तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 26 February 2020

सुवर्णकार व सराफ बांधवांच्या वतीने सुरेश अण्णा टाक यांचा सत्कारपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
          अतिप्रतिष्ठित असा परळी भूषण पुरस्कार 2020 प्राप्त झाल्याबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश अण्णा टाक यांचा परळी सुवर्णकार व सराफ बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला
          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी शहर पोलीस स्टेशनचे पो.नि. हेमंत कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.सुदमराव डहाळे सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष राहुल टाक महेश बँकेचे संचालक संदीप टाक जेष्ठ कार्यकर्ते माणिक मामा दहिवाळ उपनिबंधक प्रशांत दहिवाळ बालाजी टाक रमेश डहाळे (लिंबेकर ) आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती
          संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. सामाजिक राजकीय व अन्य क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल सुरेश सखाराम टाक यांना दैनिक मराठवाडा साथी यांच्या वतीने देण्यात येणारा परळी भूषण पुरस्कार 2020 प्रदान करण्यात आला जेष्ठ कार्यकर्ते रमेश मुंडीक धारसुरकर यांनी मान्यवरांचा शाल श्रीफळ फेटा व भेटवस्तू देऊन सत्कार केला यावेळी बोलताना प्रा. सुदाम डहाळे यांनी सुरेश टाक यांच्या कार्याचा गौरव केला सुरेश टाक यांनी सर्वांना बरोबर घेऊन प्रगतीचे शिखर गाठले असे ते म्हणाले यावेळी सुरेश टाक यांचा गुलाब पुष्पांचा भव्य हार शाल श्रीफळ फेटा व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला रमेश मुंडीक सतीश टेहरे संतोष टाक रमाकांत डहाळे दिलीप बुरांडे किरण बोकन वैजनाथ बोकन सुरेश शिंदे अशोक डहाळे गोविंद दहिवाळ सूर्यकांत कुलथे प्रशांत शहाणे राजू  बोकन बाळू लोळगे भास्कर उदावंत संतोष उदावंत संतोष मैंड भगवान झुंजे मनोज उदावंत दीपक डहाळे विष्णुपंत कुलथे सतीश मैड भारत टाक बंडू उदावंत पांडू उदावंत गोविंद उडावंत आदींनी सुरेश टाक यांचा सत्कार केला सत्काराला उत्तर देतांना  सुरेश टाक म्हणाले की हा पुरस्कार आपणा एकट्याचा नसून हा सर्व समाजाचा पुरस्कार आहे सर्व स्तरातील युवकांच्या सहकार्यामुळे आपन समाज सेवा करू शकलो या सरकारने आपण भारावून गेल्याचे त्यांनी सांगितले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत समाजाचे जेष्ठ अरुण टाक सुनील दहिवाळ घटनांदूरकर माणिक मामा राजाभाऊ दहिवाळ यांनी साथ दिली माझ्या कारकिर्दीला या सर्वांच्या सहकार्याचे बळ मिळल्यामुळेच या पुरस्कारापर्यंत आपण पोहोंचू शकलो असेही ते म्हणाले रमेश मुंडीक श्रीराम पोरवाल यांनीही मनोगत व्यक्त केले 
        अध्यक्षीय समारोपात पो.नि. हेमंत कदम यांनी सुरेश टाक यांच्या कार्याचा गौरव केला शून्यातून विश्व निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले असून समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यात ते पुढे असतात असे कदम म्हणाले प्रास्ताविक करताना राहुल टाक यांनी सुरेश टाक यांच्या व्यापक कार्याची माहिती दिली आभार अमोल कुलथे तर सूत्रसंचलन सुधीर गोस्वामी यांनी केले.

No comments:

Post a Comment