तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 12 February 2020

परळीत घराला आग, नगदी रकमेसह साहित्य जळाले आज सकाळी घडली घटना

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  शहरातील गंगासागर नगर भागात असलेल्या एका घराला अचानकपणे आग लागली. या आगीमध्ये घरातील नगदी 10 हजार व इतर संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली.यात एक लाखापेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले.
भागवत दौंड यांच्या घराला सकाळी अचानक आग लागली.आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी घरातील नगदी दहा हजार व इतर संसारउपयोगी साहित्य जळाले. जवळपास एक लाख रुपयापेक्षा जास्त नुकसान झाले. हे आग शॉकसर्कीटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

No comments:

Post a comment