तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 7 February 2020

परळीत वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांच्यावर सर्वसामान्य लोक विश्वास ठेवून असतात. आपली सुरक्षा केली जातेय या विश्वासावर विसंबून असलेल्या व्यक्तींना आता सुरक्षेची काळजी वाटू लागली आहे. कारण भरदिवसा परळीच्या डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर एका मोटारसायकल स्वाराला एक कार उडवते आणि त्याला मदत करण्यासाठी गेलेल्या अनेकांना तोच कारवाला पुन्हा पुन्हा ठोकतो. या उड्डाणपुलावर असलेल्या पोलीस चौकीच्या समोर ही घटना घडली हे विशेष.
रात्री घडणाऱ्या रस्ते अपघाताच्या घटना एझाडे वेळेस पोलिसांकडून दुर्लक्षित होऊ शकतात. परंतु दुपारच्या वेळेस पोलीस चौकीसमोर झालेला अपघात पाहण्यासाठी पोलीस हजर नसतात ही बाब अत्यंत गंभीर आणि पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालण्याजोगी झाली आहे. विशेष म्हणजे पोलीस अधिक्षकांची गाडी शेजारून जात असतांना हा प्रकार घडला.

No comments:

Post a Comment