तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 29 February 2020

डोंगरगाव शाळेला आय एस ओ मानांकन खाजदार हेमंत पाटील याच्या हस्ते लोक अर्पण सोहळा पार पडलासाखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


सेनगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव केंद्र-कापडसिंगी  ता.सेनगाव या शाळेला सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षात हिंगोली जिल्ह्यातील पहिली आय.एस.ओ(I S O) नामांकन मिळाले. त्या  निमित्त आज हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील

व महंत प.पूज्य नेहरू महाराज पोहरादेवी यांच्या  हस्ते शाळेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला 


सेनगाव तालुक्यातील डोंगरगाव  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. 
यावेळी खासदार साहेबांच्या हस्ते हिंगोली लोकसभा मतदारसंघात पहिली ISO (Indian Standard Organization) ह्या दर्जाची शाळाचे मान मिळविल्याबद्दल सर्व  शिक्षकवृंद यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच स्थानिक खासदार विकास निधीतुन शाळेच्या विकासासाठी *हेमंत पाटील* यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाणी आर.ओ 
प्लांटसाठी *5 लक्ष* रुपये, गावातील मंदिरे ते शाळा पर्यंत सुसूज्ज रस्तासाठी *10 लक्ष*  रुपये जाहीर केले त्याबद्दल समस्त गावकरी मंडळी व शाळा समिती, शिक्षकवृंद यांच्या वतीने आभार मानण्यात आले. 

याप्रसंगी  महंत नेहरू महाराज मुख्य पुजारी पोहरादेवी  संस्थान, हिंगोली विधानसभेचे आमदार तान्हाजीराव मुटकुळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष देवकर, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, जीवककुमार कांबळे तहसीलदार सेनगाव, श्री.बेले सर गटविकास अधिकारी सेनगाव, चंद्रभागाबाई जाधव जि.प.सदस्य, माजी सभापती नारायणराव खेडकर,माजी जि.प.सदस्य हराळ मामा, गणेश हराळ, पं.स.सदस्य खुशाल हराळ,गटशिक्षणाधिकारी गव्हाणे सर,श्रीरंग राठोड,हिम्मत राठोड .ओम कोटकर, भागोराव राठोड,पुरुषोत्तम गडदे, यांच्या सह गावकरी मंडळी उपस्थित होते.तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

अभिनव विद्यालय राष्ट्रीय विज्ञान दिन विज्ञान प्रदर्शन भरवून साजरावैज्ञानिक दृष्टिकोनातूनच आधुनिक समाजाची विकास प्रक्रिया गतीमान झाली आहे -सूर्यकांत कातकडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ज्ञान प्रबोधिनी  विकास शिक्षण प्रसारक मंडळ  संचलित  अभिनव विद्यालय नेहरू चौक परळी  येथे  29 फेब्रुवारी  राष्ट्रीय  विज्ञान दिन  विज्ञान प्रदर्शन भरवून  संस्थेचे अध्यक्ष  राजाभाऊ जब्दे व संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव  परळी भूषण  साहेबराव फड तसेच प्रमुख अतिथी म्हणून दैनिक सोमेश्वर साथीचे संपादक बालासाहेब फड, संस्थेचे कार्यवाहक सूर्यकांत कातकडे, मुख्याध्यापक  प्रताप मुंढे ,सानप सर, के.एम. देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात सी व्ही रामन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून झाली या कार्यक्रमाचे प्रस्ताविक वर्ग आठवीचा विद्यार्थी ओमकार शिंदे यांनी केले वर्ग आठवी व नववी मधील विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनानिमित्त तयार केलेल्या भीतीपत्रकाचे अनावरण व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले संस्थेचे कार्यवाहक सूर्यकांत कातकडे यांनी विज्ञान दिनानिमित्त बोलताना वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच आधुनिक समाजाची विकास प्रक्रिया गतीमान झाली आहे असे प्रतिपादन केले त्यानंतर  के .एम. देशमुख  यांनी  अंधश्रद्धा निर्मूलन  व वैज्ञानिक दृष्टीकोण  समाजामध्ये कसा रुजवावा  याविषयी आपले विचार मांडले  त्यानंतर  सानप सर यांनी  आपले मनोगत व्यक्त केले  शाळेतील सहशिक्षक  संतोष मुंडे  यांनी  आजच्या विज्ञान प्रदर्शनानिमित्त  व विज्ञान दिनानिमित्त  सी .व्ही. रामन  यांची माहिती सांगितली सी.व्ही. रामन यांचा जन्म तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन्‌हे काही काळ बंगलोरातही होते, १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले.रमणचे ६ मे १९०७ रोजी लोकासुंदरी अम्मल (१८९२-१९८०) बरोबर लग्न झाले होते.त्यांना चंद्रशेखर आणि रेडिओ-खगोलशास्त्रज्ञ राधाकृष्णन हे दोन पुत्र होते.रमण हे सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांचे काका होते,ज्यांना पुढे १९३१ मध्ये चंद्रशेखर मर्यादेच्या शोधासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार (१९८३) जिंकला आणि तारकीय उत्क्रांतीसाठी आवश्यक असलेल्या अणू प्रतिक्रियेवर त्यांनी केलेल्या त्यानंतरच्या कार्यासाठी.आयुष्यभर,रमणने दगड, खनिज पदार्थांचे विस्तृत वैयक्तिक संग्रह विकसित केले आणि मनोरंजक प्रकाश-विखुरलेल्या गुणधर्मांसह साहित्य,जे त्याने आपल्या जगातून प्राप्त केले आहे आणि भेट म्हणून.नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी तो अनेकदा लहान हाताळण्या एवढा स्पेक्ट्रोस्कोप घेऊन जात असे . सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या अनेक योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे.  डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉ. सी. व्ही. रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा. शिवाय तो त्यांचा जन्म अथवा मृत्युदिन निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकाला पाठवला आणि ज्याला पुढे १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख का निवडू नये? अखेर ती तारीख निघाली २८ फेब्रुवारी.लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्‍या विज्ञानाचे महत्त्व सांगण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी साजरा केला जातो.मानवी कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रात सर्व क्रियाकलाप, प्रयत्न आणि कृत्ये प्रदर्शित करणे.सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि  विज्ञान क्षेत्रात विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी हे साजरे केले जाते.देशातील वैज्ञानिक विचारांच्या नागरिकांना संधी देणे.लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करण्यासाठी . असे प्रतिपादन सहशिक्षक संतोष मुंडे यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग सातवीतील  विद्यार्थिनी कु . राधिका राडीकर हिने केले या कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

अभिनव प्रा व मा विद्यालयाचे संस्थापक सचिव परळी भूषण साहेबरावजी फड साहेब यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची ऐतिहासिक भूमिका साकारणारे खा.डॉ.अमोल कोल्हे यांची सदिच्छा भेट


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- छत्रपती संभाजी महाराजांच्या शूरतेचा  इतिहास दाखवणारे ऐतिहासिक महानाट्याचे परळीत आयोजन केलेले आहे. यासाठी संभाजी महाराज यांच्या भूमिकेत असणारे मा. खा. डॉ. अमोलजी कोल्हे हे परळीत आले असता. त्यांचे अभिनव प्रा व मा विद्यालयाच्या वतीने संस्थेचे संस्थापक सचिव साहेबरावजी फड साहेब यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

अंबाजोगाईत मराठी भाषा विद्दापीठाची निर्मिती करा; विधान परिषदेत आ. संजय दौंड यांची मागणी


अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- 
अंबाजोगाईत मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे ही मागणी जागतिक मराठी भाषा दिनिनिमित्ताने विधान परिषदेत आ. संजय दौंड यांनी केली आहे.
     अंबाजोगाई शहरात मराठी भाषेचे आद्दकवी मुकुंदराज महाराजांची समाधी आहे. स्वामी मुकुंदराजांनी संस्कृत भाषेतील धार्मिक साहित्याचे रुपांतर सर्वप्रथम सामान्य लोकांना समजेल अशा मराठी भाषेत केले असल्यामुळे या शहराकडे मराठी भाषेचे जनक शहर म्हणून ओळखल्या जाते. या शहरात मुकुंदराज स्वामी यांच्या स्मृरणार्थ  मराठी भाषा विद्यापीठ व्हावे अशी या विभागातील नागरीकांची खुप जुनी मागणी आहे.
    अंबाजोगाई शहरात मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे असा ठराव ८३ व्या अखील भारतीय मराठी संमेलनात घेण्यात आला असून, मराठवाडा साहित्य परीषद, अंबाजोगाई नगर परीषदेने या मागणीसाठी आज पर्यंत सातत्याने राज्यशासनाकडे निवेदनाव्दारे मागणी ही केली आहे.
  राज्यशासनाने यापुर्वी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी विद्दापीठ नियुक्ती संदर्भात समिती गठीत केली होती. या समितीत प्रख्यात साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचा समावेश आहे. या समितीने आपला अहवाल शासनाकडे यापुर्वी सादर केलेला आहे.
राज्यात नागपुर येथे सांस्कृत विश्वविद्यालय तर वर्धा येथे हिंदी विश्वविद्यालय आहे. याच धर्तीवर अंबाजोगाई येथील उपलब्ध असलेल्या १००० एकर शासकीय जमीनवर हे मराठी भाषा विद्यापीठ उभारावे अशी मागणी आ. संजय दौंड यांनी विधान परिषदेत केली आहे.

जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रकल्प, फळबागा यांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी बुलडाणा, दि. २९:  जिल्ह्यातील गटशेती, शेततळे, शेतकरी उत्पादक कंपन्या यांचे प्रकल्प, प्रयोगशील शेतकरी यांची शेती, फळबागा आदींची जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी २७ फेब्रुवारी रोजी पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 
  गटशेती प्रोत्साहन व सबलीकरण योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी यांनी सर्वप्रथम  हतेडी ता. बुलडाणा येथील राष्ट्रमाता जिजाऊ महिला दुध उत्पादक शेतकरी गटाच्या दुग्ध व्यवसाय प्रकल्पाला भेट दिली. जवळपासच्या गावामध्ये दुध उत्पादन होणेसाठी गटामार्फत संकलन केंद्र व विक्री केंद्र उभारणीसाठी प्रयत्न करावे असे त्यांनी सुचविले. त्यानंतर बिरसिंगपुर ता. बुलडाणा येथील विदर्भ शेतकरी बचत गट यांचे अंडी उत्पादन प्रकल्पास भेट देऊन गटाचे अध्यक्ष व संचालक यांना प्रकल्पाचे स्वच्छता व आरोग्यदायी अंडी उत्पादन करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. मकरध्वज खंडाळा ता. चिखली येथील पेनगंगा शेतकरी व शेती उत्पादक गट यांचे मसाला प्रक्रिया प्रकल्पास भेट देऊन गटाचे अध्यक्ष व संचालक यांचेशी शेतकऱ्यांसोबत करारशेती पध्दतीने हळदीचे उत्पादन घेणे तसेच हळदीपासुन पावडर, टॅब्लेट, गोल्ड मोका मिल्क यासारखे उत्पादन तयार करणे विषयी चर्चा केली. जानेफळ ता, मेहकर येथे जानेफळ शेतकरी उत्पादक कंपनी यांचे सिताफळ प्रक्रिया प्रकल्पास भेट देऊन कंपनी संचालक यांचे सोबत कंपनीचा व्यवसाय, ब्रैडिंग व पॅकेजींग बाबत मार्गदर्शन व चर्चा केली. तसेच  विविध उत्पादन तयार करणे, आंतरराष्ट्रिय दर्जेदार उत्पादने घेऊन उत्पादनाचे पॅकींग, ब्रॅण्डिंग  करुन विविध ठिकाणी गटामार्फत मार्केटींग व्यवस्था उभी करणे व गटाचे स्वतःचे स्टॉल लावणे याबाबत मार्गदर्शन केले. केळवद ता. चिखली येथे भारतीय जैन संघटना अंतर्गत करण्यात आलेल्या नाला खोलीकरण कामांची पाहणी केली. लव्हाळा ता.मेहकर येथे शेतकरी परशराम हरिभाऊ लहाने यांचे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत संत्रा फळबागेची पाहणी केली. केळवद येथे मनरेगा अंतर्गत शेतकरी नारायण खरात यांचे शेतातील पेरु लागवड फळबागेची पाहणी करुन, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना, भाऊसाहेब फुंडकर लागवड योजना व मनरेगा योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना यासारखे एकत्रित प्रकल्प राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सूचित केले.  
   त्यानंतर मालगणी ता. चिखली येथे शेतकरी सतिश कुळकर्णी यांचे शेतातील कांदा बिजोत्पादन प्लॉटला भेट दिली व कांदा बियाणे उत्पादन वाढीसाठी परागीभवन आवश्यक असल्याने मधुमक्षिका पेटी प्रत्येक कांदा बिजोत्पादन क्षेत्रावर लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.  मालखेड ता. मेहकर येथे गणेश लंबे यांचे शेतातील शेडनेट मधील बिजोत्पादन प्रक्षेत्राची पाहणी केली व शेडनेट मध्ये सेंद्रीय बिज उत्पादन घेणेसंदर्भात मार्गदर्शन केले.                     
      कोलारा ता, चिखली येथे सौ. कमलाबाई शंकर बोरसे यांचे शेतातील राष्ट्रिय फलोत्पादन अभियान अंतर्गत योजनेअंतर्गत सामुहिक शेत तळयांची पाहणी करुन सामुहिक शेततळयामध्ये जोडधंदा म्हणुन मत्सपालन शेती करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी सूचित  केले. त्यानंतर गजरखेड ता. मेहकर येथे ग्राम कृषि संजीवनी समितीसोबत पोखरा योजना राबविण्याबाबत येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी यांचे समवेत उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे, नारायण देशमुख, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, तालुका कृषि अधिकारी चिखली व कृषि विभागाचे इतर अधिकारी व  कर्मचारी उपस्थित होते.

जमील पठाण
8805381333

डोंगर खंडाळा येथे स्त्री स्वाभिमान व ग्राम लाईट बल्ब निर्मिती प्रकल्पाचा जिल्हाधिकारी यांच्याहस्ते शुभारंभ


बुलडाणा, दि. २९: 
तालुक्यातील  डोंगर खंडाळा येथे  सीएससी अंतर्गत  स्त्री स्वाभिमान व ग्राम लाईट बल्ब निर्मिती प्रकल्पाचे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या हस्ते २८ फेब्रुवारी रोजी शुभारंभ करण्यात आला.  यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन. एस,  जिल्हा परिषद सदस्या  सौ.जयश्रीताई शेळके , सौ.साविताताई बाहेकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री चोपडे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी उत्तम चव्हाण,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बाळकृष्ण कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडित,पंचायत समिती सदस्या  सौ.नंदिनीताई कल्याणकर, सरपंच सौ.मालतीताई चांडक , गटविकास अधिकारी श्रीकृष्ण सावळे आदी उपस्थित होते.
   कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांनी गावातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन वापरण्याचे फायदे,  मासिक पाळीमध्ये होणारे त्रास व महिला व पुरुषांचे आरोग्य यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार श्री पवार , जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक योगेश जाधव, जिल्हा व्यवस्थापक जयेश कठोरे, रितेश झनके, आदित्य टिकार आदींनी प्रयत्न केले.सदर प्रकल्प हा डोंगर खंडाळा येथील  सतीश देहाडराय व  उमेश इंगळे, सी.एस.सी. केंद्रचालक व प्रकल्प चालक यांनी कार्यान्वित केला आहे.

जमील पठाण
8805381333

एमपीएससी 'एनटी - ड' आरक्षण डावलल्याप्रकरणी व 'एनटी - क' जागा कमी केल्या प्रकरणी धनंजय मुंडे घेणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेटमुंबई (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पीएसआय भरती प्रक्रियेत ६५० जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, यामध्ये एनटी - ड प्रवर्गातील उमेदवारांना नियमाप्रमाणे २% आरक्षण देण्यात आले नाही, तसेच एनटी - क प्रवर्गातील उमेदवारांना केवळ २ च जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत; याप्रकरणी एनटी- ड व एनटी - क प्रवर्गातील विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर व्हावा यासाठी येत्या दोन दिवसात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत तातडीची बैठक घेऊन शासन निर्णयाप्रमाणे सदर दोन्ही प्रवर्गासाठी शासन निर्णयाप्रमाणे जागा आरक्षित करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी अशी विनंती करणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी ट्विट करून दिली आहे. 

काल (दि.२८) रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरून दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब साठी संयुक्त पूर्व परीक्षा -२०२० ची जाहिरात क्रमांक ०५/२०२० प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये राज्यसेवेतील विविध पदांसह पोलीस उपनिरीक्षक गट - ब या पदासाठी ६५० जागांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती नमूद करण्यात आली आहे. 

या ६५० जागांपैकी ४७५ जागा विविध प्रवर्गांसाठी आरक्षित केलेल्या आहेत, शासन निर्णयाप्रमाणे यापैकी २% जागा एन टी - ड (भ ज - ड) प्रवर्गांसाठी आरक्षित असणे अभिप्रेत आहे, परंतु सदर प्रवर्गांसाठी एकही जागा या जाहिरातीत आरक्षित करण्यात आलेली नाही.

त्याचप्रमाणे एनटी - क (धनगर) प्रवर्गांसाठी आरक्षित जागांपैकी ३.५% जागा आरक्षित असायला हव्या होत्या परंतु या प्रवर्गांसाठी केवळ २ जागा देण्यात आल्या आहेत. 

या दोन्ही संवर्गातील अनेक विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यास व भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारची तयारी व अभ्यास करत आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये आरक्षण डावलल्याप्रकरणी प्रचंड निराशा व संताप व्यक्त आहे. 

महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या दोन दिवसात आपण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत तातडीची बैठक घेणार असून, या प्रवर्गावरील अन्याय दूर करून शासन निर्णयाप्रमाणे दोन्ही संवर्गांच्या ठराविक टक्केवारीनुसार आरक्षण देत सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत गृहमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे ना. मुंडे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांचे हृदविकाराच्या तीव्र धक्क्याने निधनबीड (प्रतिनिधी) :-राष्ट्रीय कीर्तनकार तथा हभप भरतबुवा रामदासी यांचे हृदविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले,मृत्यूसमयी ते 57 वर्षाचे होते .ख्यातनाम कीर्तनकार म्हणून त्यांचा नावलौकिक होता.
मूळ गेवराई तालुक्यातील रुई धानोरा या गावचे रहिवासी असलेले भरतबुवा यांचे देशभरात नाव होते .गुजरात, मध्यप्रदेश, बिहार,दिल्ली यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे कीर्तन लोकप्रिय होते.प्रचंड व्यासंग,अभ्यासपूर्ण मांडणी,साहित्य,इतिहास याविष्यावरील त्यांचे ज्ञान वादातीत होते .त्यांच्या वाणीतून निघालेला प्रत्येक शब्द हा प्रमाण होता .संतसाहित्य तसेच इतिहास कालीन विषयावर त्यांची हजारो कीर्तने गाजलेली आहेत .
शनिवारी सकाळी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले होते,तेथेच त्यांना हृदयविकार चा झटका आला अन त्यांची प्राणज्योत मालवली .त्यांच्या पश्चात पत्नी प्रज्ञा,मुलगा ऋतुपर्ण ,भाऊ असा परिवार आहे .

भगवान गडावरील शस्त्र चोरीचा पोलिसांनी तात्काळ छडा लावून आरोपीस जेरबंद करा अन्यथा आंदोलन - रामराव गित्ते


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  :- राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे वास्तव्य असलेल्या भगवान गडावरील ऐतिहासीक रायफल आणि तलवार चोरीस गेल्या घटनेचा पोलिसांनी तात्काळ छडा लावून आरोपीस अटक करावे अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लोकसेवा चे रामराव गित्ते यांनी एका निवेनाव्दारे शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत कदम व संभाजीनगरचे पोलिस निरीक्षक बालासाहेब पवार यांच्या मार्फत गृहमंत्री यांच्या कडे दिला आहे.
      याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  अहमदनगर जिल्ह्यांतील सीमेवर असलेल्या, पाथर्डी तालुक्यातील खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेल्या  भगवानगडावर असलेल्या, भगवान बाबांच्या वापरातील वस्तूंच्या संग्रहातील 2 बोअरची रायफल सापडत नसल्याचे (ता.27) सकाळी उघडकीस आले.  घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक राठोड हे भगवान गडावर गेले आहेत. गडावरील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केल्यानंतर काही माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. त्यानुसार, मध्यरात्रीच्या सुमारास एका दुचाकीवर आलेल्या तिघांनी रायफल घेऊन गेल्याचे दिसत आहे. त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत.या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र भगवानगड हे ओळखले जाते.भगवानबाबांनी उपयोगात आणलेल्या वस्तूंचे हे भव्य संग्रहालय आहे. दरम्यान या प्रकरणातील बहुजन समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या संत भगवान बाबांचे  ऐतिहासिक साहित्य चोरीला जाणे ही गंभीर घटना असल्याचे रामराव गित्ते यांनी सांगितले आहे.  राज्याचे गृहमंत्री मा.ना.अनिल देशमुख साहेब व मा.पोलिस अधीक्षक साहेब बीड व अहमदनगर यांनी विशेष लक्ष देऊन आरोपीस तात्काळ अटक करावी अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे. आरोपीस तात्काळ अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामराव गित्ते यांच्यासह किशोर गित्ते, नरसिंग सिरसाट, शाम गित्ते यांनी केली आहे.

राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन ; बीडसह राज्यभरातील वारकरी संप्रदायावर शोककळाबीड (प्रतिनिधी) :- गेल्या 40 वर्षापासून देशात सांप्रदायीक आणि नारदीय कीर्तन सेवा देणारे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. भरतबुवा रामदासी यांचे आज शनिवारी (दि.29) सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची माहिती कळताच अनेकांना धक्का बसला असून जिल्हा रूग्णालयात मोठी गर्दी झाली होती. वारकरी सांप्रदायाची पताका गेल्या अनेक वर्षापासून एकनिष्ठपणे सांभाळणार्‍या भरतबुवांनी बीड येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठाणचा कीर्तन महोत्सव देशभरात पोहचवला. मागील 16 वर्षापासून ते या महोत्सवाचे उत्कृष्ट संयोजक म्हणून जबाबदारी भरतबुवांच्या निधनाने सांप्रदायीक चळवळीची मोठी हानी झाली आहे.

संत चरित्राचे गाढे अभ्यासक असलेले राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.भरतबुवा रामदासी यांना आज शनिवारी दुपारी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून जिल्हा रूग्णालयात आणण्यात आल्यानंतर वैद्यकिय अधिकार्‍यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. भरतबुवांच्या अकाली निधनाची वार्ता वार्‍यासारखी  शहरभर पसरली अन् अनेकांना त्यांच्या निधनाने धक्का बसला. माहिती मिळताच जिल्हा सामान्य रूग्णालयात सर्व क्षेत्रातील नागरिकांना प्रतिष्ठितांनी गर्दी केली होती. भरतबुवा रामदासी हे मुळचे  रूई धानोरा (ता.गेवराई) येथील रहिवासी असून बीड शहरातील सराफा रोडवरील राममंदिर गल्लीत ते वास्तव्यास होते. गेल्या 40 वर्षापासून देशभरात सांप्रदायिक, वारकरी आणि नारदीय कीर्तन सेवा केली आहे. बीडचे नाव सांप्रदायीक चळवळीच्या माध्यमातून देशाच्या पटलावर पोहचवण्यात भरतबुवांचा सिंहाचा वाटा होता. तसेच बीड येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठाणचा कीर्तन महोत्सव देशभरात पोहचवला. भरतबुवांच्या निधनाने सांप्रदायिक चळवळीचे मोठी हानी झाली आहे. भरतबुवांच्या पश्चात पत्नी,मुलगा, सुन, नात, दोन भाऊ, भावजई आदी परिवार आहे. 

उद्या सकाळी अंत्यसंस्कार

 भरतबुवा रामदासी यांच्या पार्थिवावर उद्या रविवारी (दि.1) मार्च रोजी सकाळी 9 वाजता शहरातील मोंढा रोडवरील अमरधाम स्मशानभूमीत  अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.तत्पूर्वी सराफा लाईन, राम मंदिर गल्ली येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढली जाणार आहे.

कीर्तन महोत्सवाचा आधारस्तंभ हरपला-गौतम खटोड

खटोड प्रतिष्ठानच्या कीर्तन महोत्सवाच्या सुरुवातीपासूनच राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी महाराजांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले. त्यांचे अकाली निधन झाल्याने धक्का बसला. सोळा वर्षापासून बीडमध्ये कीर्तन महोत्सवाची परंपरा अव्याहत सुरु ठेवण्यासाठी रामदासी महाराजांनी अलौकीक कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा महोत्सव राज्यभरात पोहचला. महाराजांच्या निधनाने कीर्तन महोत्सव पोरका झाला असून महोत्सवाचा आधारस्तंभ हरपला आहे अशा शब्दात प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड व सचिव सुशील खटोड यांनी शोक भावना व्यक्त केल्या.

बीडच्या कीर्तन महोत्सवाचे प्रणेते

राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी हे प्रचंड अभ्यासू, व्यासंगी आणि परखड वक्ते म्हणून सुपरिचित होते. त्यांनी अनेक तरुणांना कीर्तनाचे शास्त्र शुद्ध प्रशिक्षणही दिले.  मागील 16 वर्षापुर्वी स्व.झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय कीर्तन  महोत्सवाची मुर्हुतमेढ राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवांनी रोवली. कीर्तन महोत्सवाच्या मंडप उभारणीपासून ते सांगतेपर्यंत संयोजनापासून सुत्रसंचालनापर्यंत भरतबुवा रामदासी महाराज महत्वाची भुमिका महत्वाची असायची. 31 डिसेंबर 2019 ते 10 जानेवारी 2020 या कालावधीत झालेला 16 व्या कीर्तन महोत्सवाची भरतबुवांच्या प्रासादिक कीर्तनानेच सांगता झाली होती. बीड येथील कीर्तन महोत्सवाला देशभरात पोहचवण्यात भरतबुवांचे मोठे योगदान  राहिले.

नॅकवर आधारीत राज्यस्तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

प्रतिनिधी
पाथरी:-येथील स्व नितिन महाविद्यालयत आक्यूएसी आणि श्री शिवाजी महाविद्यालय परभणी यांच्या संयक्त विद्यमाने एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन शनिवार २९ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय व्यवस्थापण समिती  सदस्य कुणालराव लहाने  हे होते तर या कार्यक्रमाचे उदघाटक श्रीशिवाजी महाविद्यालय परभणीचे प्राचार्य डॉ बी यु जाधव  यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ रोहीदास नितोंडे यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहूणे म्हणून
केकेएम महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ ए बी चिंदुरवार, प्राचार्य डॉ राम फुन्ने, आयक्यूएसी  समन्वयक प्रा डॉ बी टी निर्वळ यांची या वेळी उपस्थिती होती. या वेळी नॅक च्या अनुशंगाने महाविद्यालयाने नेमकी कोणती कामे करणे गरजेचे आहे. या विषयी प्राचार्य डॉ बी यु जाधव, डॉ चिंदूरवार डॉ रोहिदास नितोंडे यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले. या वेळी बोलतांना प्राचार्य डॉ राम फुन्ने यांनी या नंतरची राज्यस्तरीय कॉन्फरन्स येत्या पंधरा दिवसात घेण्याचे जाहिर केले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी नॅक संबंधी प्राध्यापकांनी,कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निर्सन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ बी टी निर्वळ यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा रंजित गायके तर आभार प्रा डॉ हरी काळे यांनी मानले. या राज्यस्तरीय कार्यशाळे साठी महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

स्वप्न पहा, विज्ञान-तंत्रज्ञान आत्मसात करा,जगणे सुंदर होईल.. प्रा.डॉ. मेश्राम

महिला महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
                येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ' राष्ट्रीय विज्ञान दिना ' निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  
             यावेळी प्रमुख पाहुणे प्रा .डॉ .डी.व्ही. मेश्राम, संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ. विद्या देशपांडे, प्रा.डॉ. कवडे, प्रा.डॉ. यल्लावाड उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.डॉ. कवडे यांनी केले. प्रा.मेश्राम  आपले मनोगत व्यक्त करताना, '' ज्ञान , विज्ञान , तंत्रज्ञान हे प्रगतीचे घटक आत्मसात केल्याशिवाय यशाचे दार उघडणार नाही, म्हणून स्वप्न पहा , विज्ञान , तंत्रज्ञानाचा स्वीकार करा , जगणं सुंदर होईल . " असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय समारोप डॉ .विद्या देशपांडे यांनी केला. यावेळी प्रा .डॉ . वर्षा मुंडे, डॉ. व्ही.डी.गुळभिले, डॉ. संगीता कचरे, प्रा. राजश्री कल्याणकर, प्रा. शरद रोडे, प्रा. क्षितिजा देशपांडे , प्रा.आर.पी. शहाणे व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा .डॉ. यल्लावाड, आभार प्रा.डॉ. संगीता कचरे यांनी केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्यासह राज्याच्या अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली - धनंजय मुंडेमुंबई/बीड (प्रतिनिधी) :- (दि.२९)  राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी (वय - ५७) यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने अकाली निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्यासह राज्यातील अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

बीड जिल्ह्याच्या संत परंपरेतील अत्यंत मानाचे नाव, राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. भरत बुवा रामदासी यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाल्याची बातमी ऐकून आपल्याला  तीव्र दुःख झाल्याचे व्यक्त करतच धनंजय मुंडे यांनी ह.भ.प.भरतबुवा रामदासी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

भरतबुवा हे अलीकडील काळातील नारदीय व सांप्रदायिक अशी दोन्ही प्रकारची कीर्तने व त्यामाध्यमातून सामाजिक प्रबोधन करण्यासाठी बीड जिल्ह्यातच नव्हे ते सबंध राज्यात प्रसिद्ध होते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी मोठमोठे किर्तन महोत्सव यशस्वीरित्या आयोजित केले. समाज प्रबोधनासह माणसे जोडण्याची उत्तम कला भरत बुवांना प्राप्त होती.

मितभाषी, अत्यंत संयमी स्वभाव, नम्र वृत्ती ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये सर्वज्ञात आहेत. अध्यात्मातील त्यांचा गाढा अभ्यास, अभंगवणीवर असलेले प्रभुत्व त्यांना राष्ट्रीय किर्तनकार ही उपाधी देऊन गेले. ख्यातनाम कीर्तनकार म्हणून त्यांचा सर्वत्र नावलौकिक होता.

मूळ बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई धानोरा या गावचे रहिवासी असलेले भरतबुवा यांचे देशभरात नाव होते. गुजरात, मध्यप्रदेश, बिहार, दिल्ली यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे कीर्तन लोकप्रिय होते. प्रचंड व्यासंग, अभ्यासपूर्ण मांडणी, साहित्य, इतिहास, संतसाहित्य तसेच इतिहास कालीन विषयावर त्यांची हजारो कीर्तने गाजलेली आहेत.

आज त्यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्यासह राज्याच्या अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांनी दिलेला शब्दांचा अनमोल ठेवा पुढील अनेक पिढ्याना जगण्याची दिशा देत राहील. किर्तनरुपी सेवेतून त्यांनी दिलेले योगदान आम्ही  स्मरणात ठेवू. असे म्हणत धनंजय मुंडे यांनी आपण रामदासी कुटूबीयांच्या व जिल्ह्यातील शोकसागरात बुडालेल्या समस्त वारकरी संप्रदायाच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे. 

राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. भरतबुवा रामदासी यांच्या पार्थिवावर उद्या (दि. ०१) सकाळी ९.००वा. बीड शहरातील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

भरतबुवा रामदासी यांच्या निधनाने संत साहित्याचा गाढा अभ्यासक हरपला ; पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावनामुंबई (प्रतिनिधी)  :- दि. २९ ---- आपल्या अमोघ वाणीतून समाजाला सुसंस्कारित विचाराचे बीजारोपण करणारे राष्ट्रीय किर्तनकार भरतबुवा रामदासी यांच्या निधनाने संत साहित्याचा एक गाढा अभ्यासक हरपला असून धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. 

   ह.भ.प. भरतबुवा रामदासी यांच्या निधनाचे वृत्त समजताच धक्काच बसला, परवाच बीड येथे त्यांची भेट झाली होती. गेल्या दोन तीन दशकापासून आपल्या अमोघ वाणीतून आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून समाजात चांगल्या विचारांचे बीजारोपण करण्याचे महान कार्य त्यांनी  सातत्याने केले. महाराष्ट्रच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली आदी राज्यातही त्यांचा मोठा शिष्यवर्ग आहे, किर्तनाच्या माध्यमातून त्यांनी  समाजाला एकीची, समानतेची शिकवण दिली तसेच समाज प्रबोधना बरोबरच राष्ट्रहित जोपासण्याचा संदेश दिला. संत साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. किर्तनाच्या माध्यमातून बीड जिल्ह्याची मान त्यांनी उंचावली. किर्तन महोत्सवाच्या आयोजनात त्यांचे योगदान कधीही न विसरण्याजोगे आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आणि भरतबुवा रामदासी यांचा विशेष स्नेह होता, त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटूंबियांवर कोसळलेल्या दुःखात मी व माझा परिवार सहभागी आहे, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो अशा शब्दांत ना पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

गुरूदास सार्वजनिक ग्रंथालयात मराठी गौरव दिन साजरामराठी भाषा संवर्धनासाठी नव्या पिढीने योगदान द्यावे- प्रा.राम चौधरी

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :-  तालुक्यातील घाटनांदुर येथील गुरूदास सार्वजनिक ग्रंथालयात वि.वा.शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणुन उत्साहात साजरा करण्यात आला. 


प्रारंभी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा.आर.ए.चौधरी (धर्मापुरी), कवी वामन जयवीर, साहित्यीक दत्ता वालेकर,स.तु.जाधव यांची तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथमित्र नरहरी मंठेकर आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रा.राम चौधरी यांनी सांगितले की,आजचे युग स्पर्धेचे आहे.मराठी भाषेवर इतर भाषा हावी होत आहेत.तेंव्हा अशा काळात मराठी भाषेचे जतन, संवर्धन होणे गरजेचे आहे. अन्यथा दिवसेंदिवस प्रमाण भाषा लुप्त होण्याची शक्यता आहे.त्यामुळे मातृभाषेची आस्मिता सर्वांनी जपली पाहिजे,मराठी ही इतर भाषेपेक्षा समृद्ध आहे व ती अनेक कवी, साहित्यीक यांनी समृद्ध केली आहे.कवी वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी आज मराठीचा गौरवदिन आपण साजरा करत आहोत.नव्या पिढीने मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आपले योगदान द्यावे असे प्रतिपादन प्रा.राम चौधरी (धर्मापुरी) यांनी केले.यावेळी गुरूदास सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. अध्यक्षीय समारोप ग्रंथमित्र नरहरी मंठेकर यांनी केला.तर या प्रसंगी कवी वामन जयवीर, दत्ताञय वालेकर,सतिष जाधव यांनी आपल्या कविता सादर केल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्ताञय वालेकर यांनी करून उपस्थितांचे आभार ग्रंथमित्र नरहरी मंठेकर यांनी मानले.या कार्यक्रमास गुरूदास ग्रंथालयाचे सभासद,वाचक,बालवाचक, महिला वाचक आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

'आयटा' च्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न....
परतूर /प्रतिनिधी
ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन परतूर शाखेच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरपर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील डॉक्टर झाकीर हुसेन हायस्कूल येथे श्री सिद्दिकी निसार अहमद यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे श्री मोहम्मद अकबर गोरमेंट करिअर कौन्सिलर डाईट परभणी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक शरीफ पठाण यांनी केले. व प्रमुख वक्ते श्री मोहम्मद अकबर यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले व शालांत परीक्षेची तयारी कशी करावी. नंतर कोण कोणत्या क्षेत्रांमध्ये आपण आपले करिअर घडवू शकतात याची माहिती देऊन पुढील शैक्षणिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाला शेख नवाज, काशीफ देशमुख ,मुख्तार बागवान, रिझवान सिद्दिकी ,खमर फारुकी, सय्यद जुनेद ,आमेर पठाण ,सय्यद नोमान व इतर शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नसिर खतीब व आभार प्रदर्शन शेख अब्दुल्ला यांनी मानले.

पंकजाताई पालकमंत्री नसल्याचा पहिलाच फटका, बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना बसला अन्‌ तुटपुंजा विमा पदरात पडला, आठवण येते याच नेतृत्वाचीबीड जिल्ह्याचं नेतृत्व भाजपा नेत्या पंकजाताई यांनी पाच वर्षे करत असताना जिल्ह्यात कशा प्रकारे विकासाची महाचळवळ उभा राहिली? एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत पदरात पडली. पाच वर्षात करोडो रूपायांचा विमा सतत जिल्ह्याला मिळाला हे लोकांनी पाहिलं. मात्र त्या आता सत्तेच्या बाजुला जाताच पालकमंत्री नसल्याचा फटका जिल्ह्यात शेतकऱ्यांना बसला. 2019चा तुटपुंजा विमा शेतकऱ्यांना मिळाला. खरं तर यापुर्वी कधीच नव्हतं तेवढं नुकसान यंदा अवकाळी पावसाने शेवटच्या टप्यात झालं. सोयाबीन 100 टक्के हातुन गेले आणि असं असताना हेक्टरी विमा 3000 पासुन जास्तीत जास्त अपवादात्मक 18000 पर्यंत यंदा आला.शेवटी लोकांना आठवण आली ती पंकजाताई याच नेतृत्वाची....
बीड जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री म्हणुन पंकजाताईचा एक काळ जिल्ह्यातील तमाम जनतेने पाहिलेला आहे. पालकमंत्र्याच्या अंगी असलेलं पालकत्व आणि त्याच्यातली जबाबदारी याचं कर्तव्याच्या अधिन राहुन तंतोतंत पालन करताना या जिल्ह्यात अठरापगड जातीधर्माच्या लोकांना घेवुन त्यांनी काम केलं आणि विकास काय असतो?हे लोकांना दाखवुन दिलं. पालकमंत्र्यानं पालकाच्या भुमिकेत काम करताना कुणावर अन्याय करू नये, माझा जिल्हा माझी माणसं एवढेच सुत्र डोळ्यासमोर ठेवुन न भुतो न भविष्यति अशी कामगिरी त्यांनी जिल्ह्यात केली. महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात एवढा निधी गेला नसेल तेवढा दुप्पट निधी एकट्या बीड जिल्ह्यात त्यांच्यामुळे आला. कारण देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये वजनदार मंत्री म्हणुन त्यांची भुमिका होती. राज्यात कुठलीही योजना सुरू होताना अगोदर बीड हे नाव घ्यावाच लागत होतं. यापुर्वी या जिल्ह्याने अनेक पालकमंत्री पाहिले. मात्र केवळ विकास आणि विकास करणारं नेतृत्व पंकजाताईच्या रूपाने एकमेव पाहिलं. कोटीच्या कोटी उड्डाणे या जिल्ह्यात विकासाची त्यांनी आणली. मुळात त्यांच्याकडे दुरदृष्टी आणि सामान्य जनतेचं कल्याण ही त्यांची स्वच्छ भुमिका असल्याने योजनेचा फायदा समाजातील उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित वर्गाला मिळावा ही त्यांची आग्रही भुमिका जनकल्याणाची होती. बीड, परळी, नगर रेल्वेचा प्रश्न असो किंवा जिल्ह्यात उभा केलेले राष्ट्रीय महामार्ग असोत. भगिनी तथा जिल्ह्याच्या विद्यमान खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांना सोबत घेवुन केंद्राच्या साऱ्या योजना जिल्ह्यात राबवल्या. महाराष्ट्र शासनाच्या जेवढ्या योजना ग्रामविकासासाठी असतात त्या सर्व योजना जिल्ह्यात राबवणारा एकमेव पालकमंत्री तत्कालीन काळात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरं तर बीड जिल्ह्याची घाणेरडी राजकिय संस्कृती बदलुन वैचािरक सुसंस्कृत जिल्हा निर्माण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेताना पालकमंत्री म्हणुन पाच वर्षात एकाही पोलीस ठाण्याला फोन केलेला नाही. त्यामुळे सुडाचे राजकारण किंवा द्वेषाचे राजकारण हे त्यांच्या ऱ्हदयाला शिवले नाही. राज्यात सत्तांतर झाले. दुर्दैवाने त्यांचा परळी विधानसभा मतदारसंघात पराभव झाला. परिणामी सत्तेच्या बाजुला त्यांना रहावे लागले.मात्र साधी एक गोष्ट लक्षात घ्या की चांगलं काम करणाऱ्याची आठवण लोकांना नेहमीच येते तो अनुभव गेल्या दोन दिवसापासुन जिल्हावासियांच्या ओठावर दिसतो आहे. पाच वर्षात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्यापोटी करोडो रूपये मिळाले. तीन वर्षापुर्वी एकट्या बीड जिल्ह्यात 900 कोटीचा विमा मिळाला. तदनंतर सलग कधी 300 कोटी तर कधी 200 कोटी सोयाबीनसारख्या पिकाला हेक्टरी 34000 पर्यंत विमा मिळाला. तो याच बीड जिल्ह्यात. त्यामुळे बिचाऱ्या शेतकऱ्यांना लाखोच्या घरात विम्यापोटी पैसे मिळाले. कारण पालकमंत्र्यांचा तशा प्रकारे महसुल आणि विम्या  कंपन्यावर धाकही होता. सतत बैठका आणि आणेवारी बाबत दक्षता त्या घ्यायच्या. म्हणुन विमा कधीच कमी मिळाला नाही. मात्र पंकजाताई सत्तेच्या बाजुला गेल्या आणि बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांची कशा प्रकारे चेष्टा सुरू आहे? हे आता लोकांना दिसत आहे. 2019 खरीप पिकाचा विमा दोन दिवसापासुन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळायला सुरू झाला. प्रत्येकाच्या नावावर बॅंकेत पैसे वर्ग होत आहेत. मात्र आज लोकांना विम्याची मिळणारी रक्कम पाहुन प्रत्येकाला पंकजाताईच्या नेतृत्वाची आठवण होवु लागली आहे. हेक्टरी 3000 रूपये सात ते बारा हजार अशा प्रकारची मदत कधीच त्यांच्या काळात मिळाली नाही. मात्र यंदा प्रचंड नुकसान झालं. अवकाळी पावसाने सोयाबीनसारखं पिक पदरात 100 टक्के पडलं नाही. खरं तर खरीपाची आणेवारी 5 टक्के सुद्धा प्रत्येक तालुक्यात नाही. मात्र असे असताना शेतकऱ्यांच्या पदरात जी मदत पडली ती तुटपुंजी व अवकाळीच्या संकट जखमेवर मीठ चोळणारी म्हणावी लागेल. विम्याचे धाड धाड मॅसेज पडले आणि बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शेतकऱ्यांना पंकजाताईचा चेहरा डोळ्यासमोर आला. आपलं नेतृत्व सत्तेत नाही?, याची प्रचिती केवळ चार-पाच महिन्यात विम्याच्या माध्यमातुन लोकांना आली. राजकारणात शेवटी सक्षम नेतृत्व कामाचं असतं. वैयक्तिक लाभापेक्षा सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, अठरापगड जातीधर्म आणि विविध वर्ग समुदायाला ज्या नेतृत्वाचा फायदा होतो ते नेतृत्व तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायला हवं आणि नाही जपलं तर कशा प्रकारे संकटाचा सामना करावा लागतो?याचं उदाहरण याचि देहि, याचि डोळा जनता बघत आहे. पंकजाताईच्या काळात करोडो रूपायाचा विमा आला आणि आता ताई सत्तेत नाहीत तर त्याचा फटका बसला. म्हणुन विम्याचे मॅसेज मोबाईलच्या ठोकड्यावर धडकताच पुन्हा पंकजाताईची आठवण बळीराजाला आली. विशेष म्हणजे विमा देताना प्रत्येक तालुक्यात भेदभाव झाला आहे. खरं तर संपुर्ण जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला आणि शंभर टक्के नुकसान खरीप पिकाचे झाले. सर्व तालुक्याची आणेवारी नियमात बसणारीच आहे. उदा.पन्नास टक्यापेक्षा कुठेच कमी नाही. मात्र असं असताना यंदा विमा आणि राज्य सरकार यांच्या संगनमताने हेक्टरी आलेला विमा त्याच्यातही मंडळनिहाय भेदभाव झाला आहे. उदा.धारूर तालुक्यात 3000 हेक्टरी तर परळी तालुक्यात 6000 हेक्टरी एखाद्या मंडळात 18000 अशा प्रकारची व्यावहारिक गणितं डोळ्यासमोर ठेवुन विमा कंपनीने बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं. म्हणुन आज प्रत्येकालाच पंकजाताईची आठवण आली. खरं तर रब्बीचा विमा यंदा कुणीही भरून घेतला नाही. असं कधीच मागं पाच वर्षात झालं नाही. तोही फटका मोठ्या प्रमाणावर बसला आहे. सांगायचं तात्पर्य एवढेच आहे की यापेक्षा अधिक आर्थिक संकटाचा सामना शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला भविष्यात होईल यात शंका वाटत नाही. असं असलं तरी पंकजाताई या नेतृत्वाकडुन आजही लोकांना अपेक्षा आहेत. त्यांनी सरसकट शेतकऱ्यांना सोयाबीनचा विमा मिळावा यासाठी पुढाकार घेवुन या प्रश्नावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली तर कदाचित फायदा होईल.एकुणच ही सारी पार्श्र्वभुमी पाहिल्यानंतर पंकजाताई सत्तेत नसल्यानंतर पहिल्या चार महिन्यातच कसा फटका शेतकऱ्यांना बसला?हे याचि देहि, याचि डोळा जिल्ह्यातील लोकांना कळुन चुकले हे मात्र नक्की.
-दखल राम कुलकर्णी

