्तापुर नजीक असलेल्या घोणसर शिवारात १० जानेवारीला रात्री ९ वाजेदरम्यान घडली होती या घटनेनंतर अखेर महसूल विभागाला जाग आली असून आरोपी मॅटेडोअर चालक मालक गणेश राऊत विरुद्ध ११ जानेवारीला दुपारी जानेफळ पोलिस स्टेशनला गौणखनीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जानेफळ पोलीस स्टेशनला मेहकर येथील महसूल विभागाचे  मंडळ अधिकारी  नितीन श्रीकृष्ण बोरकर वय ५२ वर्षे यांनी फिर्याद दीली आहे त्यामध्ये नमूद केले आहे की मला मिळालेल्या माहितीनुसार  घोणसर शिवारात जाऊन बघितले असता तेव्हा जानेफळ मेहकर रोडवर शेतकरी शिवाजी सखाराम चव्हाण यांच्या कोठ्याजवळ अपघात झालेला दिसला तेव्हा तिथे एक ब्रास रेती किंमत ६ हजार रुपये दिसली सदर बाबत माहिती की सध्या कोणतीही रेती खनिजाची लिलाव होऊन रॉयल्टी नसतांना वाहन क्रमांक एम एच २८ एच ९८०१ चा मालक चालक गणेश तुकाराम राऊत वय २५ वर्षे रा.माळीपेठ याने त्याच्या वाहनात  मेहकर येथुन कोणत्यातरी चोरीच्या मार्गाने रेती गौणखनीज एक बरास किंमती ६ हजार रूपये ती मिळवून ती रेती नायगाव दत्तापुर येथे घेऊन येत असतांना सदर वाहन धरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवत आणून आ डॉ संजय रायमुलकर यांचे वाहन क्रमांक एम एच २८ ए झेड ७७७१ ला ठोस मारुन सदर वाहणात बसलेल्या आ. डॉ संजय रायमुलकर चालक पंजाब गुडधे, अंगरक्षक पो कॉ ज्ञानेश्वर निकस हे गंभीर जखमी झाले आहेत असे नमूद केले आहे या प्रकरणी जानेफळ पोलिस स्टेशनला मेहकर महसूल विभागाचे मंडळ अधिकारी नितीन श्रीकृष्ण बोरकर यांच्या फिर्यादीवरुन आरोपी सदर वाहन मालक चालक गणेश तुकाराम राऊत रा माळीपेठ मेहकर याच्या विरुद्ध अप नं ९\२० कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास ठाणेदार दिलीप मसराम पि एस आय काकडे हे करीत आहेत.

जमील पठाण
8805381333

No comments:

Post a comment