तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

परळीत 25 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यव्यापी धरणे आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे- सतिष मुंडे, जुगलकिशोर लोहियापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  भाजपाच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे व बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या 25 फेब्रुवारीच्या राज्यव्यापी धरणे आंदोलनास परळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे तालुका अध्यक्ष सतिष मुंडे व शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले आहे.

 भाजपाच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे व बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी तहसील कार्यालया समोर मंगळवार, दि.25 फेब्रुवारी 2020 रोजी  सकाळी 10 ते 3 रोजी होणाऱ्या "भाजपा यलगार  राज्य व्यापी धरणे आंदोलन" होणार आहे. शेतकरी, महिला व सर्व सामान्यसह विविध प्रश्नी  तहसील कार्यालयाच्या प्रांगणात राज्याव्यापी धरणे आंदोलन होणार आहे. या धरणे आंदोलनास परळी तालुक्यातील भाजपाच्या पदाधिका यांनी ग्रामीण , शहर मधील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व आघाडी चे पदाधिकारी, गटप्रमुख,  गणप्रमुख,  प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व शक्तीकेंद्र प्रमुख बुथप्रमुख, सरपंच, उपसरपंच,से.स.सो.चेरमन यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे तालुका अध्यक्ष सतिष मुंडे व शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment