तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 7 February 2020

123 वी माता रमाई आंबेडकर जयंती परळी शहरात उत्साहात साजरी; शोभायाञा ठरली परळीकरांसाठी आकर्षण


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दीन दुबळ्याची माऊली माता रमाई आंबेडकर यांची 123 वी जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.माता रमाई मातेस वंदन, अभिवादन करण्यासाठी शहरातील विविध वस्तीतील बौध्द विहारात बुध्द वंदना,प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आली.
 शहरातील भिमनगर,भिमवाडी जयभीम काॕलनी अदी विविध वस्तीतुन माता रमाईच्या प्रतिमेची शोभायाञा काढण्यात आली.तथागत गौतम बुध्द,डॉ बाबासाहेब आंबेडकर आणी माता रमाईंच्या जयघोषणांनी शोभायाञेचा मार्ग दणाणुन गेला होता.
भिमनगर येथील माता रमाईच्या शोभायाञेत अश्वरुड छ.शिवाजी महारांजाची वेशभुषा धारण करुन युवकांचा सहभाग,ढोल ताशे,नगारे,वासुदेव,बाहुबली अंगरक्षक याच्या पथकांनी परळीकरांचे लक्ष केंद्रित केले होते. त्याच बरोबर परळी कशी प्रदुषण युक्त झाली आहे याचा जिवंत देखावा सादर केला यामध्ये थर्मल आणी विटभट्टी पासुन कसे प्रदुषण होऊन परळी कशी ञस्त झाली आहे हे संदेशाच्या माध्यमातून दाखविण्यात आले.दुसऱ्या देखाव्यात तथागत सिध्दार्थाला बुध्दत्व प्राप्त झाले त्या वनात गौतम बुध्द प्रवचन करत असलेला देखावा सादर केला होता तर भिमवाडी आणी जयभीम काॕलनीतील माता रमाई अनुयायानीही शोभायाञा काढली होती.याशोभायाञेत अनुयायी पांढरे वस्ञ परिधान करुन शेकडो महिलांचा मोठा सहभाग दिसुन आला.दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी फुले-शाहु-आंबेडकर चळवळीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

No comments:

Post a comment