तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

'प्रत्युष लेंडगुळे' ने केली वयाच्या १८ महिन्यातच अभ्यासाला सुरुवात
सुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. २२ _ सध्या महाराष्ट्रात चर्चा होते आहे ती म्हणजे कुंभेजळगाव येथील दीड वर्षाचा गुगल बॉय प्रत्युष लेंडगुळे पाटील याची. ते म्हणजे केवळ १८ महिन्याच्या वयात काही मुलं आई, बाबा, किंवा सोपे सोपे शब्द आणि ते देखील बोबडे बोलतात.., पण या सर्वांना प्रत्युष हा अपवाद ठरत आहे. कारण अवघ्या दीड वर्ष वयात तो इंग्रजी महिने, अबकड, मराठी इंग्रजी, सर्व दिशा, रंग, आठवड्याचे वार हे सर्व त्याच्या मुखातून बाहेर पडत आहे आणि विचारल्यास तो खाडाखडा बोलतोय. 
      याविषयी अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील कुंभेजळगाव येथील रहिवासी तथा अट्टल महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी बद्रीनारायन लेंडगुळे पाटील हे सध्या नोकरी निमित्त पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात सोमाटने या ठिकाणी राहतात. त्यांचा मुलगा 'प्रत्युष' हा अवघा दीड वर्षाचा म्हणजे १८ महिन्याचा आहे. आणि एव्हढ्या कमी वयात त्याच्या अचाट बुद्धिमत्तेने सोमाटनेसह सबंध महाराष्ट्रात त्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्याच्या या विशेष गुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रत्युष याचे वडील शिरगाव ता. मावळ येथे सध्या शिक्षक म्हणून कार्यरत आहेत तर आई उच्च शिक्षित असून गृहिणी आहे. प्रत्युष हा नऊ महिन्याचा झाल्यापासून त्याच्यात असणाऱ्या या विशेष बुद्धिमत्तेचा अनुभव त्याची आई अश्विनी लेंडगुळे पाटील यांना आला. त्याला त्यांनी पहिल्याच वेळेस गायत्री मंत्र म्हणून दाखवला तर त्याने दुसऱ्या दिवशी मंत्र म्हणून दाखवला तेव्हा काहीच शब्द बोलू शकणाऱ्या मुलाने गायत्री मंत्र म्हणून दाखवला म्हणजे यात काहीतरी वेगळं आहे हे त्यांनी हेरलं आणि त्याच्या या विशेष गुणाला पैलू पाडण्याचं ठरवून पुढील गोष्टीसाठी तयार करायचाच असा जणू चंग बांधला. आणि आज प्रत्युष अठरा महिन्याचा झाला आहे . या वयातच तो शुभंकरोती, आठवड्याची नावे, एबीसीडी, महिन्याची नावे, ओंकार गुंजन, सर्व रंग, दिशा, सारेगमपधनिसा, श्लोक, दहा ते बारा बडबडगीते, आणि त्यावरील कृती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, यांची नावे, काही गाण्यावरून गायकांची नावे, चित्रावरून काही गाड्यांची नावे, झाडांची नावे, जंगली प्राणी, पाळीव प्राणी, राष्ट्रीय प्राणी, फुल, खेळ, राष्ट्रगीत, फोटोवरून सुमारे ५० नातेवाईकांची नावे, आणि विशेष म्हणजे नुसत्या ध्वजावरून ४८ देशांची नावे ओळखतो, भूमितीचे आकार, साहित्यावरून खेळाचा प्रकार ईत्यादी गोष्टींची माहिती त्याचा मुखोद्गत आहे. अवघ्या दीड वर्षाच्या वयात एव्हडी मोठी शब्द संपदा असणाऱ्या प्रत्युषची चर्चा होत आहे. आजही त्याला नीटसे स्पष्ट बोलता येत नाही तरी त्याच्याकडे तोंडात बोट घालावं अशी अचाट करणारी बुद्धिमता आहे, त्यामुळे कुंभेजळगावचा छोटा कौटिल्य पंडित म्हणून प्रत्युषची ओळख निर्माण झाली आहे.
        त्याच्या या गुणविषयी त्याची आई अश्विनी लेंडगुळे पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, त्याच्यात असणाऱ्या गुणांची ओळख मला नवव्या महिण्यातच झाली होती. त्यामुळे मी त्याचा हा गुण वाढीस लागावा म्हणूून प्रयत्न करायला सुरू केली आणि आज आपण पाहत आहेत त्याची प्रगती, जर प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलात विशेष गुण दिसला तर तो हेरून त्याला वाढीस लागण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, कारण जगातल्या प्रत्येक मुलात काहींना काही विशेष असतंच. गरज असते ती म्हणजे त्याला ओळखायची. जर आपल्या मुलातील विशेष गुण समोर आणून त्याला पैलू पडले तर त्याचे भविष्य उज्वल होतेच हे सांगायला कोणा भविष्यकारााची गरज भासणार नाही. प्रत्युषच्या या अचाट शक्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment