तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 February 2020

ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून नाथ प्रतिष्ठानच्या वतीने आज 'शिवपुत्र संभाजी' महानाट्य व ऐतिहासिक वस्तुंचे भव्य प्रदर्शनाचा परळीकरांना लाभ घ्यावा-सतिष गंजेवारपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव व महाशिवरात्रीचे औचित्य साधून महाराजा शंभू छत्रपती प्रोडक्शन पुणे निर्मित प्रसिद्ध व ऐतिहासिक शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे आयोजन येत्या २८ तारखेला परळी येथे करण्यात आले आहे. परळीतील शिवप्रेमी, नाट्य रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा व नाटक पाहण्यासाठी सहकुटुंब उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर चिटणीस सतिष गंजेवार यांनी केले आहे.
  याबाबत अधिक माहिती अशी की,  परळी शहरातील येथील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात तीन दिवस या महानाट्याचे प्रयोग होणार असून छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत सिनेकलावंत तथा खा. डॉ. अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत परळीकरांच्या भेटीस येणार आहेत. याशिवाय सिनेअभिनेते रवी पटवर्धन हे या नाटकात औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर १०० हुन अधिक कलाकार विविध भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या महानाट्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये १५० स्थानिक कलाकारांना प्रत्यक्ष सहभागी होऊन अभिनयाची संधी मिळणार आहे. ना. धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांस्कृतिक व कला क्षेत्रातील विविध उपक्रमांची मेजवानी नेहमीच परळीकरांसाठी खास ठरलेली आहे, याचाच एक भाग म्हणून हे महानाट्य आणखी नव्या व वेगळ्या स्वरूपात परळीकरांच्या भेटीस येत आहे. असा असेल रंगमंच.. यावेळचे वैशिष्ट्य म्हणजे दिग्दर्शक नितीन कुलकर्णी यांनी कला दिगदर्शन केले असून त्यांच्याच संकल्पनेतून या महानाट्यातील शिवसृष्टी उभारली जाणार आहे! लेखक दिगदर्शक महेंद्र महाडिक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या भव्य महानाट्यामध्ये २५० कलाकारांचा सहभाग असून १२०  फूट लांब व ५५ फूट उंच पाच मजली किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर करण्यात येणार आहे. घोडे व बैलगाड्या यांचाही वापर यामध्ये प्रामुख्याने करण्यात येईल. मराठा व मुघल यांच्यातील तलवारीच्या खणखणाटासह तोफांचा गडगडाट व अग्निबाणांचा वर्षाव नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. नेत्रदीपक आतिषबाजी व फटाक्यांच्या रोषणाईत डॉ. अमोल कोल्हे यांचा ४ वेळा रसिकांमधून घोड्यावरून रंगमंच प्रवेश, पालखी, भव्य राज्याभिषेक सोहळा यासह पहिल्यांदाच प्रयोगात येत असलेली १२ फूट जहाज वापरून अंगावर रोमांच आणणारी छत्रपती संभाजी महाराज यांची किल्ले जंजिरा मोहीम परळीकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरणार आहे. वस्तुसंग्रहालय व प्रदर्शन... २८ - २९ फेब्रुवारी व ०१ मार्च असे तीन दिवस संध्याकाळी ०७ ते १० वा. या नाटकाचे प्रयोग आयोजित करण्यात येणार असून दिवसभर या ठिकाणी उभारलेली शिवसृष्टी, १६ व्या शतकातील गावरचना, शिवछत्रपतींचे सिंहासन, अंगरखा, औरंगजेबाचे तख्त, तसेच तब्बल ३००० शस्त्रे असलेले मराठा शस्त्रागार आदी वस्तूंच्या प्रतिकृतींचे भव्य प्रदर्शन नागरिकांसाठी मोफत व दिवसभर खुले असणार आहे. या महानाट्यासाठी प्रवेशिका मोफत असणार आहेत, या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य इतिहासाचे स्मरण करून त्यांच्या शौर्यगाथेचा अभिमान आपल्या मनात रुजावा यासाठी नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून या होणाऱ्या महानाट्याचा परळीसह परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने इतिहासाच्या या पुनर्निर्मितीचे साक्षीदार व्हाण्यासाठी परळीतील शिवप्रेमी, नाट्य रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा व नाटक पाहण्यासाठी सहकुटुंब उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर चिटणीस सतिष गंजेवार यांनी केले आहे.

     

No comments:

Post a Comment