तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 6 February 2020

वार्ता समुहाच्या पुरस्कारांचे 15 फेब्रुवारी रोजी वितरण


लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व टीव्ही 9 मराठीचे कार्यकारी संपादक माणिक मुंडे यांची प्रमुख उपस्थिती

नगरभूषण-प्रा.सुजित धर्मपात्रे,सद्भावना-भारतीय जैन संघटना,शाखा अंबाजोगाई तर युवागौरव- विवेक नवनाथ होके यांना जाहीर

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- 
माध्यम क्षेत्रात गेल्या 12 वर्षांपासून अविरतपणे कार्य करणार्‍या दैनिक वार्ता समुहाने बीड जिल्ह्याच्या मातीला गौरविण्याचा काम केलं आहे.या परिसरातील जे काही मुलभूत प्रश्न आहेत.त्यांना मुख्यत्वे पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. सामाजिक दायित्व निभावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.वृत्तपत्र किंवा माध्यम क्षेत्र एवढं मर्यादित न राहता अमर्यादपणे यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न वार्ता समुहानं केलेला आहे.दरवर्षी वर्धापन दिनाच्या माध्यमातून समाजधुरीणांचा सन्मान व सत्कार केलेला आहे. तसेच ज्यांची समाजाप्रती कृतज्ञता आहे.अशांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे काम केलेले आहे.यंदाचा वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून लातूर येथील कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी जी.श्रीकांत आणि टी.व्ही.9 मराठी समुहाचे कार्यकारी संपादक माणिक बालाजी मुंडे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.यंदाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात येत असून यामध्ये 'नगरभूषण पुरस्कार' हा अंबाजोगाईचे भूमिपुत्र आणि पुणे येथील एम.आय.टी. अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा.सुजीत धर्मपात्रे यांना तर 'सद्भावना पुरस्कार’ हा अंबाजोगाई येथीलच भारतीय जैन संघटना (बीजेएस) यांना  व  'युवागौरव पुरस्कार’ हा अंबाजोगाईचे भूमिपुत्र आणि पुणे येथे भारतीय महसूल प्रशासनात असलेले विवेक नवनाथ होके (आय.आर. एे.एस.) यांना जाहिर करण्यात येत आहे.या पुरस्काराचे वितरण शनिवार,दि.15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह न.प.अंबाजोगाई येथे  होणार आहे.तरी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वार्ता समुहाचे संपादक परमेश्वर गित्ते यांनी केले आहे.
वार्ता समुहानं सदैव सामाजिक भान राखून काम केलेलं आहे. माध्यम क्षेत्रामध्ये वेगळी ओळख निर्माण करून नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करत त्याद्वारे माध्यम जगतामध्ये भरारी घेतली आहे.  वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून वार्ता समूह हा धडपडत असतो.माध्यम क्षेत्रामध्ये वेगळी ओळख आणि वेगळा प्रभाव राहिलेला आहे. गेल्या 12 वर्षांपासून वार्ता समूह हा अखंडितपणे वेगवेगळे विषय मांडत आलेला आहे. त्यासोबतच सामाजिक दायित्व म्हणून आपली भूमिका पार पाडलेली आहे.समाजात जे चांगले काम करतात. त्यांचा यथोचित सन्मान व गौरव करण्याचे काम केले आहे. समाजातील विविध घटकांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम केले आहे. दरवर्षी वर्धापन दिनाच्या माध्यमातून अंबाजोगाई शहर व परिसरातील जे भूमिपुत्रांच्या कार्याचा गौरव आणि सन्मान करून या मातीच्या उतराईसाठी ज्यांचे प्रयत्न राहिले अशांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.12 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने तीनही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये 'नगरभूषण पुरस्कार’ हा अंबाजोगाईचे भूमिपुत्र प्रा. सुजीत धर्मपात्रे यांना जाहिर झाला आहे.प्रा.धर्मपात्रे यांचे पुणे शहरात फार मोठे काम असून त्यांच्या हातून हजारो अभियंते निर्माण झाले आहेत. शिवाय आधुनिक भारताचा इतिहास हे पुस्तक त्यांनी महाराष्ट्राला समर्पित केले आहे.म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव नगरभूषण पुरस्कार’ देऊन करण्यात येणार आहे.त्यासोबत सद्भावना पुरस्कार’ हा अंबाजोगाई येथील भारतीय जैन संघटना (बी.जे.एस.) शाखा अंबाजोगाई यांना जाहिर झाला आहे.अंबाजोगाई शहरात बीजेएसचे काम सामाजिक स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात राहिलेले आहे.गेल्या तीन वर्षांत पाण्याच्या गंभीर प्रश्नांवर लढा उभा करून ग्रामीण भाग हा पाणीदार झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश देखील आले. आज बहुतांशी गावं पाणीदार झाले आहेत.अशा मानवतेच्या दृष्टीकोनातून काम करणार्‍या संस्थेला सद्भावना हा पुरस्कार दिला जात आहे.तर 'युवागौरव’ हा पुरस्कार अंबाजोगाईचे भूमिपुत्र परंतु, पुणे येथे भारतीय महसूल प्रशासन (आय.आर.ए.एस)  सेवेत उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.अंबाजोगाई तालुक्यातील चिचखंडी या गावचे रहिवासी असून तरूण सहकारी  असल्याने त्यांना युवागौरव हा पुरस्कार प्रदान केला जातो आहे.या पुरस्कारांचे वितरण शनिवार,दि.15 फेब्रुवारी रोजी  सायंकाळी 5.30 वाजता मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह येथे होणार आहे.या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लातूरचे कर्तव्यदक्ष आणि कर्तव्यप्रिय जिल्हाधिकारी जी.श्रीकांत व  प्रमुख आकर्षण म्हणून टीव्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनेचे  कार्यकारी संपादक माणिक बालाजी मुंडे हे राहणार आहेत. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी हे असणार आहेत.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे आ. संजयभाऊ दौंड,बीड जि.प.च्या अध्यक्षा सौ.शिवकन्याताई शिवाजी सिरसाट,उपनगराध्यक्षा सौ.सविताताई लोमटे,युवा नेते अक्षय मुंदडा,बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता नवनाथ घाडगे पाटील,सा.बां.विभागाचे कार्यकारी अभियंता एन.टी. पाटील,अंबाजोगाई येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ.प्रल्हाद गुरव, परळीचे माजी नगराध्यक्ष वाल्मिक कराड,अंबाजोगाई येथील हृदयरोग तज्ञ डॉ. नवनाथ घुगे,अ.भा.पत्रकार परिषदेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.तरी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वार्ता समुहाचे संपादक परमेश्वर गित्ते यांच्यासह अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ,अ.भा.मराठी पत्रकार परिषद,पत्रकार संघ अंबाजोगाई,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,गुडमॉर्निंग ग्रुप अंबाजोगाई यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment