तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 February 2020

जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवाचे 14 व 15 मार्च रोजी आयोजन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आढावा बैठक संपन्न          बीड, (प्रतिनिधी) :- दि.27:-  जिल्हास्तरीय ग्रंथोत्सव 14 व 15 मार्च 2020 रोजी आयोजित करण्यात यावा तसेच यासाठी अभिनव संकल्पनांचा वापर करून पुस्तकांची आवड जास्तीत जास्त विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत रुजविण्यासाठी याचा उपयोग व्हावा असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दिले .
          जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती सभागृहात जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली .यावेळी ग्रंथोत्सवाच्या नियोजनाचा आढावा घेताना ते बोलत होते. आढावा बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी बालाजी आगवाने , ज्येष्ठ साहित्यिक व मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य डॉ. सतीश साळुंके , जिल्हा ग्रंथालय अधिकारी दीपक काळे तसेच जिल्हा परिषद , शिक्षणाधिकारी व विविध कार्यालयांचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment