तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 January 2020

कृती समितीचे औष्णिक विद्युत केंद्र कार्यालय समोर धरणे आंदोलन संपन्न


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  औष्णिक विद्युत केंद्र परळी येथील वीज कर्मचारी-अभियंता संघटना कृती समिती ने साखळी आंदोलन, प्रवेशद्वार बैठक, काळ्या फीत लावून निषेध, लेखणी बंद आंदोलन, दि.१८ रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन असे क्रमबद्ध आंदोलन संपन्न झाले. यात परळीतील जुने थर्मल २१० MW संच क्र.४ व ५ ची वैधता २०२५ पर्यंत असून देखील मुख्यालयाकडून हे संच बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. परळी केंद्र मस्ट रन च्या श्रेणीत नाही, तसेच परळी वीजनिर्मिती केंद्रातील सर्व संच पूर्ण क्षमतेने सुरु व्हावेत यासाठी डब्लू.सी.एल. या कंपनीकडून स्वस्त दराचा कोळसा खरेदी करावा. कोळश्याच्या वाहतुकीचा खर्च दुप्पट असल्याने विजेचा दरही जास्त आहे. भविष्यात हे संच पाण्याअभावी बंद राहू नयेत या करीता माजलगाव ते परळी थर्मल पाणी पुरवठा लाईन त्वरित पूर्ण करावी. वीज केंद्रातील संघटना सोबतच्या तक्रार निवारण बैठका घेण्यात याव्या, या व इतर मागणी करीता कृती समितीच्या माध्यमातून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. समन्वयक वैजनाथ चाटे सबॉर्डीनेट इंजिनीअर्स  असोसिएशन केंद्रीय पदाधिकारी अरूण गित्ते, झोन चे सहसचिव विशाल गिरे, वाहेदलीे सय्यद, भारतीय मजदुर संघाचे आबासाहेब कराड,केंद्रीय पदाधिकारी संभाजी मुंडे, भास्कर जोशी वर्कर्स फेडरेशनचे केंद्रीय पदाधिकारी सुधीर मुंडे, झोनचे अंकुश जाधव संदीप काळे, मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना केंद्रीय पदाधिकारी बप्पा वडमारे पदाधिकारी राहुल बनसोडे, भागवत देवकर, वीज कामगार संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष देविदास देवकते, झोन अध्यक्ष मजहर पठाण,धर्मराज म्हस्के, वीजनिर्मिती कामगार संघटना केंद्रीय अध्यक्ष डी.एस फड, उद्धव साहेबराव चव्हाण, अशोक मुंडे, डी.पी कुलकर्णी ,अतुल नागरगोजे, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय सचिव हरिराम गिते ,झोन अध्यक्ष रमेश मुंडे, मुरलीधर शिंदे, अभिमन्यू भिसे, अमोल शिंदे, असोसिएशन ऑफ केमिस्ट्री एस टी नागरगोजे, गोविंद नागरगोजे , सूर्यकांत मदने, पावर फ्रंट केंद्रीय पदाधिकारी डि के माने, जकेटीया, रत्नमाला देशमुख  तसेच या आंदोलनाला थर्मल पॉवर स्टेशन काँट्रॅक्टर्स अँड सप्लायर्स असोसिएशन चे अध्यक्ष अंगदभाऊ हाडबे, परळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संभाजी मुंडे, प्रकल्प ग्रस्त संघटनेचे महादेव दहिफळे तसेच परिसरातील सर्व सरपंच संघटनांनी पाठिंबा दिला.

No comments:

Post a comment