तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

अंबाजोगाईत महिलेची आत्महत्या


अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- मुलांच्या शिक्षणासाठी अंबाजोगाईत भाड्याच्या घरात राहणाऱ्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. 

संगीता श्रीनिवास कुलकर्णी (वय ३५, रा. मुरुड) असे त्या महिलेचे नाव आहे. मुळच्या मुरुड येथील असलेल्या संगीता कुलकर्णी या मुलगा आणि मुलीच्या शिक्षणासाठी अंबाजोगाईतील भटगल्ली भागात किरायाने राहत होत्या.  त्यांचे पती श्रीनिवास कुलकर्णी हे कामानिमित्त मुरुडला राहत असल्याने आठवड्यातून एकदा अंबाजोगाईला येत असत. रविवारी सकाळी दोन्ही मुलं बाहेर गेली असल्याने घरात कोणी नसताना संगीता यांनी स्वयंपाकघरात पत्र्याच्या आडूला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.  थोड्यावेळाने दुधवाला आल्यानंतर अनेकदा दार वाजवून आणि हाका मारूनही कोणी उत्तर देत नसल्याने त्याला संशय आला आणि त्याने शेजाऱ्यांनी माहिती दिली. आसपासचे लोक जमा झाल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडून पहिले असता त्यांना आतमध्ये भयावह दृश्य दिसून आले. अंबाजोगाई शर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली याचा अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही. त्या रागीट स्वभावाच्या होत्या त्यातूनच त्यांनी ही आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला आहे .याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मनोज कुलकर्णी हे करीत आहेत.

No comments:

Post a comment