तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 5 February 2020

आजचा अभ्यास तुमचा भविष्यकाळ सुरक्षित करेल; सतत अभ्यासातील बदल स्वीकारा-प्रा.टी.पी.मुंडेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
विद्यार्थी म्हणून अभ्यास करीत असताना आपल्या आवडीच्या विषयासोबतच पूर्ण अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने शिकणे आवश्यक असून आजचा अभ्यास तुमच्या भविष्यकाळासाठी खूप चांगला असेल असे मत भाजपाचे जेष्ठ नेते प्रा.टी.पी.मुंडे यांनी व्यक्त केले. दरम्यान रामराव गित्ते यांनी आ.सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरवर खर्च न करता विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमासोबतच स्पर्धा परिक्षेची पुस्तके देवून चांगला उपक्रम हाती घेतल्याचे प्रा.टी.पी.मुंडे म्हणाले.
उद्योजक रामराव गित्ते यांच्या वतिने आ.सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त आज नंदागौळ येथील जि.प.प्रा.शाळा व भगवानबाबा विद्यालय येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच स्पर्धा परिक्षेसंदर्भातील पुस्तकांचे वितरण जेष्ठ नेते प्रा.टी.पी.मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दै.मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक प्रशांत प्र.जोशी, जगमित्रचे संपादक बालासाहेब कडबाने, वैद्यनाथ वार्ताचे संपादक रामप्रसाद गरड, सोमेश्वर साथी चे संपादक बाळासाहेब फड ,मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यासह केशवराव गित्ते, सेामनाथ गित्ते, नारायणराव गित्ते, अंबादास गित्ते, अर्जुन गित्ते, रघुनाथ फड, बालाजी गित्ते, व्यंकटी गित्ते, रंगनाथ गित्ते, वाल्मीक जगताप, गोविंद गित्ते, गंगाधर केंद्रे, भालचंद्र गित्ते, रमेश गित्ते, अरूण गित्ते, केशव गित्ते तसेच शाळेचे संचालक तथा जिरेवाडीचे सरपंच गोवर्धन कांदे आदींसह अनेक मान्यवर व गावकरी उपस्थित होते.
आपल्या भाषणात पुढे बोलतांना प्रा.टी.पी.मुंडे यांनी शिक्षणातील नव्या बदलाबद्दल समाधान व्यक्त करत आता स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनीही आपला अभ्यास व अभ्यासाची पद्धत बदलण्याची गरज आहे. आम्ही जेंव्हा विद्यार्थी होतो तेंव्हाचे पारंपारिक शिक्षण आणि आता स्पर्धात्मक आव्हानांना तोंड देण्याचे शिक्षण असा बदल झाला आहे. रामराव गित्ते हे उद्योजक आहेत, त्यंाचा राजकारणापेक्षा समाजकारणावर अधिक भर असून बॅनर्स किंवा इतर कार्यक्रमावर अवाढव्य खर्च न करता त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाकरीता शालेय साहित्य व स्पर्धात्मक पुस्तके दिल्याचे आपणास समाधान वाटत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान रामराव गित्ते यांनी गावातील ग्रंथालयालाही पुस्तकांची मोठी भेट दिली आहे. या कार्यक्रमास गावातील जेष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुण्याचे स्वागत शाळेतील शिक्षक व नागरिकांनी केले. यावेळी रामराव गित्ते व प्रशांत जोशी यांचीही भाषणे झाली.

No comments:

Post a Comment