तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 14 February 2020

पतंजली योग-प्राणायाम शिबिराचा उत्साहात समारोप
सोनपेठ (प्रतिनिधी) :-
जय भवानी शिवजन्मोत्सव समिती व पतंजली योग समिती, सोनपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवशीय निःशुल्क योग-प्राणायाम शिबिरा ची आज दिनांक १४ फेब्रुवारी २०२० शुक्रवार रोजी सकाळी ७.१५ वाजता उत्साहात सांगता झाली. आज शिबिराच्या पाचव्या दिवशी भारत स्वाभिमान न्यास परभणी जिल्हा प्रभारी प्राचार्य धोंडीराम शेप सर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी पाचव्या दिवसाची योग-प्राणायाम शिबीर प्रात्यक्षिके  शेप सर यांनी घेतली. याप्रसंगी सोनपेठ शहरातील योग-प्राणायाम प्रेमी बंधू-भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या प्रसंगी शेप सरांचा प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच याप्रसंगी प्राचार्य शेप सरांच्या अध्यक्षतेखाली सोनपेठ पतंजलीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सोनपेठ येथे २५ दिवशीय योग प्रशिक्षक शिबीर घ्यायचे ठरले.समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भारत स्वाभिमान न्यास सोनपेठ प्रभारी प्रा.डॉ. विठ्ठल जायभाये यांनी केले. या प्रसंगी भारत स्वाभिमान न्यास व पतंजली योग समिती, सोनपेठ चे सर्व पदाधिकारी व जय भवानी शिवजन्मोत्सव समितीचे बहुतांश सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment