तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 13 February 2020

ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयचा दर्जाच्या द्या आमदारांनी केली आरोग्यमंत्री कडे मागणीअरुणा शर्मा


पालम :- येथील ग्रामीण रुग्णालय अनेक समस्यांच्या विळख्यात अडकली आहे उपचाराअभावी रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे
 अशातच मागील अनेक दिवसांपासून रिक्त पदांमुळे हे रुग्णालय  नावालाच असून त्यामुळे या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय चा दर्जा द्यावा अशा मागणीचे निवेदन आमदार रत्नाकर गुट्टे यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांना एक निवेदन देण्यात आले आहे.
  पालम हे तालुक्याचे ठिकाण आहे या ठिकाणी यापूर्वी या रूग्णालयाला प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा होता लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून याठिकाणी सन 2012 रोजी ग्रामीण रुग्णालय मध्ये रूपांतर होऊन याठिकाणी भव्य अशा इमारतीमध्ये कारभार चालवला जात आहे याठिकाणी इमारतीसह तालुक्यातील जनतेला सुविधा मिळतील अशी अपेक्षा रुग्णाकडून व्यक्त केली जात होती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिक्त असलेले पद व रुग्णालयात सेवेचा अभाव यामुळे याठिकाणी येणाऱ्या रुग्णाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे याठिकाणी एकूण 28 पदाची मंजुरी असून यामध्ये 12 पदे  रिक्त आहे यामध्ये वैद्यकीय अधीक्षक एक, अधिपरीचारिका दोन, वैज्ञानिक अधिकारी एक, सफाई कामगार एक, औषध निर्माण अधिकारी दोन, कक्षसेवक एक, सहाय्यक अधीक्षक एक, कनिष्ठ लिपिक एक, एक्स-रे तज्ञ एक, ड्रायव्हर एक असे एकूण बारा पदे रिक्त आहेत  ग्रामीण भागातून दररोज मोठ्याप्रमाणात रुग्ण उपचारासाठी येतात तिथे आल्यानंतर रुग्णालयातील आधुनिक सुविधेचा अभाव असल्यामुळे रुग्णाला पुढील उपचारासाठी नांदेड अथवा परभणी येथील शासकीय रुग्णालयात जावे लागते याठिकाणी रुग्णावर उपचार करण्यासाठी एक्स-रे मशीन दाताची मशीन यासारख्या मशीन असतानाही या मशीन तज्ञ  डॉक्टरच्या आभावी धूळखात एका रूम मध्ये पडून आहेत यासंदर्भात 1 वर्षापूर्वी रुग्णालयातील पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक या ठिकाणी आले होते पथक येताच रुग्णालयातील अनेक मशनरी साफसफाई करत चालू असल्याचा कांगावा तत्कालीन अधिकारी ने केल्यानंतर लगेच पथक परतताच या मशीन जैसे थे अवस्थेमध्ये याठिकाणी धूळखात आहेत यामुळे तालुक्यातील अनेक गावातून आलेल्या रुग्णाला उपचारा अगोदरच नांदेड येथे रेफर करण्याची पद्धत मागील अनेक दिवसापासून सुरू आहे हे सर्व प्रकार थांबण्यासाठी शासनाने या रूग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन याठिकाणी आधुनिक मशनरी तज्ञ डॉ, उपलब्ध करावे अशा मागणीचे निवेदन आमदार रत्नाकर गुट्टे यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांना देण्यात आले आहे या निवेदनावर आमदार रत्नाकर गुटे जिल्हाध्यक्ष  संदीप आळनुरे, मित्रमंडळाचे पालम पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड, गंगाखेड विधानसभा संघटक राम लटके, विधानसभा अध्यक्ष कृष्णा सोळंके,  मित्र मंडळाचे तालुका अध्यक्ष, नारायण  दुधाटे, शिवराम पैके, भगवान शिरस्कर, भागवत किरडे, तायारखाँ पठाण, विनायक पौळ, बाळासाहेब कराळे, बाळासाहेब कुरे, शामराव काळे, गंगाधर डुकरे, रामचंद्र काळे, गणेश दुधाटे, नवनाथ पोळ, माधव वाघमारे, भारत डोणे, शंकर वाघमारे आदी कार्यकर्त्यांनी  निवेदन दिले आहे.

No comments:

Post a Comment