तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 8 February 2020

जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या शाखाध्यक्षपदी सिध्देश्वर इंगोले यांची निवड


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
येथील प्रसिध्द कवी, चित्रकार तथा साहित्यीक सिध्देश्वर इंगोले यांची जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद शाखा परळीच्या अध्यक्षपदी नुक्तीच निवड करण्यात आली आहे.
याबाबत बीड जिल्हाध्यक्ष शिवश्री नागनाथ जाधव, शिवश्री रामकिशन मस्के, शिवश्री प्रमोद जाधव, शिवश्री गोविंदअप्पा पोतंगले आदींनी सिध्देश्वर इंगोले यांना नुक्तेच नियुक्तीपत्र दिले.  त्यांच्या निवडीबद्दल ज्येष्ठ साहित्यीक डॉ.एकनाथ घ. मुंडे, ज्येष्ठ साहित्यीक रानबा गायकवाड, बालाजी कांबळे, प्रा.सिध्दार्थ तायडे, नागनाथ बडे, दत्ता वालेकर, केशव कुकडे, रंगनाथ मुंडे, रामकिशन केकान , पत्रकार महादेव गित्ते, विकास वाघमारे आदींनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a comment