तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 12 February 2020

" टॅलेंट शो स्पर्धेत मुंबईची भक्ती सुभाष बिडकर चमकली " (प्रतिनिधी-अनुज केसरकर)


मिस अॅंड मिसेस इंडियाला मोठ्या प्रमाणात जबरदस्त प्रतिसाद मिळाल्याने पनाच संस्थेच्या वतीने प्रथमच एक नवीन स्वरूपात मुंबई- गोवा क्रूझवर नवोदित माॅडेल्स साठी टॅलेंट शो आयोजित करण्यात आला होता . या स्पर्धेत मुंबईची भक्ती सुभाष बिडकर चमकली . नागपूरच्या इशिकाने सर्वाधिक हुशार गटात बाजी मारली . या स्पर्धेत महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांतील वीस स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. परिचय , कौशल्य , व्यक्तिमत्व , प्रश्न- उत्तरे आणि विविध सामाजिक कार्य असे स्पर्धेचे स्वरूप होते . मुंबई-गोवा क्रूझवर मोठ्या थाटामाटात भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झालेल्या या स्पर्धेतील स्पर्धेकांचे एक्सक्लुझिव्ह  फोटो शूट करण्यात आले . या स्पर्धेत क्रूझ क्वीनचा प्रथम पुरस्कार सुरतची सिमरन पटेल आणि चंडीगडची धावपटू ताशिका अरोरा यांनी पटकावला . सेकंड रनर अप मुंबईची भक्ती सुभाष बिडकर ठरली . सर्वाधिक लोकप्रिय रांचीची सेजल केरकेट्टा ,
सर्वाधिक हुशार नागपूरची इशिका , मोस्ट गाॅर्जियस गुजरातची भाविनी चौहान , सर्वाधिक फोटोजेनिक झारखंडची आरती टोप्पो , फॅशन डिझायनर नागपूरच्या रेबेका सयाम ठरल्या . ल्यूक एरोसाॅमिथ यांच्या हस्ते विजेत्यांना मुकुट चढविण्यात आला . रेखा डगर आणि सुमित्रा पाटील यांनी परिक्षकांची भुमिका बजावली . पायला शेठ विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या . तसेच सविता भारती आणि लेस्ली त्रिपाठी आवर्जून उपस्थित होत्या . शेवटी या स्पर्धेतील विजेत्यांना शाॅट फिल्म मध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आयोजकांनी घोषित केले . त्यानंतर या स्पर्धेची सांगता करण्यात आली .

No comments:

Post a Comment