तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

सोनपेठ येथे पत्रकार सन्मान व मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा समारंभात परळीचे पत्रकार प्रा. रविंद्र जोशी सन्मानित

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  सोनपेठ येथे राजीवगांधी महाविद्यालय व तालुका विधी सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार सन्मान व मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा समारंभात सोनपेठ न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. खिरापते व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पत्रकारिता विभागाचे डाॅ. प्रा. राजेंद्र गोणारकर यांच्या हस्ते  व मान्यवरांच्या उपस्थितीत परळीचे पत्रकार प्रा. रविंद्र जोशी यांचा गौरव करण्यात आला. 
       सोनपेठ येथील राजीव गांधी महाविद्यालय व तालुका विधी सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार दिन व मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा समारंभ पार पडला. या समारंभाला  सोनपेठ न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. खिरापते, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यम संकुलाचे प्रा. डाॅ. राजेंद्र गोणारकर, सहाय्यक शासकीय अभियोक्ता बी.एस. लोमटे, नागरी बँक सोनपेठ चे अध्यक्ष रमाकांत जहागीरदार, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. डी. आर.  मोकाशे , कै. राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी संस्था खडकाचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे, अॅड. अशोक तिरमले, प्र. प्राचार्य बालाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. 
     प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व संत ज्ञानेश्वर महाराज, बाळशास्त्री जांभेकर ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी अॅड. राठोड यांनी प्रास्ताविक केले. सहाय्यक शासकीय अभियोक्ता बी.एस. लोमटे, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. डी. आर. मोकाशे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी दिवाणी न्यायाधीश एस. एस. खिरापते यांनी कायदेविषयक सविस्तर मार्गदर्शन केले. तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यम संकुलाचे प्रा. डाॅ. राजेंद्र गोणारकर यांनी 'मराठी भाषा संवर्धनात वृत्तपत्रांचे योगदान'  या विषयावर सविस्तरपणे उपस्थितांना मार्गदर्शन केले. या समारंभात मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारीतेत सक्रियपणे काम करुन योगदान देणाऱ्या पत्रकार बांधवांना राजीव गांधी महाविद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व गौरवपत्र देउन सन्मानित करण्यात आले. यामध्ये परळीतील दै. पुढारी चे प्रतिनिधी प्रा. रविंद्र जोशी यांचा गौरव करण्यात आला. 
        सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन  प्रा. सी. बी. किरवले यांनी केले. कार्यक्रमाला अॅड. धबडे, अॅड. राठोड, तालुका विधी सेवा समितीचे कार्याध्यक्ष अंभोरे, यांच्यासह निलंगे, प्रा. सुमेध कांबळे, प्रा. नर्गिस शेख, प्रा. रेखा कांबळे, प्रा. दिक्षा सिरसाट, श्वेता चौहान, कैलाश भालेराव, बाळू भारती आदींसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment