तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ ह्या प्रवाह विरोधी महाणायीक भिमराव परघरमोल संग्रामपूर [ प्रतिनिधी] सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांनी प्रवाहाच्या विरोधात जावून तथा प्रचलित समाज व्यवस्थेच्या रुढी परंपरा , अंधश्रद्धा व मनिस्मृतींच्या नियमांना नाकारून आधुनिक समाज घडवण्याचा प्रयत्न केला असे प्रतिपादन तेल्हारा येथील व्याख्याता भिमराव परघरमोल यांनी सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती मध्ये पळशी झाशी येथे केले.
संग्रामपूर येथून जवळच असलेल्या पळशी झाशी येथील बुध्द विहारामध्ये जिजाऊ सावित्री यांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुंडलिक रहाटे अध्यक्ष सातपुडा आदिवासी व ग्रामीण शिक्षण संस्था पळशी झाशी हे होते , तर प्रमुख उपस्थिती मध्ये व्याख्याता भिमराव परघरमोल तेल्हारा , पद्माकर मारोडे अध्यक्ष जनहित गुरुदेव शिक्षण संस्था पळशी झाशी , वा. ता. भारसाकडे हे होते
तसेच मंचकावर राजेश नृपणारायान , वाघ ताई , महादेव धुरंधर , विनोद अढाऊ वैशाली मारोडे , विमल तायडे ग्रामपंचायत सदस्या , मनीष अवचार , हर्षा यादगिरे , आमले ताई , चीतोडे ताई यांची उपस्थिती होती.
    कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे कार्यक्रमाला सर्व जातधर्माच्या महिला उपस्थित होत्या. तोच धागा पकडून भिमराव परघरमोल आपल्या व्याख्यानामध्ये  पुढे म्हणाले की, आजपर्यंत आम्ही कधीच एका मंचकावर आलो नाही , तर का आलो नाही याचीही कारण मीमांसा झाली पाहिजे. त्यासाठी धर्माने आमच्यावर अनेक बंधने घातली होती जी बंधने राष्ट्रमाता जिजाऊनी चारशे वर्षांपूर्वी तर सावित्रीबाई फुले यांनी पावणे दोनशे वर्षांपूर्वी झुगारून दिली होती. त्याचप्रमाणे आमचेही वर्तन असावे असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश नृपणारायन यांनी केले तर आभार व संचालन प्रा. करुणानंद तायडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डी. आर. डी. चे सर्व महिला बचत गट , भिमकिर्ती युवामंडळ विशाखा महिला मंडळ , मूलनिवासी विद्यार्थी संघ यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला पुरुषांची उपस्थिती होती.

No comments:

Post a comment