तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 18 January 2020

जि.प. प्रा.शाळा माखणी येथे " बाल आनंदनगरी " उत्साहत संपन्न/प्रतिनिधी शेख शेहजाद
               येथुन जवळच असलेले माखणी (ता. पुर्णा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या ‘ आनंदनगरी ‘ उपक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खाद्य पदार्थाची दुकाने थाटुन  आपल्या व्यावहारिक ज्ञानाची चुनूक उपस्थितांना दाखवुन दिली.
माखणी येथील जि.प. प्रा.शाळेच्या प्रांगणावर दि. 18 जानेवारी रोजी मोठ्या उस्ताहत " बाल आनंदनगरी " कार्यक्रम संपन्न झाला. खाद्यपदार्थ विक्री उत्सवातुन विद्यार्थ्यांना वस्तूंची देवाण घेवाण व व्यवहारीक ज्ञानासह नाणी व  नोटा समजण्या बरोबरच  आनंद मिळतो. या साठी शाळेत दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावेळी शाळेतील छोट्या मुलांनी वेगवेगळ्या खाद्य पदार्थांची दुकाने थाटुन त्याची विक्री केली विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद देत या बाल व्यापाऱ्यांचे पदार्थ खरेदी करुन अस्वाद घेत कौतुक केले.
प्रारंभी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रंजित आवरगंड यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी फुलकळसचे केंद्रप्रमुख दयानंद स्वामी, चेअरमन संजयराव आवरगंड, माजी प.स.सदस्य गोविंदराव आवरगंड, सरपंच अंकुशराव आवरगंड,  सदस्य नवनाथ आवरगंड, चांदाजी आवरगंड, बापुराव पल्मपल्ली, माधव आवरगंड, सचिन आवरगंड, वसंतनाना आवरगंड, सदाशीव आवरगंड, राजु गाडे आदीसह पालका व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी  मुख्याध्यापक संजयकुमार जोशी, सहशिक्षिक राजकुमार ढगे, राम महाजन, गजानन पवार, सुरज पौळ, शेळके, शिक्षीका ज्योती झटे व शाळा व्यवस्थापण समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.
= वार्षिक क्रिडास्पर्धेचे उदघाटन =
यावेळी  वार्षिक क्रिडास्पर्धेचे उदघाटन अतिशय थाटा-माटात पार पडले.  क्रिडास्पर्धेचे उदघाटन गोविंदराव आवरगंड (माजी प.स.सदस्य)यांच्या हस्ते संपन्न झाले. फुलकळस केंद्रप्रमुख दयानंद स्वामी, सरपंच अंकुशराव आवरगंड यांची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment