तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

संग्रामपुर नगरपंचायतचे विविध समस्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ मुख्य अधिकारीच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन
संग्रामपुर [ प्रतिनिधी] येथील  वार्ड क्रमांक 7  मधील नागरिकांच्या विविध समस्या कडे नगरपंचायत जाणीव पुर्वक दुर्लक्ष करित असल्याचा आरोप करित वार्डातील विविध समस्या ७ दिवसात सोडवा अन्यथा नगरपंचायत समोर आमरण उपोषणाचा इशारा देत मुख्यधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन दिले  मुख्यधिकारी यांना दिलेल्या निवेदना नमुद आहे तहसिल कोर्ट मागे  वार्ड क्रमांक 7 असून रस्ता सांडपाण्यामुळे पूर्ण खराब झाला आहे सांडपाणी साचल्यामुळे आरोग्यावर धोका निर्माण झाला आहे वेळोवेळी नगरपंचायत कडे तक्रारी व तोंडी लेखी करूनही वार्डातील परिस्थिती जैसे थे  सदर वार्ड दलित वस्ती असून जाणून-बुजून नगरपंचायत दुर्लक्ष करीत तर नाही ना असा प्रश्न उपस्थीत करित तर संपूर्ण गावात रस्ते कामे चालू आहेत  परंतु वार्ड क्रमांक 7 कडे दुर्लक्ष करीत असुन  नागरिकांना नागरिसुविधे पासुन वंचित ठेवत आहेत याकडे संबंधीत नगरसेवक व नगराध्यक्ष ही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करित  एकीकडे स्वच्छ भारत योजनेसाठी लाखो रुपये खर्च होत असतांना वार्ड नं ७ वर अन्याय का ?  सर्व वार्डात स्वच्छता व रस्त्याचे काम सात दिवसाच्या आत सुरू करावे अन्यथा नगरपंचायत समोर आमरण उपोषणा करण्याचा इशारा निवेदनातुन नागरिकांनी दिला निवेदनावर 
सौरभ बावस्कार ,विकी भटकर अमोल आंबलके,विष्णूआंबलके,संजय  इंगळे, देविदास भटकर, श्रीकृष्ण सुरळकर पंकज  शेगोकार 
सुभद्रा  भटकर ,सुशीला गजानन शेगोकार संगीता गोपाळा बावस्कार ,किरण प्रदीप बावस्कार लिलाबाई पांडुरंग इंगळे आदीच्या सहया आहेत

No comments:

Post a Comment