तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 6 February 2020

महिला झाल्या डिजिटल साक्षरमुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि आधुनिक स्त्री विकास प्रतिष्ठान यांचे विद्यमाने मोफत डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रम प्रकाश बँक्वेट हाॅल, टागोर नगर ३, विक्रोळी पुर्व, मुंबई येथे नुकताच पार पडला. 

रंजना करूर यांनी प्रशिक्षण देताना, महिला व मुलांच्या सुरक्षतेची माहिती दिली. महिला डिजिटल साक्षर का आणि कशा व्हाव्यात, स्मार्टफोन तंत्रज्ञानाचा वापर रोजगार निर्मितीसाठी कसा करावा, व्यवसाय लघु असला तरी जगभरात कसा पसरवावा, प्रसार करावा, यात कोणत्या शासकीय योजनांमधून लाभ घेता येऊ शकतो यांची इत्यंभूत माहिती उपस्थितांना दिली.

आधुनिक स्त्री विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्ष विद्या सरमळकर यांनी डिजिटल युगात महिलांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करण्यासाठी हे प्रशिक्षण कसे गरजेचे आहे हे सांगितले. तसेच महिला व मुलींसाठी सुरक्षित वातावरणाची निर्मित्ती कशी करता येईल यांचे उत्तम उदाहरण हा कार्यक्रम आहे. असे स्तुत्य कार्यक्रम करणाऱ्या महिला आयोगाचेही विद्या सरमळकर यांनी विशेषत्वाने आभार मानले.

महिला आयोगाच्या सदस्य रिदा रशिदा यांनी महिला आयोगाची भुमिका मांडली. 

सदर कार्यक्रमास अॅड. जयश्री बोडके (सल्लागार), प्रेमावती सरमळकर (सल्लागार), संगीता मर्गज (खजिनदार), प्रज्ञा प्रकाश अहिरे (सहकारी) उपस्थित होत्या.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता आशा भालेराव, नंदा शिरवाडकर, वैशाली राऊत, माधवी साळवी, कल्पना कारडोझा, आयशा शेख, प्रमिला पवार, मेहेरून्नीसा आणि पुनम गायकवाड यांनी विशेष मेहनत केली. सदर कार्यक्रमासाठी महिलांचा लक्षणीय सहभाग लाभला त्यासाठी  प्रतिष्ठानच्या खजिनदार संगीता मर्गज यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a comment