वाशिम पोलिस विभागाची कर्तव्यतत्परता,अवघ्या ४ तासात शोधले ६ मुलेफुलचंद भगत
वाशिम-पोलिसांच्या कामगिरिवर तसेच धिम्यागतीने चालत असलेल्या तपासकामांबद्दल अनेकजन तोंडसुख घेत असतात तर तशा बहुदा बातम्याही वाचन्यात येतात परंतु पोलिसही कर्तव्यतत्परता दाखवुन आपली भुमिका निभावत असल्याचे वाशिम जिल्ह्यात केलेल्या तपासकामांवरुन पोलिसांना सॅलुटही केल्याबिगर राहवत नाही.सविस्तर वृत्त असे की, ता २८ फेब्रुवारी रोजी ठाणेदार शिवाजी लष्करे हे पोलीस ठाणे आसेगाव येथे हजर असतांना सायंकाळी ७ . ३० वा सुमारास फोनव्दारे माहीती मिळाली की , शिवणी दलेलपुर येथील यात्रेतुन ६ मुले हरविले आहेत . ठाणेदार लष्करे यांनी सदर बाबींची तात्काळ माहीती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली पोलीस अधिक्षक ,वसंत परदेशी व अपर पोलीस अधिक्षक विजयकुमार चव्हाण यांचे मार्गदर्शनात मुलांचा शोध सुरू केला . ठाणेदार लष्करे व त्यांचे पथक विनाविलंब शिवणी दलेलपुर यात्रेत रवाना होऊन हरविलेल्या मुलांबाबत माहीती घेतली असता राजु सुदामा गुप्ता नावाचा इसम उत्तर प्रदेश येथील राहणारा असुन तो यात्रेमध्ये पाळणा / झुला लावून आपली व कुंटुबाची उपजिवीका चालवितो . राजु गुप्ता यांची पत्नी मरण पावली असुन त्यांना १ ) सोनू राज गुप्ता , वय १४ वर्ष ,पुजा राजु गुप्ता , वय १० वर्ष , दुर्गा राजु गुप्ता , वय ०७ वर्ष ४, राधीका राजु गुप्ता , वय ०४ वर्ष अशा ४ मुली व ,दादु राजु गुप्ता , वय ०३ वर्ष ,रूद्र राजु गुप्ता , वय ११ महीने असे मुले असुन राजु गुप्ता हा दारू पिण्याच्या सवईचा असुन मुलांना त्रास देतो . वडीलांची सदर बाब मोठी मुलगी सोनु गुप्ता यांना न आवडल्यामुळे राग मनात धरून ती उर्वरीत ५ भावंडासह कोणालाही न सांगता निघुन गेली . मिळालेल्या माहीतीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांचे आदेशाने दोन पथक तयार करून पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी तसेच ठाणेदार लष्करे यांनी आपआपले वाशिम जिल्हयात व लगतच्या जिल्हयात नेटवर्क वापरून निघुन गेलेल्या मुलांची माहीती घेण्याचा प्रयत्न केला . तसेच राजु गुप्ता यास बारकाईने विचारपुस केली असता राजु गुप्ता यांनी माहीती दिली की , आम्ही वेगवेगळया जिल्हयातील यात्रेमध्ये जावून झुला / पाळणा यात्रेत लावुन आलेल्या कमाईवर उदरनिर्वाह करतो . काही दिवसापूर्वी आम्ही रिसोड , मेहकर भागात वास्तव्यास होतो सदर माहीती वरून ठाणेदार आसेगांव यांनी आपले १ पथक रिसोड मेहकर भागात रवाना केले . तसेच ठाणेदार यांनी या भागातील आपले खबरी यांना वरील मुलांबाबत माहीती सांगुन माहीती घेतली असता खबऱ्याकडुन माहीती मिळाली की , मेहकर येथे सोनु गुप्ता हीची मैत्रीण राहत असुन तिच्या वडीलांचे नाव महादेव साबळे आहे . त्यांचे कडे ५ / ६ मुले आले असुन ते मेहकर येथुन बाहेर जाण्याच्या तयारीत आहेत . क्षणाचाही विलंब न करता ठाणेदार लष्करे यांनी पोउपनि किशोर खंडारे व त्यांचे पथक माहीती मिळाल्या प्रमाणे मेहकर येथे पाठवून वरील६मुले ताब्यात घेतले व पोलीस ठाणे आसेगांव येथे आनून मुलांचे वडील राज गुप्ता यांचे ताब्यात दिले . चार तासात मुलांचा शोध लावणाऱ्या पथकाचा सर्वत्र कौतुक होत आहे.पोलिसांनी सतर्कतेने आणी कर्तव्यतत्परतेने केलेल्या कामगिरीबद्दल पोलिस विभागही निश्चितच कौतुकास पाञ आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835,8459273206

‘गो-गर्ल-गो’ धावणे स्पर्धेत पूजा चिकने जिल्ह्यात प्रथम


सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. २९ _ क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय  ‘गो-गर्ल-गो’ १०० मीटर धावणे ही स्पर्धा दि. २९ फेब्रुवारी २०२० रोजी बीड येथे पार पडली. 
        यामध्ये जि .प. प्रा. शाळा विठ्ठलनगर, केंद्र तलवाडा येथील कु. पुजा अनिल चिकणे हिने प्रथम क्रमांक पटकावला. दि.८ फेब्रुवारी रोजी पुणे येथे होणाऱ्या राज्य स्तरिय स्पर्धासाठी निवड झाली. गटशिक्षणाधिकारी राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. बांगर (तलवाडा बीट), श्री प्रविण काळम पाटील, श्रीमती खाडे मॅडम, केंद्रीय  मुख्याध्यापक श्री. बारगजे, श्री. मरकड सर, शा व्य. समितीचे अध्यक्ष  श्री. विठ्ठल गर्जे, केंद्रातील शिक्षकापासून ते गावकरी अधिकारी पदाधिकारी तसेच वर्गशिक्षक श्री. वनवे बी. टी. सर व मुख्याध्यापक श्री. हात्ते एम. एन. आदिंनी तिचे कौतुक केले व राज्यस्तरावरही तीचा प्रथम येईल अशी आशा करत तिला सर्वांनी शुभेच्छा दिल्या

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

शंभुराजेंच्या जाज्वल्य इतिहासाने परळीकर भारावले!

धनंजय मुंडेंनी शिवशाही दृष्टीपथात आणली, महानाट्य पाहण्यासाठी जनसागर लोटला!

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. 29....
      आपल्या अभूतपूर्व लढाईने इतिहास निर्माण करणारे छत्रपती संभाजी राजे यांच्या जिवनावरील महानाट्याने परळीकर अक्षरशः भारावून गेले आहेत. पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी थेट शिवशाहीच परळीकरांच्या दृष्टीपथात आणली आहे. शंभुराजेंचा जाज्वल्य पराक्रम आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी अबालवृद्ध, महिला पुरूष याची देही, याची डोळा महानाट्य पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करीत आहेत. यामध्ये महिला आणि तरूंणींची संख्या लक्षणीय आहे.

     ना. धनंजय मुंडे यांच्या संयोजनाला तोड नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ते अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील स्व. पंडीतअण्णा मुंडे रंगमंचावर प्रचंड यशस्वी ठरलेल्या आणि खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी अभिनीत केलेल्या "शिवपुत्र संभाजी" या ऐतिहासिक महानाट्याने प्रयोग सादर केले जात आहेत. हत्ती, घोडे प्रत्यक्ष आणुन ईथे शिवकाळ उभा केला आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी आपल्या पराक्रमाने इतिहासाची पाने सजवली आहेत. हाच दैदीप्यमान इतिहास परळीकर सध्या अनुभवत आहेत.

 धनंजय मुंडे यांनी परळीत एकप्रकारे इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावरील या नाटकाने केवळ सुशिक्षितच नाही तर ज्यांना काहीच कळत नाही अशा बालकानांही मंत्रमुग्ध केले आहे.

      महानाट्याच्या आज दुसऱ्या दिवशीही प्रेक्षकांनी मैदानावर तुडुंब गर्दी केली होती.

Friday, 28 February 2020

एकाच रात्रीत तीन ठिकाणी झालेल्या घरफोड्याचा तपास लागेना,चोरीच्या घटनेने गावात घाबराटीचे वातावरण, ग्रामस्थ आंदोलांनाच्या भूमिकेत

परतूर — प्रतिंनिधी
तालुक्यातील दैठना खुर्द येथे एकाच रात्रीत चोरट्यांनी तीन ठिकांनी घरफोड्या करून घरातील सात तोळे सोन्याचे व पाच तोळे चांदीचे दागिने व नगदी 44 हजार रुपये असा एकूण एक लाख एकाहत्तर हजाराचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना 16 फेब्रुवारी रोजी पहाटे उघडकीस आली होती. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरूद्ध आष्टी पोलिस ठाण्यात पत्रकार भारत सवने यांच्या फिर्यारदिवरून गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र चोरीच्या घटनेला बारा दिवस उलटून गेले असून आष्टी पोलिसांच्या हाती अद्याप कुठलाच तपास लागत नसल्याने ग्रामस्थामध्ये नाराजी पसरली आहे. चोरीच्या घटनेने गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या भूमिकेत असल्याचे बोलले जाते.
अधिक माहिती अशी की दैठना येथे पत्रकार भारत सवने यांच्या घरी चोरट्यांनी घराच्या बाहेरून भीतीवरून घरात प्रवेश करून बंद खोलीचे कुलूप लावलेले उघडून घरात कपाटात ठेवलेले बारा ग्रामचे कानातील वेलजोडी, चार ग्रामचे कानातील, दोन ग्रामचे मंगळसूत्र, लहान बाळाचे कानातले पाऊण ग्रामचे, एकतोळा चांदीचे हातकडे, व पंचवीस हजार रुपये नगदी असा एकूण 66 हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. यांच्या घराजवळ राहणार्याप अरुणाबाई पांडे यांच्या घरात कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले दहा ग्रामची मोहनमाळ, दहा ग्रामची एकदाणी, पाच ग्रामची सोन्याची अंगठी व नगदी एकोणवीस हजार रुपये असा एकूण 69 हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याच गावातील गोविंद राजेभाऊ सवने यांच्या घरातून लोखंडी पेटीतील एक तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, साडेआठ ग्रामची  कानातील झुंबर जोड, पाच ग्राम मण्याची पोत, दोन ग्रामची नाकातील नथ, चार तोळे चांदीचे चैन व मनगट्या असा एकूण अंदाजे 36 हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
या घटनेतील चोरट्यांचा तपास करण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ञाना पाचारण करण्यात आले होते. या एकाच रात्रीत चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोड्या केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात या चोरीच्या घटनेला बारा दिवस उलटून गेले अद्याप कुठलाच तपास लागत नसल्याने पोलिस या घटनेचा तपास चालूच असल्याचे सांगत नेहमीप्रमाने पोलिस उत्तर देत आहे. यातच आष्टी पोलिसांचा चोरट्यावर वचक राहिला नसल्याने आणि मागील चोर्यांचचा तपास लागत नसल्याने चोरटे डोकेवर काढत असल्याने ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष सानप हे करीत आहेत. तपासा बाबत विचारले असता तपास चालूच असल्याचे सांगण्यात आले.
परतूर तालुक्यातील होणार्याा चोर्यां च्या तपासाकडे जिल्हा पोलिस अधिक्षक लक्ष घालून चोरट्यांच्या मुसक्या आवळणार ? की पुन्हा चोरटे आणखी काही दिवसांनी तालुक्यात घरफोड्या करून पोलिसांना तपास करण्याचे आव्हान उभा करणार असा सवाल उपस्थित होत आहे.दैठण्यातील दोन वर्षापूर्वीच्या चोरीचा तपासही गुलदस्त्यातच.
 दोन वर्षापूर्वी दैठना येथील माजी जि.प. सदस्य अमृतराव सवणे यांच्या घरी चोरट्यांनी घरफोडी करून अंदाजे पाच सहा लाखाचा मुद्देमाल चोरीला गेला होता. मात्र या  घटनेला येणार्‍या पाडव्याला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. अद्याप ही या घटनेचा तपास लागला नसल्याने तपास गुलदस्त्यात असल्याचे समजते. या प्रकरणामुळे पोलिसांच्या तपासाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. चोरीच्या या घटनेचा तपास लागत नसल्याने चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढून एकाच रात्रीत तीन ठिकाणी घरफोड्या करून पोलिसांना तपास करण्याचे आव्हान उभे केले आहे. या घटनेला ही बारा दिवस उलटून तपास लागत नसल्याने ग्रामस्थामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

जिवंत बाळाला केले मृत घोषित, महिलेने रस्त्यातच दिला गोंडस मुलीला जन्म......आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर चे फर्मान.......


परतूर /प्रतिनिधी
 परतुर तालुक्यातील आष्टी येथील  प्राथमिक आरोग्य केंद्रात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मौजे सातारा वाहेगाव येथील स्वाती जगताप या  गर्भवती महिलेला तुमच्या बाळाचा पोटातच मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाळ काढण्यासाठी शहरातील हॉस्पिटलमध्ये जावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले होते.
मात्र वाहनाने रूग्णालयात जात असताना रस्त्यातच महिलेची डिलिव्हरी झाली आणि स्वाती जगताप गर्भवती महिला यांनी गोंडस मुलीला जन्म दिला. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचा गलधान कारभार हलगर्जीपणा समोर आला आहे. डॉक्टरांनी केलेल्या या हलगर्जीपणावरून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक करीत आहे.

सविस्तर वृत्त असे की,परतूर तालुक्यातील आष्टीसर्कल मधील सोपारा वाहेगाव येथील स्वाती जगताप व त्यांचे नातेवाईक काल रात्री अंदाजे दहा वाजेच्या सुमारास आष्टी येथील आरोग्य केंद्रात स्वाती जगताप यांना गर्भावस्थेत असतानाचा त्रास होत होता त्याकरिता तपासणी करण्याकरिता आष्टी येथील आरोग्य केंद्रात  गेल्या आता तेशील रात्रपाळी दिवटी करत असणाऱ्या सिस्टर ने  असे  जगताप कुटुंबाना आपल्या गर्भवती मुलीच्या पोटातील बाळ मृत झाल्याचे सांगितले व बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे ऐकून नातेवाईकांना धक्का बसला. त्यानंतर महिलेचे प्राण वाचवायचे असतील तर बाळाला बाहेर काढावे लागेल असे करण्या करीता  शहरातील  डॉक्टरांकडून ट्रेटमेंट घ्यावी लागणार असेही सांगण्यात आले.
सदर कुटुंबीय आपल्या मुलीला घेऊन गाडीने दुसऱ्या रूग्णालयात जात असतांना रस्त्यातच महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सध्या महिलेची आणि बाळाची प्रकृती उत्तम आहे. घडलेल्या प्रकारावर महिलेच्या नातेवाईकांनी हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई
करण्याची मागणी केली आहे.

मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांच्या समस्यांबाबत सकारात्मक विचार करणार -धनंजय मुंडे


 मुंबई, (प्रतिनिधी) :-  राज्यातील  मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांना देण्यात आलेल्या  निधीबाबतीत महसूल विभाग आणि सामाजिक न्याय विभाग  संयुक्तपणे तपासणी करणार  आहे.तपासणी अहवालाच्या अनुषंगाने समस्या सोडवण्या साठी शासन सकारात्मक निर्णय घेईल असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

 मंत्रालयात राज्यातील अर्थसहाय्य प्राप्त मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेचे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या विविध समस्या सोडवण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

 श्री मुंडे म्हणाले,  मागासवर्गीयांची औद्योगिक प्रगती व्हावी त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे यासाठी राज्य मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांना उद्योग उभारणीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. यामध्ये 372 संस्थांना निधी मंजूर करण्यात आला होता. यातील यातील बऱ्याच संस्था सुस्थितीत असून काही संस्थांचे  काम सुरू आहे. काही संस्था अद्याप काहीच करू शकले नाहीत. या सर्व बाबींची समितीकडून तपासणी करण्यात येईल. तपासणी एक महिण्यात करण्यात येणार आहे.

 संस्थाना देण्यात आलेल्या नोटीसांबाबत न्याय व विधी विभागाचा सल्ला घेणार आहे.कमेटी स्थापन करण्यासाठी गरज भासल्यास शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल. समस्या सोडविल्यानंतर उद्योग उभारणी करण्यात येणा-या सर्व प्रकारचे कामे, निविदा प्रक्रिया, निधी वितरण हे संस्थांना न देता संबंधित यंत्रणेला वर्ग करण्यात येणार असल्याचे श्री मुंडे यांनी सांगितले 

या बैठकीला सामाजिक न्याय राज्य मंत्री विश्वजीत कदम,आमदार राजूबाबा आवळे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन , आयुक्त प्रविण दराडे, उपसचिव ढेंगळे आदी उपस्थित होते.

