तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 7 February 2020

औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धे मधील संचलन मध्ये बीड जिल्हाचा प्रथम क्रमांक


लातुर (प्रतिनिधी) :- लातूर येथे आजपासून औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना सुरवात झाली असून या स्पर्धा दि 7 ते 9 फेब्रुवारी पर्यंत घेण्यात येत आहेत. या स्पर्धेचे आयोजन य वर्षी लातूर जिल्ह्यामध्ये होत असून यात विभागातील आठ जिल्ह्यातील जवळपास 1400 खेळाडूनि भाग घेतला असून यात महसूल विभागांतील कोतवाल,कारकून,तलाठी,तहसीलदार,नायब तहसीलदार व जिल्हाधिकारी पर्यंत  च्या अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. या स्पर्धे चे उदघाटन औरंगाबाद विभागाचे उपायुक्त पराग सोमण यांच्या हस्ते झाले असून या वेळी सर्व जिल्ह्याचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक मा जी श्रीकांत , जिल्हाधिकारी लातूर यांनी केले. या नंतर सर्व  प्रथम संचलन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात बीड जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला आहे. गेल्या वर्षीच्या जालना येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सुद्धा बीड जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळाला होता. या बद्दल बीड जिल्ह्यातील खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यात परळी तालुक्यातील तलाठी श्री विष्णू गित्ते, तलाठी दिगंबर साबणे, कारकून गोवर्धन गर्जे यांचा समावेश होता तरी त्यांचे  अभिनंदन मा गणेश महाडिक उपविभागीय अधिकारी परळी, डॉ.विपीन पाटील तहसिलदार परळी, नायब तहसीलदार सदानंद बरदाळे यांनी केले आहे.

No comments:

Post a comment