तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 5 February 2020

भारताचा 71 वा प्रजासत्ताक दिन आफ्रिकेतील मोझंम्बीक या देशात उत्साहात साजरा; कार्यक्रमाचे आयोजन परळीचे भूमिपुत्र शेख हुमायून


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
भारताचा 71 वा प्रजासत्ताक दिन जगभरात उत्साहात भारतीयांनी साजरा केला. आफ्रिकेतील मोझंम्बीक या देशात मागील 14 वर्षांपासून व्यवसायाच्या निमित्ताने राहत असलेले मूळचे परळी येथील रहिवासी व मोझंम्बीक येथील इंडियन बिझनेस कौन्सिल चे सचिव शेख हुमायून व त्यांच्या भारतीय सहकार्यांनी बेयरा या शहरात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे  आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी जवळपास 150 भारतीय उपस्थित होते. तसेच लहान मुलांची उपस्थित लक्षणीय होती. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण बेयरा येथील मंदिराचे पुजारी श्री बालमुकुंद व आफ्रिकेतील प्रसिद्ध उद्योगपती सुभाष भाई मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. भारत माता की जय व वंदे मातरम या घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. मागील 5 वर्षांपासून मोझंम्बीक येथे भारतीय  स्वातंत्र्य दिवस व प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो.  या कार्यक्रमाचे नियोजन IBC चे चेअरमन सुहास चौगुले, अल्पेश शाह, तारिक खान यांनी केले.

No comments:

Post a comment