तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 7 February 2020

फुले, शाहु, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते अशोक ताटे यांचे दुःखद निधन परळी वैजनाथ(प्रतिनिधी) :- शहरातील भिमनगर भागात राहणारे फुले शाहु आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते तथा आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशअध्यक्षअशोक ताटे याचं आज दुपारी ४ वाजता दुःखद निधन झाले असुन अंतविधि उद्या सकाळी १०वाजता  शांतिवन स्मशान भुमी येथे होणार आहे.

फुले,शाहु,आंबेडकर चळवळीतील एक सच्चा कार्यकर्ता,बहुजनांच्या,तळागळातील लोकांच्या प्रश्नासाठी लढणारा लढवय्या व आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणुन कार्यरत असलेले परळीतील भिमनगर येथे राहणारे अशोक संतराम ताटे यांचे दिर्घ आजाराने औंरगाबाद येथील रूग्णालयात उपचारा दरम्यान आज दुपारी 4वाजता निधन झाले असुन उद्या सकाळी 10वाजता शांतिवन येथे अंतविधी होणार आहे .त्यांच्या अकस्मात
निधनाने परळीत हळहळ व्यक्त होत असुन त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,दोन मुली ,नाती असा परिवार आहे .ताटे कुटुंबावर अचानक कोसळलेल्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.

No comments:

Post a comment