तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 February 2020

उपजिल्हा रुग्णालय व परळी पत्रकार संघातर्फे मोफत रक्त तपासणी शिबिर संपन्न


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी उपजिल्हा रूग्णालय व परळी पत्रकार संघाच्या वतिने तालुक्यातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबाचे आज दि.27 फेब्रुवारी रोजी मोफत रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिरात 50 जणांची रक्त तपासणी करण्यात आली.
समाजाच्या प्रश्नानां वाचा फोडणारे, उपेक्षीतांना न्याय मिळावा म्हणुन बातमीला प्राधान्य देवुन शासनाला जागे करण्याचे काम पत्रकाराला सजग राहुन करावे लागते या साठी त्याला नेहमी धावपळ करावी लागते आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास कधी,कधी पत्रकाराला वेळ मिळत नाही म्हणुन समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्यां पत्रकारांचे व त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य चांगले रहावे या साठी दि.27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे हे रक्त तपासणी शिबीर पार पडले. या रक्त तपासणीत कावीळ,एच.बी.,थायरॉईड,एच.आय.व्ही.शुगर अशा वेगवेगळ्या रक्त तपासण्या करण्यात आल्या.या शिबिरात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.दिलीप गायकवाड,समुपदेशक शरद चव्हाण,शहाबुद्दीन शेख,एम.एम.शेख,प्रयोगशाळा तंत्रज्ञ सागर जाधव,विलास पवार,अविनाश व्हावळे,पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनंत गित्ते,शहराध्यक्ष संभाजी मुंडे,कार्याध्यक्ष धीरज जंगले यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment