तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 25 February 2020

सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढा देऊ,महाविकास आघाडी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ; भाजपच्या धरणे आंदोलनात खा.प्रितमताई सरकार विरोधात गरजल्याबीड (प्रतिनिधी) :-  शेतकरी, शेतमजूरांच्या प्रश्नांवर राज्य सरकार निष्क्रिय ठरले आहे.राज्यात व जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून महिलांवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.राज्यकर्ते म्हणून सर्वच पातळ्यांवर निष्क्रिय ठरलेल्या या सरकार विरोधात सामान्य जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे.संकटांचा सामना करणाऱ्या शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांची नाकर्त्या राज्य सरकारने दखल घेतली नाही तर रस्त्यावर उतरून व्यापक लढा उभारू असा इशारा खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी दिला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न,वाढती गुन्हेगारी,महिला अत्याचार,कर्जमाफी अशा अनेक मुद्द्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना त्या बोलत होत्या.शेतकऱ्यांना व्होट बँक समजून निवडणुकीच्या तोंडावर मोठमोठ्या घोषणा करणारे सत्तेत आल्यावर मात्र शेतकऱ्यांना विसरले असून शेतकऱ्यांना दिलासा देणारा एकही निर्णय राज्य सरकारने घेतला नसल्याचे खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या “भाजप सरकारने ३६ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला, हजारो कोटींचा पीक विमा मिळवून दिला.परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकही विमा कंपनी शेतकऱ्यांचा विमा भरून घेण्यास पुढे येत नसून सरकारच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसतो आहे असा घणाघात खा.प्रितमताई मुंडे यांनी केला.

याप्रसंगी आंदोलनाला भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,रमेश पोकळे,मा.आ.आदिनाथ नवले,स्वप्नील गलधर,सर्जेराव तांदळे,सुभाष धस,सलीम जहांगीर,भगीरथ बियाणी,अजय सवाई,लक्ष्मण जाधव,चंद्रकांत फड,विक्रांत हजारी,संतोष राख,सचिन उबाळे,संगीता धसे,संग्राम बांगर,अमोल वडतीले,हरीश खाडे,राहुल जोगदंड यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.

हव तर नाव बदला पण लोकोपयोगी योजना बंद करू नका

भाजप सरकारने राबविलेल्या लोककल्याणकारी योजनांना स्थगिती देण्याचे पाप महाविकास आघाडीचे सरकार करीत असून आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी सरकारने चांगल्या योजना बंद करू नयेत,हवे तर योजनांची नावे बदलावीत परंतु सर्वसामान्यांच्या हिताला तडा देऊ नये असे उद्विग्न भाव खा.प्रितमताई मुंडे यांनी यावेळी व्यक्त केले.तर वॉटरग्रीडची उपयुक्तता तपासून वॉटर ग्रीड योजनेबाबत निर्णय घेऊ म्हणनाऱ्या सरकारने बारामतीला अतिरिक्त पाणी सोडताना कोणती उपयुक्तता तपासली होती असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

No comments:

Post a comment