तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 6 February 2020

पोटी जिल्हा परिषद शाळेतील 'कलाविष्कार 2020' कार्यक्रमास ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद
फुलचंद भगत
 वाशिम-मंगरूळपीर तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पोटी येथे नुकताच 'कलाविष्कार 2020' कार्यक्रम संपन्न झाला.  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी  शाळा स्थापनेला 111 वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्त साधून येथील जि प शाळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिलसिंह सूर्यवंशी , उद्घाटक म्हणून प्रतिष्ठित नागरिक चंद्रकांत पाकधने तर प्रमुख पाहुने म्हणून माजी जि प सदस्य शंकरराव सावके, सचिन राऊत पं स सदस्य, गोपालराव सावके, दामोदरजी पाकधने, देवलालजी ठाकरे, प्रमोद भगत या मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात वर्ग 1 ते 7 वि च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनात विविध कलाप्रकार, लघुनाटिका व नृत्ये सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली व बारा हजार पाचशे रुपयांची रोख बक्षिसे देऊन ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.  विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यांमध्ये लोकगीत, बालगीत, भावगीत, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्फूर्तिगीत, रिमिक्स डान्स, देशभक्तीपर गीतावरील  नाट्यमय नृत्य, समाजप्रबोधन करणारे भावनात्मक लघुनाट्य इत्यादी विविधांगी प्रकार सादर केल्याने त्यांचेवर पाहुणे,  पालक व प्रेक्षकांनीही अक्षरशः बक्षिसांचा पाऊस पाडत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.  सदर कार्यक्रमासाठी गावातील शेकडो प्रेक्षकांची उपस्थिती लाभल्याने शाळेचे मैदान अपुरे पडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोटी केंद्राचे केंद्रप्रमुख सुदाम भोंडणे, मुख्याध्यापक हिरामण म्हातारमारे, ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र ठोकळ, अनिल वाढणकर व पदवीधर शिक्षक शरद सुरसे, पूर्वप्राथमिक वर्गशिक्षिका अंकिता गावंडे , वैशाली भगत तसेच सर्व अंगणवाडी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी कोठेही कमी नाहीत तसेच योग्य संधी व मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो असे मत यावेळी शाळेतील सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख शरद सुरसे यांनी व्यक्त केले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment