तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

" प्यार का मौसम श्रवणीय प्रेमगीतांचा लाईव्ह आॅर्केस्ट्रा संपन्न "सिंफनी म्युझिकल ग्रुप प्रेझेंट   "  मौसम प्यार का "हा बाॅलिवुड मधील लोकप्रिय  , सुपरडुपर , गाजलेल्या ,अविस्मरणीय आणि अवीट गोडीच्या रोमॅंटिक गाण्यांचा सुपर फास्ट लाईव्ह आॅर्केस्ट्रा अंधेरी पश्चिम येथील मेयर हाॅल मध्ये संपन्न झाला .या संगीत मैफलीची संकल्पना ,  निर्मिती , दिग्दर्शन सबकुछ ट्रिझा यांचे होते . " प्यार का मौसम  " या व्हॅलिटांईन डे विशेष आॅर्केस्ट्राचे संगीत संयोजक देवा बंगेरा यांच्या मार्गदर्शनाखाली बाॅलिवुड मधल्या टाॅप  ६ वादकांच्या संगीत साथीने  सुप्रसिद्ध गायक अनिल वाजपेयी , सरीता राजेश ,  सौम्या  वर्मा , उमेश , सुनील , सुचिता, सचिन आणि सतीश नायर यांनी गायलेल्या एका पेक्षा एक सरस लोकप्रिय गाण्यांना , युगुल प्रेमगीतांना मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रचंड प्रतिसाद दिला . विशेषतः गायक सतीश नायर आणि सरीता राजेश यांनी सादर केलेल्या " चुनरी सम्हांल गोरी "  या आर डी बर्मन यांच्या गाजलेल्या सुपरहिट धमाल गाण्यावर रसिकांची पावले थिरकली . या वाद्यवृंदाचे  सूत्रसंचालन निवेदन सुप्रसिद्ध निवेदक राजेश सुब्रमण्यम यांनी केले .  प्यार का मौसम हा भव्य दिव्य लाईव्ह आॅर्केस्ट्रा सर्व रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला . विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर खास आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होते .

No comments:

Post a Comment