तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर ७०वर्षाच्या आजीचं आमरण उपोषण

 चव्हाट्यावर मावेजा मिळण्यासाठी वयोवृद्ध आजीचं सहाव्या दिवशीही आमरण उपोषण सुरूच

प्रशासनाकडुन दखल न घेतल्याने संताप

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :-अंबाजोगाईच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर वयोवृद्ध आजीला आमरण उपोषण करण्याची नामुष्की प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आली असून जमिनीचा मावेजा मिळण्यासाठी आज दि१५जानेवारी आमरण उपोषणाचा सहावा दिवस आहे.मात्र७० वर्षे वय असल्याने कामही होत नाही मग घर भागवायचं कस, मुलं ऊसतोडनीसाठी परराज्यात आभाळा एवढं दुःख घेऊन जगावं तरी कश्यासाठी असा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील मौजे येल्डा येथील रहिवासी असलेल्या विमलबाई रामकीसन खोडवे यांची जमीन १९९६मध्ये पाझर तलाव क्रमांक५साठा गट नंबर९६/७७मधील०१हेक्टर०८आर जमीन संपादित झालेली आहे.त्यांच्या बरोबर बाकी शेतकऱ्यांची जमीन दि.२५मे१९९५रोजी संपादित करण्यात आली आहे. पाझर तलावाचे काम सुरू असताना काही कारणास्तव तलावाचे काम अर्धवट स्थीतीत राहिले आहे. मात्र मावेजा मागण्यासाठी वेळोवेळी लघु पाटबंधारे कार्यालयाला भेट देऊन देखील काम होत नसल्याने आजीचं आमरण उपोषण सुरू आहे.विशेष म्हणजे औरंगाबाद खंडपिटाचे आदेश असताना देखील अधिकारी दखल घेत नाहीत हे विशेष!
उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात खोडवे म्हणतात,मी वेळोवेळी आपल्या कार्यालयास भेटुन तलावाचे काम सुरु करावे व आमच्या जमीनीचा मावेजा द्यावा यासाठी विनंती केली परंतु अद्याप पर्यंत यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने मी मा . उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्र.२९१७/१७ही दाखल केली व त्यावर मा.उच्च न्यायायलयाने दि.२०/०९/२०१९ रोजी मावेजा व भुभाडे देण्याबाबतचा निर्णय दिलेला आहे. त्यानंतर सदरील निकालाची प्रत आपल्या कार्यालयास सादर करुन विनंती करुन मावेजा मागितला असता अद्याप पर्यंतही आपल्या कार्यालयाने दिलेला नसल्याने मी अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे अर्ज केला असता त्यांनी कार्यकारी अभियंता , पाटबंधारे विभाग,बीड यांना दि.०७/१०/२०१९ रोजी पत्र देवुन भुसंपादन कायदा२०१३अन्वये दुरुस्तीचा मागितला असुन तरीही कार्यकारी अभियंता,पाटबंधारे विभाग,बीड हे या कामास जाणुन बुजून विंलब लावत आहेत परिणामी मला अद्याप मावेजा मिळालेला नाही.
उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही प्रशासनाकडुन माझा मावेजा मिळण्यास टाळाटाळ होत असल्याने तसेच माझे वयही खूप जास्त झाल्याने मी सतत आजारी असते औषधोपचारासाठी मला रक्कमेची अंत्यत आवश्यकता आहे.मी एक विधवा महिला असून माझे उत्पन्नाचे साधन असणारी माझी जमीनीच संपादीत झाली असल्याने मी ती कसत नाही त्यामुळे ती पडीक आहे.त्यामुळे मला उत्पन्नाचे कसलेही साधन राहिलेले नाही.या सर्व गोष्टींचा सारासार विचार होता मला माझ्या संपादीत जमीनीचा मावेजा तात्काळ मिळणे आवश्यक असल्याचे खोडवे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.मात्र वयोवृद्ध आमरण उपोषण करत असताना प्रशासन सहावा दिवस असूनही बघ्याची भूमिका घेत असल्याने नाराजीचा सूर निघत आहे.

No comments:

Post a Comment