तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

म्हणायला ट्रान्सफार्मर परंतु जांगडगुत्ता तारा उघड्या, पोल वाकलेले


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- महावितरण कंपनी म्हणजे महाभोंगळ का
रभार असे म्हणायला वाव निर्माण होणाऱ्या अनेक घटना अनेकदा पडलेल्या आहेत परळी-बीड रोडपासून जवळ असलेल्या रेवली गावाजवळ म्हणायला वीज कंपनीचा रोहित्र म्हणून ज्याचा वापर केला जातो. तो ट्रान्सफार्मर आहे की तारांचा जांगडगुता हेच लक्षात यायला तयार नाही. गेल्या अनेक वर्षापासून उपडया तारा आणि वाकले पोल जीवघेणे ठरण्याच्या स्थितीत असून वीज कंपनीच्या अधिका-यांची मात्र त्याकडे नजर जायला तयार नाही.
     महाराष्ट्रातील विद्युत महामंडळाचे वीज वितरण कंपनीत रूपांतर झाल्यानंतर वीज खंडित होण्याच्या समस्या कमी होवून लोकांना सुरळीत वीज मिळेल आणि झुकलेल्या तारा आणि वाकलेले पोल चांगले होवून सेवा सुधारेल असे वाटत होते. परंतु गेल्या काही वर्षात वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचे आणि डोळेझाकुवृत्तीचा अनेकांना फटका बसला आहे. शॉट सर्किटने उभे पीक जळने, उप्या तारेला हात तागून मृत्यु होणे अशा वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत असे असताना परळीपासून जवळ असलेल्या रेवती येथील ट्रान्सफार्मर तर भोंगळ कारभाराचा कळस गाठणारे आहे.

गेल्या चार वर्षांपासून ट्रान्सफार्मरच्या नावाने तारांचा आणि फ्युजचा जांगडगुत्ता पहावयास मिळतो. उपड्या तारा उघडे पयुज दिसल्यानंतर ते चित्र भिती दायक वाटते. सहज तहान मुलाचा देखित हात लागेल अशा स्थितीतील तारा जीव घेण्या ठरू शकतीत परंतु या प्रकाराकडे अद्यापही वीज कंपनीचे लक्ष गेलेले नाही. एखादी दुर्घटना पडण्याची अधिकारी बाट तर पाहत नाहीत ना? अशी शंका यामुळे उपस्थित होते.

... नसता आंदोलन करू-विजय बडे

रेवली येथील लोमकाळत्या तारांचे आणि उघड्या फ्युजचे नावाला असलेले हे ट्रान्सफार्मर तात्काळ सुस्थितीत आणले नाही, सामान्य माणुस किंवा मुक्या प्राण्यांना धोका होणार नाही याची खबरदारी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली नाही तर रेवलीचे गावकरी या प्रकरणी तीव्र आंदोलन करतील असा इशारा विजय बडे यांनी दिला आहे.


पालकमंत्र्यांच्या सूचना तरी पाळा

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार आल्यानंतर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. बीड जिल्ह्यातील लाईटचा खेळ लक्षात घेता आणि शेतकऱ्यांना वीजेचा सुरळीत पुरवठा व्हावा म्हणून १७ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांनी बैठक घेवून २४ तासाच्या आत आवश्यकता असेल तिथे ट्रान्सफार्मर उपलब्ध करून द्या असा आदेश देतानाच कारवाईचा इशारा देखिल दिला होता. परंतु पालकमंत्र्यांच्या सुचनाकडे आणि इशाऱ्याकडे वीजवितरण कंपनीच्या अधिकान्यांनी पुर्ती डोळेझाक केल्याचे यावरून दिसते.

No comments:

Post a Comment