तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 15 February 2020

परळीत पनगेश्वर शुगरचे शेतकरी करणार चेअरमन यांच्या निवासस्थानासमोर 17 फेब्रुवारी रोजी करणार आमरण उपोषणपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांनी सुरू केलेल्या पंनगेश्वर शुगर मिल्स पानगाव या कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी थकीत ऊसाचा हप्ता मिळावा या प्रमुख मागणीसाठी दिनांक 17 फेब्रुवारी पासून परळी येथील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे व चेअरमन प्रज्ञाताई मुंडे  यांच्या यशश्री निवासस्थानासमोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी परळी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.


लोकनेते गोपीनाथ राव मुंडे पत्रकार भवन येथे आज दिनांक 15 रोजी पुढे बोलताना ते म्हणाले की सन दोन हजार अठरा एकोणीस च्या ऊस गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पनगेश्वर कारखान्याला ऊस घातला आहे त्या शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत कारखान्याने एफआरपीप्रमाणे ऊस बिल दिलेले नाही याबरोबरच पनगेश्वर शुगर मिलचे ऊस तोड मुकादम ,ऊसतोड वाहतूक मुकादम ,कर्मचारी यांच्याही पगार थकलेले आहेत 
  या सर्व पगारा पोटी सहा कोटी रुपये कारखाने थकवले आहेत .या प्रश्न पनगेश्वर शुगर मिल्स समोर 14 नऊ 2019 रोजी हे आंदोलन केले होते .त्यावेळी कारखान्याच्या संचालक मंडळाने लवकरात लवकर राहिलेले 290 रुपये त्याप्रमाणे ऊस बिलाची रक्कम देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते. तरीसुद्धा याची पूर्तता झाली नाही म्हणून आम्ही 17 पासून परळी येथील कारखान्याच्या चेअरमन यांच्या घरासमोर शेतकर्‍यासह आमरण उपोषणास बसणारआहोत.
   
या पत्रकार परिषदेला संतोष नागरगोजे ,यांच्यासह मनसे बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस ,राजेंद्र मोटे, वैभव काकडे, श्रीराम बादाडे, बाळासाहेब मुंडे ,परळी तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर जिल्हा उपाध्यक्ष दत्ता दहिवाळ शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर आधी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment