तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 12 February 2020

परळीतील अपहरण व खुनी हल्ला प्रकरणी आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यातपरळी वैजनाथ (प्रतिनिधी):-  येथील  माणिक नगर भागातील टँकर चालक ज्ञानोबा आंधळे यांच्यावर 3 फेब्रुवारी रोजी अपहरण करून   खुनी हल्ला  केल्या प्रकरणातील फरार असलेल्या रवी उर्फ कान्हा हनुमंत फड   आरोपीस परळी शहर पोलिसांनी बुधवारी येथे अटक केली आहे .  यापूर्वी दोघांना परळी पोलिसांनी  7 फेब्रुवारी वाघोली (पुणे ) येथे ताब्यात घेऊन    अटक केली आहे, दि 8 रोजी परळी न्यायालयाने दोघांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती .दि 11 रोजी आता दोघांना  न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे .    बुधवारी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव रवी उर्फ कान्हा हनुमंत फड  रा  नाथरोड परिसर परळी  असे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याबाबतची माहिती अशी की ,3 फेब्रुवारी रोजी  येथील नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या कडील टँकर चालक ज्ञानोबा आंधळे  यांना रात्री बाराच्या दरम्यान ड्युटीवर जात असताना त्याना  बस स्टँड येथे रवी हनुमंत फड, बालाजी दहिफळे ,विक्रम  सारणीकर  रा परळी व अन्य दोघांनी अडविले व मोटारसायकल वरून अपहरण केले,  एका कॉलेज परिसरात नेऊन  लाथा बुक्क्यांनी व  काठीने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला .दरम्यान या वेळी काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे ज्ञानोबा आंधळे   यांचे प्राण वाचले ,  त्यास तातडीने शिवाजी चौकातील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले उपचारानंतर तबियत चांगली झाली, त्यानंतर   ज्ञानोबा आंधळे यांनी दि 4 रोजी  परळी  शहर  पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली,  याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला परंतु यातील आरोपी हे फरार झाले होते .पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत वाघोली पुणे येथे सात फेब्रुवारी रोजी बालाजी दहिफळे व विक्रम सारनीकर यांना  ताब्यात घेऊन अटक केले . दि 8 रोजी परळी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती मात्र  यातील तिसरा आरोपी रवी उर्फ हनुमंत फड फरार होता,त्यास बुधवारी येथेे  पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे, परळी शहर चे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीवर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे, पोलीस हवालदार बाबासाहेब बांगर, पोलीस काॅन्स्टेबल  शंकर बुड्डे , सुनील अन्नमवार, गोविंद भताने यांनी कारवाई केली.                                          या मधील आरोपी रवी उर्फ कान्हा हनुमंत फड याच्यावर मारामारीचे  सात गुन्हे दाखल आहेत,त्याला प्रशासनाने तडीपारीची नोटीस ही दिली होती, असे पोलीस सूत्रानी सांगितले.

No comments:

Post a Comment