तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

राजे संभाजी डाेनर ब्लड ग्रुप “इंटरनॅशनल आयकॉन 2020” पुरस्काराने सन्मानित
फुलचंद भगत
वाशिम-राजे संभाजी डाेनर ब्लड ग्रुप (वाशिम जिल्हा)महाराष्ट्र  या  संस्थेला, नॅशनल अँटी हरासमेंट फॉऊंडेशन, भारत  व इएसओ मध्यप्रदेश  यांच्या  वतीने इंटरनॅशनल आयकॉन पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी  सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सुस्मिता मुखर्जी मॅडम, पद्मश्री 
डॉ. विजयकुमार  शहा सर, इंटरनॅशनल गेस्ट श्री. एम. एस. बुखारी सर, सुप्रसिद्ध कॉमेडीयन श्री. उदय धाहिया सर, या सर्व मान्यवरांच्या हस्ते विराट रिसॉर्ट, इंदोर, मध्यप्रदेश येथे मोठ्या दिमाखदार सोहळयात  राजे संभाजी डाेनर ब्लड ग्रुप हा आंतरराष्ट्रीय मानाचा इंटरनॅशनल आयकॉन अवार्ड 2020 प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्रुप ची जनहितार्थ कार्याची दखल घेतली आहे. यामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835,8459273206

No comments:

Post a Comment