तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 25 February 2020

बेपत्ता शाळकरी मुलाचा विहिरीत आढळला मृतदेह....


गावाने एक गुणवंत विद्यार्थी गमावला असल्याची भावना


परतूर/प्रतिनिधी


तालुक्यातील वरफळ येथील १६ वर्षीय बेपत्ता शाळकरी मुलाचा मृतदेह विहिरीत आढळला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.हा शाळकरी मुलगा दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सकाळी  7 वाजेच्या सुमारास घरी कोणाला काही न सांगता निघून गेला होता अशी माहिती नातेवाईकांनी दिली,याबाबत परतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.


मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे नाव दिपक मोकिंद खंडागळे असे असून, तो वरफळ येथील छत्रपती शिवाजी शाळेत १० वी च्या वर्गात शिकत होता. शनिवार रोजी सकाळी घरातून निघून गेला याबाबत घरच्या लोकांनी व इतर गावकऱ्यांनी शोधा शोध केली असता सापडला नसल्याने मयत दीपक यांच्या भावा मार्फत परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत तपास सुरू असताना दिनांक २५ फेब्रुवारी रोजी गावातील शेतकरी ज्ञानेश्वर खरात यांच्या शेतातील विहिरीत दिपकचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली गावकऱ्यांनी तत्काळ परतूर पोलिसांना माहिती दिली

त्यानंतर घटनास्थळी पोलीस कर्मचारी श्री चव्हाण,श्री पायलबुद्दे व श्री शिंदे दाखल झाले मृतदेह विहिरीतून गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले.तद्नंतर सायंकाळी ०५:३०च्या सुमारास दिपकवर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक,विद्यार्थी मित्र,शिक्षक, नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती

दिपकच्या मृत्यूमागील रहस्य कायम आहे. त्याने असे पाऊल का उचलले व कशासाठी उचलले, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. पोलीस या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.
दीपक यांच्या पश्चात आई वडील भाऊ बहिणी असा मोठा परिवार आहे

No comments:

Post a Comment