तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 12 February 2020

धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नामुळे दिव्यांग, विधवा, परितक्त्या, ज्येष्ठ नागरिक यांच्या मासिक 600 रू. वरून 1000 रू.चे अनुदान थेट खात्यात जमा-डॉ. संतोष मुंडे


पात्र गोरगरीब निराधारांना संजय गांधी व श्रावण बाळ योजना याचा लाभ घ्यावा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यासह राज्यातील दिव्यांग बांधवांच्या मासिक अनुदानात 600 वरून 1000 रूपयांची वाढ करून खात्यावर जमा झाले आहे. याबाबत डॉ. संतोष मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे अनुदानात वाढ झाल्यामुळे दिव्यांग बांधवांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील व राज्यातील दिव्यांग बांधवांनी धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत. पात्र गोरगरीब निराधारांनी या संजय गांधी व श्रावण बाळ
योजनेचा लाभ घ्यावा असे डॉ. संतोष मुंडे यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्र व राज्य शासनातर्फे चालविण्यात येणार्‍या विविध निराधार योजनेचे मासिक अनुदान अत्यंत अल्प असुन आजच्या महागाईच्या काळात हे अनुदान पुरेसे नाही. तसेच वृध्द, निराधार, विधवा, अपंग, परिपक्ता महिलांना शासनाच्या संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेअंतर्गत सध्या केवळ 600/- रू.मासिक अनुदान अर्थ सहाय्य म्हणून देण्यात येत होते. हे अनुदान कमीत कमी 1000/- पर्यंत वाढवावे अशी मागणी करण्यात आली होती. महागाई दिवसें दिवस वाढत आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भावही गगनाला भिडले आहे. अशा परिस्थितीत वृध्द, निराधार, विधवा, अपंग, परिपक्ता महिलांना देण्यात येणारे अनुदान अतिशय कमी आहे. केवळ 600/- रूपये अनुदानात महिना गुजराण करणे कठीण होते. शासनाने वृध्द, निराधार, विधवा, अपंग महिलांचीही दखल घ्यावी ही अपेक्षा होती. भारत देशातील अन्य राज्यांमध्ये मुबलक अनुदान निराधारांना दिले जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही निराधारांच्या अनुदान वाढीचा निर्णय घ्यावा अशी मागणीही अनेक वेळा करण्यात आली. याची दखल घेऊन  राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यासह राज्यातील दिव्यांग बांधवांच्या मासिक अनुदानात 600 वरून 1000 रूपयांची वाढ झाली आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील व राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांना याचा लाभ मिळाला आहे. सहाशे रूपयांवरून एक हजार रुपयाचे अनुदान वाढ होऊन मिळाल्यामुळे सर्व निराधार लाभार्थी शासन व प्रशासना बद्दल आनंद व्यक्त करीत आहेत. येथून पुढे भाविष्यात शासनाने व प्रशासनाने दिव्यांग व निराधारांचे हिताचे निर्णय घ्यावेत व या निर्णयामुळे तमाम निराधारांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.
   धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यावर दिव्यांग बांधवांना दिलेल्या शब्द  पुर्णत्वास झाल्याबद्दल सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांचे रंजित रायभोळे, सय्यद सुभान, साजन लोहिया, शेख फेरोज, अनंतराव लोखडे, दशरथ सुत्रावे, अनंत बापु मुंडे, उध्दव फड, माणिक जाधव, संतोष आघाव,  संजय नखाते, संदेश कापसे, नागरगोजे आशा, सरताज खान,  शेख रहिम, आसेफ खान, निलाबाई भद्रे, पुष्पा कांबळे, नंदकुमार जोशी, प्रदिप भोकरे, शेख सिंकदर, मनोज नाथानी, राम वलवार, विमल धुमाळ, अरिहंत लोढा, विमल निलंगे, दत्ता काटे, अविनाश फड, शेख मिया, संतोष बल्लाळ, अभिजीत जगतकर, चंद्रकात होलबोले, ममता बद्दर, महादेव राऊत, बालाजी शहाणे, प्रमोद आबाळे , कपिल जाजू, तुळशिराम प्रयाग,  महेबुब पठाण, योगीराज दुर्गे, विशाल चव्हाण, सुरेश माने,शिवाजी माने, शेख हबीबभाई, शेख मुबारक, विजय भोयटे, गोपाल बाराड, पठाण आसेफखान व अपंग, विधवा, ज्येष्ठ नागरिक आणि माजी सैनिक संघटनेने आभार मानले आहेत.


पात्र निराधारांनाची या योजनेचा लाभ घ्यावा-डॉ. संतोष मुंडे

दिव्यांग व निराधार व्यक्तींना आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे, समाजातील दुर्बल, दुर्लक्षित दिव्यांगांच्या व निराधार जीवनातील अंधःकार दूर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणाणेसाठी शासनाच्या वतीने ही विशेष मोहीम राबवली आहे.  या योजनेचा लाभ फक्त दिव्यांग बांधवांना दिला. पाहिजे. दिव्यांग नसतांना किंवा निराधार नसतांना बोगस कागदपत्रांच्या आधारे असणाऱ्या लाभार्थ्यांना हा फायदा देण्यात येऊ नये. चारचाकी, ट्रक व धनदांडग्या असणाऱ्या व्यक्तींना याचा फायदा देण्यात येऊन नये. पात्र  दिव्यांग व निराधारांनीच लाभ घ्यावा असे प्रसिद्धी पत्रकाव्दारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment