तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

ताडकळस सोसायटी चेअरमनपदी डिंगांबर आंबोरे तर व्हाईस चेअरमनपदी भगवानराव लाकडे बिनविरोध


ताडकळस शेख शेहजाद( वार्ताहर) येथील पाच गावांचा समावेश असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी डिंगांबर किशनराव आंबोरे तर व्हाईस चेअरमनपदी भगवानराव रंगनाथ लाकडे यांची बिनविरोध निवड  झाली.
 ताडकळस येथील सोसायटी चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाच्या निवडीसाठी शनिवार 22 फेब्रुवारी रोजी  सकाळी 11 वाजता नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली.  या बैठकीत सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची निवड बिनविरोध करण्यात आली.
पुर्णा तालुक्यातील ताडकळस विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रिया नुकतीच घेण्यात आली. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांनी व पुढार्यांनी एकत्र बसून सर्वांना प्रतिनिधित्व देत ही निवडणूक बिनविरोध केली. या सोसायटीमध्ये ताडकळस, खांबेगाव, महातपुरी, शिरकळस, तामकळस या पाच गावांचा समावेश आहे.   निवडणुकी बरोबरच चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची निवड देखील बिनविरोध पार पाडली. आहे. या बैठकीला मदनराव आबासाहेब आंबोरे,. दिगांबर किशनराव आंबोरे, गजानन गणेशराव आंबोरे, गोपाळ बाबुराव आंबोरे, दिलीप रामराव आंबोरे, रंगनाथ रामराव भोसले, ,  भगिरथाबाई बापुराव आंबोरे, धारुबाई सुभाषराव चिमटे,  प्रल्हादराव बाबुराव होनमणे,  धुरपताबाई रेश्माजी जल्हारे,  भगवान रंगनाथ लाकडे या 11 संचालकांची उपस्थिती होती. तर रमेशराव बापुराव आंबोरे, बालाजी चंद्रकांत रुद्रवार  हे 2 संचालक बैठकिस अनुपस्थित होते.
ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून पी.बी. राठोड, गटसचिव एन.पी. सिरस्कर यांनी काम पाहिले. या निवडीबद्दल जिल्हा परिषद सदस्या सौ. इंदुबाई आंबोरे, उपसरपंच खंडेराव वावरे, मुरलीधर लासे, ग्राम पंचायत सदस्य कैलास होनमणे, प्रभाकर आंबोरे, श्यामराव आंबोरे, शेख अलिशहा, बबलु माने, दत्तराव आंबोरे, गोविंद आंबोरे, भास्कर चिमटे, ज्ञानोबा माने, शैलेंद्र आंबोरे, मंहम्मद गुत्तेदार आदींनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment