तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 7 February 2020

सच्चितानंद काशिनाथ महाराज यांच्या पालखीचे परळीत स्वागत
बेलवाडी येथे भजन, संकीर्तन; भाविकांची मोठी उपस्थिती

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  सच्चिदानंद श्री काशिनाथ महाराज यांच्या मुरूड येथून निघालेल्या पालखीचे स्वागत आज गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथे गुरुलिंगस्वामी मठ, बेलवाडी येथे उत्स्फुर्तपणे करण्यात आले. हा पायी दिंडी सोहळा गंगाखेड येथे जाणार असून तेथे त्याची सांगता होणार आहे.
मुरूड येथून 4 फेब्रुवारीपासून निघालेल्या सच्चिदानंद श्री काशिनाथ महाराज यांचा पालखी सोहळा आज गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी परळी येथे वैद्यनाथ मंदिर जवळील श्री गुरुलिंगस्वामी महाराज मठ (बेलवाडी) येथे पोहोचला. जय सदगुरू भजनी मंडळ व सदगुरू परिवार यांच्या सौजन्याने ही पालखी निघाली असून आज श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथे पालखीचे बालाजी सेलुकर, सौ.लक्ष्मी सेलुकर, परमेश्वर बुद्रे, शाम बुद्रे, काकासाहेब बुद्रे, उमाकांत बुद्रे यांच्या वतिने उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले.श्री काशिनाथ महाराज यांच्या पालखीची मनोभावे पुजा व आरती सेलुकर व बुद्रे परिवाराच्या हस्ते करण्यात आली. यावेळी परळी येथील शिवकन्या महिला भजनी मंडळाने विविध भक्तीपर भजनी गायली. 
पालखी सोहळयाचे हे 16 वे वर्ष असून पायी दिंडी सोहळा परळीत आल्यानंतर भाविक वर्गातून श्रीं चे मनोभावे दर्शन घेण्यात आले. यावेळी सच्चिदानंद काशिनाथ महाराज पालखी सोहळयाचे प्रमुख लक्ष्मण पांचाळ, दिलीप कोकणे, पांडुरंग देशमुख, मारूती नाडे यांच्यासह असंख्य वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसाद वितरीत करण्यात आला.
प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी 4 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी पर्यंत मुरूड ते गंगाखेड पदयात्रा महोत्सवाअंतर्गत परळी येथे गुरूवार दि.6 फेब्रुवारी रोजी आलेल्या परमपूज्य श्री समर्थ सच्चिदानंद महाराज गंगाखेड यांच्या पायी दिंडीचे परळीत जोरदार स्वागत करण्यात आले. येथील श्री गुरूलिंगस्वामी मठ (बेलवाडी) येथे पालखीचा मुक्काम होवून तेथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जगदगुरू श्री सर्वज्ञ सच्चिदानंद सदगुरू काशिनाथ महाराज गंगाखेड यांच्या कृपाशिर्वादाने मुरूड ते गंगाखेड पदयात्रा काढण्यात आली होती. या यात्रा महोत्सवाचे हे 16 वर्ष होते. मुरूड येथून मंगळवार दि.4 फेब्रुवारी पदयात्रा निघाली आहे. परळी येथील श्री गुरूलिंगस्वामी मठ (बेलवाडी) येथे गुरूवार दि.6 रोजी आली होती. या मठात पालखीचे परळी येथील बालाजी सेलुकर व परमेश्वर बुद्रे परिवाराकडून जोरदार स्वागत करण्यात आले. पालखीत आलेल्या भाविकांना श्री गुरूलिंग स्वामी मठ (बेलवाडी) येथे वीरशैव समाजाचे कार्यकर्ते सेलूकर व बुद्रे परिवाराच्या वतिने सायंकाळी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. रात्री दिंडीत आलेल्या वारकऱ्यांकडून विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भजन, संकीर्तनाने श्री गुरूलिंग स्वामी मठात सच्चिदानंद महाराज गंगाखेड यांच्या नामकिर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले होते. या दिंडी सोहळयात लक्ष्मण पांचाळ व दिलीप कोकणे व जय सदगुरू भजनी मंडळ, जय सदगुरू परिवार, दत्त मंदिर केंद्र मुरूडचे पदाधिकारी सहभागी झाले होते. तसेच शुक्रवारी सकाळी पालखी गंगाखेडकडे रवाना झाली. यावेळी श्री गुरूलिंग स्वामी मठ (बेलवाडी) च्या समोर वेगवेगळया रांगोळया काढून पालखीचे स्वागत करण्यात आले.

No comments:

Post a Comment