अभिनव प्रा व मा विद्यालयाचे संस्थापक सचिव परळी भूषण साहेबरावजी फड साहेब यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची ऐतिहासिक भूमिका साकारणारे खा.डॉ.अमोल कोल्हे यांची सदिच्छा भेटपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- छत्रपती संभाजी महाराजांच्या शूरतेचा  इतिहास दाखवणारे ऐतिहासिक महानाट्याचे परळीत आयोजन केलेले आहे. यासाठी संभाजी महाराज यांच्या भूमिकेत असणारे मा. खा. डॉ. अमोलजी कोल्हे हे परळीत आले असता. त्यांचे अभिनव प्रा व मा विद्यालयाच्या वतीने संस्थेचे संस्थापक सचिव साहेबरावजी फड साहेब यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

अभिनव विद्यालय राष्ट्रीय विज्ञान दिन विज्ञान प्रदर्शन भरवून साजरावैज्ञानिक दृष्टिकोनातूनच आधुनिक समाजाची विकास प्रक्रिया गतीमान झाली आहे -सूर्यकांत कातकडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ज्ञान प्रबोधिनी  विकास शिक्षण प्रसारक मंडळ  संचलित  अभिनव विद्यालय नेहरू चौक परळी  येथे  29 फेब्रुवारी  राष्ट्रीय  विज्ञान दिन  विज्ञान प्रदर्शन भरवून  संस्थेचे अध्यक्ष  राजाभाऊ जब्दे व संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव  परळी भूषण  साहेबराव फड तसेच प्रमुख अतिथी म्हणून दैनिक सोमेश्वर साथीचे संपादक बालासाहेब फड, संस्थेचे कार्यवाहक सूर्यकांत कातकडे, मुख्याध्यापक  प्रताप मुंढे ,सानप सर, के.एम. देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात सी व्ही रामन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून झाली या कार्यक्रमाचे प्रस्ताविक वर्ग आठवीचा विद्यार्थी ओमकार शिंदे यांनी केले वर्ग आठवी व नववी मधील विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनानिमित्त तयार केलेल्या भीतीपत्रकाचे अनावरण व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले संस्थेचे कार्यवाहक सूर्यकांत कातकडे यांनी विज्ञान दिनानिमित्त बोलताना वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच आधुनिक समाजाची विकास प्रक्रिया गतीमान झाली आहे असे प्रतिपादन केले त्यानंतर  के .एम. देशमुख  यांनी  अंधश्रद्धा निर्मूलन  व वैज्ञानिक दृष्टीकोण  समाजामध्ये कसा रुजवावा  याविषयी आपले विचार मांडले  त्यानंतर  सानप सर यांनी  आपले मनोगत व्यक्त केले  शाळेतील सहशिक्षक  संतोष मुंडे  यांनी  आजच्या विज्ञान प्रदर्शनानिमित्त  व विज्ञान दिनानिमित्त  सी .व्ही. रामन  यांची माहिती सांगितली सी.व्ही. रामन यांचा जन्म तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन्‌हे काही काळ बंगलोरातही होते, १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले.रमणचे ६ मे १९०७ रोजी लोकासुंदरी अम्मल (१८९२-१९८०) बरोबर लग्न झाले होते.त्यांना चंद्रशेखर आणि रेडिओ-खगोलशास्त्रज्ञ राधाकृष्णन हे दोन पुत्र होते.रमण हे सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांचे काका होते,ज्यांना पुढे १९३१ मध्ये चंद्रशेखर मर्यादेच्या शोधासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार (१९८३) जिंकला आणि तारकीय उत्क्रांतीसाठी आवश्यक असलेल्या अणू प्रतिक्रियेवर त्यांनी केलेल्या त्यानंतरच्या कार्यासाठी.आयुष्यभर,रमणने दगड, खनिज पदार्थांचे विस्तृत वैयक्तिक संग्रह विकसित केले आणि मनोरंजक प्रकाश-विखुरलेल्या गुणधर्मांसह साहित्य,जे त्याने आपल्या जगातून प्राप्त केले आहे आणि भेट म्हणून.नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी तो अनेकदा लहान हाताळण्या एवढा स्पेक्ट्रोस्कोप घेऊन जात असे . सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या अनेक योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे.  डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉ. सी. व्ही. रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा. शिवाय तो त्यांचा जन्म अथवा मृत्युदिन निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकाला पाठवला आणि ज्याला पुढे १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख का निवडू नये? अखेर ती तारीख निघाली २८ फेब्रुवारी.लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्‍या विज्ञानाचे महत्त्व सांगण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी साजरा केला जातो.मानवी कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रात सर्व क्रियाकलाप, प्रयत्न आणि कृत्ये प्रदर्शित करणे.सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि  विज्ञान क्षेत्रात विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी हे साजरे केले जाते.देशातील वैज्ञानिक विचारांच्या नागरिकांना संधी देणे.लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करण्यासाठी . असे प्रतिपादन सहशिक्षक संतोष मुंडे यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग सातवीतील  विद्यार्थिनी कु . राधिका राडीकर हिने केले या कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात मागासवर्गीय मजूरांसाठी शेळीपालन व्यवसाय स्वतंत्र योजना राबविणार - धनंजय मुंडेमुंबई, दि. २८: राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील मागासवर्गीय गरीब व ऊसतोड व वीटभट्टी महिला मजुरांना शेळीपालन प्रकल्पाकरिता नवीन स्वतंत्र योजना राबविणार असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

 मंत्रालयात आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील मागासवर्गीय गरीब ऊसतोड व वीटभट्टी महिला मजूर यांना शेळीपालन प्रकल्पासाठी निधी मंजूर करण्याकरिता आयोजित बैठकीत ते बोलत होते.

 पशुसंवर्धन विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेमध्ये मागासवर्गीय गरीब ऊसतोड मजुर लाभार्थ्यांची निवड ही मर्यादित असल्याने अनेक लाभार्थी वंचित राहातात,याकरिता  सामाजिक न्याय व विशेष सहाय  विभागाच्यावतीने स्वतंत्र महिला बचत गटांकरिताकरीता नवीन योजना राबवून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.

 नवीन सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत स्वतंत्रपणे  राबविण्यात येणारी ही योजना पशुसंवर्धन विभागाच्या नियंत्रणाखाली आणि सामाजिक न्याय विभागाचा निधीने राबविण्यात येणार आहे. क्षेत्रीय स्तरावर  पशुधन अधिकारी हे काम पाहतील. पशुसंवर्धन विभाग आणि सामाजिक न्याय विभाग  संयुक्तपणे लाभार्थ्यांची निवड करतील असे सांगून श्री मुंडे म्हणाले,ही योजना सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी आमदार दीपक आबा साळुंके, पशुसंवर्धन विभागाचे सहसचिव माणिक गुट्टे,दि.रा.डिंगळे यांची उपस्थित होती.

भगवान गडावरील चोरी प्रकरणातील आरोपींना अटक करा-आ.नमिता मुंदडाबीड (प्रतिनिधी) :- अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर पाथर्डी तालुक्यात असलेल्या भगवानगडावरील चोरी प्रकरण आता विधिमंडळात गेले आहे. हा मुद्दा केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी शुक्रवारी विधानसभेत मांडला असून आरोपींच्या अटकेची मागणी केली आहे. भगवानगडावरील संत भगवान बाबा यांच्या ऐतिहासिक वस्तूसंग्रहालयातील २ बोअरची रायफल आणि तलवारीची चोरी झाल्याचे गुरुवारी उघडकीस आले होते. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकशीदरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या तीन संशयितांच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहे. दरम्यान, संत भगवान बाबा हे महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असून गडावर चोरी झाल्यामुळे राज्यभरातील भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी विधिमंडळात केली आहे.

मराठा समाजाच्या संस्थेला बंद पाडू नका - अमित घाडगे पाटीलपुणे (प्रतिनिधी) :-
मराठा समाजातील तरूणांचे भवितव्य असलेली, महाराष्ट्रामधील अनेक तरूणांना शैक्षणिक मद्दत करणारी सारथी संस्था आहे.
संस्थे बद्दल गेले अनेक दिवसापासून सरकार ने बिनबुडाचा आरोप करत त्या संस्थेमधील कामकाज बंद करून येणारे बजेट थांबून मराठा समाजाचे मोठे नुकसान केले आहे. गेले चार दिवस झाले संस्थेतील तारादूत बेमुद्दत अंदोलन करत आहेत. आज पुणे येथे आंदोलन करणाऱ्या तारादूतांना पाठींबा देण्याकरता गेलो असता तेथील आंदोलकांची माहिती घेतली. ३५० च्या आसपास युवक व युवतीचा या उपोषणामध्ये समावेश आहे, आणि त्यातले १२ तारादुतांची शारीरिक परिस्थिती खुप खालवली गेली असता त्यांना नजीकच्या हाॅस्पिटल मध्ये दाखल केले गेले व एक तारूदूत आंदोलकास ह्रदयविकाराचा झटका आल्याची माहिती कळाली. मराठा समाजाने मोठ्या संघर्षातून मिळवलेल्या सारथी संस्थेला बंद करू नका असे आवाहन मी मराठा समाजाच्या वतीने सरकारला करतो. मराठा समाजाशी खेळ कराल तर मराठा क्रांती ठोक मोर्चा काय करू शकतो हे मागील काळात दिसले आहे. पुन्हा रस्त्यावर येण्यास भाग पाडू नका, तातडीने सारथी संस्थेचे कामकाज सुरु करा अस मराठा ठोक मोर्चाच्या वतीने मी मराठा ठोक मोर्चाचा समन्वय या नात्याने सरकारला आवाहन करतो. यावेळी भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई होत्या.

सोनपेठ तालुक्यात विज्ञान दिन सर्वत्र उत्साहात संपन्न


सोनपेठ : तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थामधून विज्ञान प्रदर्शन, विज्ञान विषयक प्रश्नउत्तरांच्या स्पर्धा, भित्तीपत्रक तयार करणे यासह अनेक वैज्ञानिक कार्यक्रमांचे आयोजन करून विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
तालुक्यातील कै. रमेश वरपुडकर कनिष्ठ महाविद्यालय, कै. राजाभाऊ कदम विद्यालय, जी. प. केंद्रीय विद्यालय, जी. प. प्रा. शाळा वाणीसंगम, कै. बाजीराव देशमुख विद्यालय शेळगाव, वनस्पतीशास्त्र विभाग, कै. रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ येथे विज्ञान दिनाच्या निमित्ताने वैज्ञानिक उपक्रम राबवण्यात आले. तालुक्याच्या शैक्षणिक वर्तुळात या निमित्ताने उत्साहाचे वातावरण दिसून आले. कै. रमेश वरपुडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले भित्तीपत्रकाचे विमोचन हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, आयक्युएसी समन्वयक प्रा.डॉ. मुकुंदराज पाटील व मार्गदर्शक शिक्षिका प्रा.आरती बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष रणखांब तर आभार प्रा. डॉ. मुक्ता सोमवंशी यांनी मानले.
कै. राजाभाऊ कदम विद्यालयात विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले, या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्घाटक शिक्षण विस्तार अधिकारी शौकत पठाण, प्रमुख पाहूणे डॉ. गणेश मुंडे, डॉ. पवार, डॉ. चव्हाण, व्ही. एस. पारेकर हे होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम हे होते, सुत्रसंचालन दयानंद स्वामी तर आभार दत्ता नरहारे यांनी मानले.
कै.बाजीराव देशमुख विद्यालय,शेळगाव येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.इयत्ता 5 वी ते इयत्ता 9 वी पर्यंतच्या मुलांनी विविध प्रयोग सादर करून केला,त्यानंतर विज्ञानदिनी विज्ञानदिनाचे महत्व सांगून विज्ञानदिन संपन्न झाला. विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वैष्णवी काळे, प्रमुख पाहुणे रुपाली काळे,आरती चव्हाण, ओंकार जाडे होते.तर कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.दुर्गा जाधव तर आभार प्रदर्शन कु.स्वाती देशमुख हिने केले.
जी. प. केंद्रीय शाळा सोनपेठ
येथील विद्यार्थ्यांचे विविध वैज्ञानिक प्रयोग सादर करण्यात आले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीप्राचार्य माणिक निलंगे,प्रमुख पाहुणे विजय पोपडे, सुत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड यांनी केले.
जी. प. शाळा वाणीसंगम
येथे विज्ञानजत्रा आयोजीत करण्यात आली होती, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उद्घाटक  संदिपान झिरपे,
प्रमुख पाहुणे पोनि. गजानन भातलवंडे, गटविकास अधिकारी श्री खुडे, सरपंच बाबुराव काळे,पो.पा.शेषेराव चव्हाण, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक नागनाथ जाधव,दत्ता केशव पवार,संतोष डांगे,सुत्रसंचालन श्रीमती शकुंतला घेरे यांनी तर आभार श्रीमती अश्विनी भावसार यांनी मानले यावेळी विद्यार्थी व नागरीक यांची मोठी उपस्थिती होती.

पाथरी तालुका भाजपा पदाधिकारी निवडी जाहिर

प्रतिनिधी
पाथरी:-तालुका भाजपा  काही पदाधिकारी यांच्या नव्याने निवडी माजी आ मोहनराव फड  यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या.
 त्यात  तालुका उपाध्यक्ष म्हणून विष्णू सिताफळे, गजानन चव्हाण ,दादाराव रासवे, यांची तर संघटन सरचिटणीस  पदी पांडूरंग उर्फ पप्पू नखाते, तर सरचिटणीस पदी अॅड श्रीपाद  कोंत ,वकील आघाडी  अध्यक्ष अॅड नीळकंठ चव्हाण यांची निवड करण्यात आली.या वेळी  सुरेश भुमरे,तालुकाध्यक्ष शिवराज नाईक,डॉ विष्णू राठी,डॉ राजेंद्र चौधरी, ,परमेश्वर कदम, नानासाहेब वाकनकर ,अमोल बोरटे ,आदी उपस्थीत होते.
 राहिलेल्या निवडी लवकरच करण्यात येतील अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष शिवराज नाईक यांनी दिली.

Thursday, 27 February 2020

निवृत्त गटशिक्षणाधिकारी अशोक भातंब्रेकर यांचे निधन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दि. 27...
     भाजपाचे दिवंगत केंद्रीय नेते प्रमोद महाजन यांचे मेहुणे आणि  लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे साडू, माजी मंत्री पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांचे काका आणि निवृत्त गटशिक्षणाधिकारी अशोक भातंब्रेकर (सर) यांचे आज (गुरुवारी) सकाळी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 74 वर्षे होते.
      परळी तालुक्याचे पहिले गटशिक्षणाधिकारी अशी अशोक भातंब्रेकर यांची ओळख होती. जिल्हा परिषद शाळेचे सह शिक्षक ते मुख्याध्यापक आणि नंतर गटशिक्षणाधिकारी अशा विविध पदावर अतिशय उत्कृष्ट काम केले. त्यांना राज्य शासनाने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला होता. शिक्षकांची आर्थिक अडचण दुर करण्यासाठी शिक्षक पतसंस्था काढून ती चांगल्या प्रकारे चालवली. शहरात अजातशत्रू अशी त्यांची ओळख होती. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे नातेवाईक असुनही त्यांनी कधीही तसा आविर्भाव आणला नाही. विशेष म्हणजे सर्वच पक्षात त्यांना माणणारा मोठा वर्ग आहे.
       अशोक भातंब्रेकर सर गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच आज गुरूवारी (दि. 27) सकाळी सहा वाजण्याचे सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

     सकाळी निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव पद्मावती गल्लीतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सर्वसामान्यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
      दुपारी 3.30 त्यांची अंत्ययात्रा निघुन परळीच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र अनिरुद्ध भातंब्रेकर यांनी मुखाग्नी दिला.
     यावेळी झालेल्या शोकसभेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या शोकसंदेशाचे वाचन जि. प. सदस्य अजय मुंडे यांनी केले, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, प्रा. टी. पी. मुंडे, फुलचंद कराड, दत्ताप्पा ईटके, राजेश देशमुख, विजय गोल्हार, काॅ. प्रभाकर नागरगोजे आदींसह अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
      स्व. अशोक भातंब्रेकर यांच्या पश्चात पत्नी प्रतिमा (निवृत्त गटशिक्षणाधिकारी), एक मुलगा, एक मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे.

उद्या रक्षाविसर्जन

    दरम्यान स्व. अशोक भातंब्रेकर यांचा राख सावडण्याचा कार्यक्रम उद्या शनिवार दि. २९ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता होणार असल्याचे परिवाराच्या वतीने सांगण्यात आले.

मराठी भाषा दिन साजरा


सोनपेठ:येथील कै.रमेश वरपूडकर महाविद्यालयात आज २७ फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन डाॅ.गणेश मुंढे, संस्थाध्यक्ष मा. परमेश्वर कदम, प्राचार्य डाॅ.वसंत सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठी भाषा संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मराठी विभागप्रमुख डाॅ.बालासाहेब काळे यांनी केले. मराठीचा नव्या विज्ञान तंत्रज्ञानातील वाढता वापर हे भाषेच्या उत्कर्षाचे लक्षण असल्याचे प्रतिपादन साहित्यिक डाॅ. सा.द. सोनसळे यांनी केले. 
  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सखाराम कदम यांनी केले तर आभार डाॅ.संतोष रणखांब यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

मराठी भाषा ही सर्व भाषेची जननी आहे -सौ.अंजलीताई फड


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ज्ञान प्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय नेहरू चौक तळ परळी वैजनाथ येथे मराठी राजभाषा दिन व चंद्रशेखर आजाद यांचा स्मृतिदिन संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ जब्दे व संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या कोषाध्यक्षा सौ . अंजली ताई फड उपस्थित होत्या या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रज व चंद्रशेखर आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली यावेळी प्रमुख अतिथी सौ . अंजली ताई यांनी मराठी भाषेविषयी आपले मनोगत व्यक्त करताना मराठी भाषा ही सर्व भाषांची जननी आहे असे प्रतिपादन केले नंतर शाळेतील सहशिक्षक सिताराम गुट्टे यांनी चंद्रशेखर आजाद यांच्याबद्दल आपले विचार व्यक्त केले
दिनांक २७ फेब्रुवारी, इ.स. १९३१ रोजी, अलाहाबाद मधील अल्फ्रेड पार्क येथे राजगुरु जेलमध्ये असतांना त्यांच्या आईला आर्थिक मदत व्हावी यासाठी ते क्रांतिकारक सहकाऱ्याला भेटण्यासाठी गेले असतांना एका अज्ञात खबऱ्याने पोलिसांना वार्ता दिली. पोलिसांनी मैदानाला वेढा घातला व चंद्रशेखर आझाद व पोलिसांमध्ये गोळीबार झाला. त्यांनी एकहाती गोळीबारात तीन पोलिसांना मारले मात्र त्यांच्याजवळील बंदुकीच्या गोळ्या संपल्यामुळे शेवटच्या गोळीने त्यांनी स्वत:ला मारून घेतले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे करण्यात आले. अशी माहिती सहशिक्षक सिताराम गुट्टे यांनी दिली तसेचमराठी दिनादिषयीसह शिक्षक विठ्ठल फड यांनी माहिती दिली नविष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर (२७ फेब्रुवारी, १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.मराठी आभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्त्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे. मराठी कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणा-या आहेत. त्यांची कणा ही कविता युवकांना स्फूर्ती देणारी आहे. अशी माहिती सहशिक्षक विठ्ठल फड यांनी दिली या कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

मराठी संस्कृतीचा अमूल्य ठेवा भावी पिढीसाठी जपण्याची जबाबदारी आपल्यावर आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई, : मराठी भाषा ही वीरांची भाषा आहे. तिला हजारो वर्षांची परंपरा लाभलेली आहे, ती शतकानुशतके टिकून राहील. मराठी भाषेतील विपुल साहित्यसंपदेमुळे महाराष्ट्र समृद्ध आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री.ठाकरे बोलत होते.
यावेळी मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, आमदार राहूल नार्वेकर, मराठी भाषा सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा, माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, दहावीपर्यंत मराठी भाषा सर्व शाळांमधून अनिवार्य करण्यासाठीचा कायदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमत झाला आहे.  हा कायदा माझ्या कालावधीत होत आहे, हे माझे भाग्य. लहानपणापासून साद घालणारे अंगाईगीत, नंतर भावगीत, युद्धभूमीवरील समरगीत, शाहिरांच्या रुपाने अंगात वीरश्री संचारणारा पोवाडा या सर्वांमुळे मराठी समृद्ध आहे. हे अक्षरधन पुढच्या पिढ्यांना देत राहावे. मराठी संस्कृतीचा अमूल्य ठेवा भावी पिढीसाठी जपण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.
परप्रांतियांनीदेखील ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्याची भाषा आत्मसात करावी आणि त्याचा वापर करावा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ज्येष्ठ साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून ज्येष्ठ कविवर्य कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन  राज्य शासनाकडून ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार व मराठी साहित्य निर्मितीमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या प्रकाशन संस्थेस ‘श्री.पु.भागवत पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो.
निवड समितीने यावर्षीच्या ‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासाठी’ ज्येष्ठ साहित्यिक अनुराधा पाटील यांची तसेच श्री.पु.भागवत पुरस्कारासाठी पद्मगंधा प्रकाशन, पुणे या संस्थेची निवड केली.
मराठी भाषा संवर्धनासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस ‘भाषा संवर्धन पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. त्यानुसार या वर्षी डॉ.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक व कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कारासाठी अनुक्रमे प्रा.आर.विवेकानंद गोपाळ व श्री.अनिल गोरे यांची निवड करण्यात आली. साहित्यिक योगदानाबद्दल उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीकरिता 35 वाङ्मय पुरस्कार विजेते या सर्व साहित्यिकांचा मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.
मराठी भाषेचा प्रवास दर्शविणारा आणि मराठी भाषेची सौंदर्यस्थळे मांडणारा सांस्कृतिक कार्यक्रम ‘प्रवास आणि प्रवाह’  हा यावेळी सादर करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते प्रसाद ओक आणि मधुरा वेलणकर यांनी केले.