तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

तळेगाव येथे 2 मार्च रोजी काँ.अजय बुरांडे यांच्या उपस्थितीत पिक विमा संदर्भात बैठक


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मौजे तळेगाव येथील शेतकऱ्यांना पिक विमा व अतिवृष्टी अनुदान अद्याप मिळाले नाही. यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गावकऱ्यांनी केले आहे.

 परळी -.बीड रोडवर असलेले मौजे तळेगाव येथील मोठ्या प्रमाणात शेतकरी यांना अद्याप अनुदान व पिक विमा मिळाला. त्यामुळे खरीप पिक विमा 2018 व ओला दुष्काळ 2019 यासंदर्भात दि. 2 मार्च सोमवार संध्याकाळी ठीक 7:00 वाजता हनुमान मंदिर तळेगाव या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते अजय बुरांडे हे उपस्थित राहणार आहेत. तरी शेतकरी व गावकरी मंडळी तळेगाव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गावकऱ्यांनी केले.

No comments:

Post a Comment