तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

संत गाडगेबाबा जयंती निमित्त गेवराई रूग्णालय परिसर स्वच्छ

सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. २३ _ आपल्या समाजाला स्वच्छतेचा संदेश देणारे थोर समाजसेवक संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील पतंजली योग समितीच्या सदस्यांनी किराणा दुकान व्यापारी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानात सहभागी होऊन शासकीय उपजिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छता केली.
                  रविवार, दि. २३ फेब्रुवारी २०२० रोजी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून गेवराई येथील किराणा व्यापारी संघटनेने शासकीय उपजिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्याचे ठरवले. त्यानुसार सकाळी ६ .३० दरम्यान रुग्णालय गेटच्या आतील परिसर हातात झाडू-खराटा घेऊन स्वच्छता करण्यात आला. यात पतंजली योग समिती पदाधिकारी, सदस्य, योग शिक्षक, योगसाधक, व्यापारी यांनी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब बरगे, सचिव सुरेंद्र रूकर यांच्या मार्गदर्शनाखाली व पतंजली योग समितीचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र बरकसे यांच्या नेतृत्वाखाली योग साधक उत्तमराव सोलाने, श्रीराम आरगडे, शिवाजीराव वावरे, शिवाजी भुतडा, मनोहर सराटे, राजेंद्र निकम, नितीन कुलथे, सुरेश मानधने, संजय सोनी, मुकेश बजाज यांच्यासह व्यापारी यांनी सहभागी होऊन प्रत्यक्ष परिसर स्वच्छ केला.

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment